मकर संक्रांति निबंध मराठी | Makar Sankranti Nibandh Marathi

Makar Sankranti Nibandh Marathi – मित्रांनो आज “मकर संक्रांति निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Makar Sankranti Nibandh Marathi

मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे. दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला तो. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो.

या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरूनन पाहिले असता, सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. संक्रांतीचा आदला दिवस भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंगभाज्या, फळभाज्या यांची तीळाचे कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. [Makar Sankranti Nibandh Marathi]

संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे महत्व विशेष आहे. थंडीच्या दिवसात उष्ण अशा तिळाचे आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते.महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी, संक्रांत व किंक्रांत अशी नावे आहेत.

मकर संक्रांति निबंध मराठी

संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा 14 जानेवारी रोजी येतो. परंतु दर 70 वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.

हा देखील निबंध वाचा »  पर्यावरण रक्षण काळाची गरज निबंध मराठी | Paryavaran Rakshan Kalachi Garaj Marathi Nibandh

नवविवाहित वधूचे हळदीकुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांचे कौतुक केले जाते. लहान बालकांनाही संक्रांती निमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे, हलव्याचे दागिने घालणे अशी पद्धती दिसून येते.

चुरमुरे, बोरे, हरभरे, ऊसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर घातले जाते. अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्कीटे घालण्याची हौसही दिसते. याला बोरन्हाण असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा. “Makar Sankranti Nibandh Marathi”

Makar Sankranti Nibandh

तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतु तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे.

खरचं! “तिळ गुळ घ्या गोड बोला” या शब्दात केवळ अर्थ भरला आहे. आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.

संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा. {Makar Sankranti Nibandh Marathi}

मकर संक्रांति निबंध

तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतु तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे. “तिळ गुळ घ्या गोड बोला “

तर मित्रांना “Makar Sankranti Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

हा देखील निबंध वाचा »  मराठी भाषेचे भवितव्य निबंध मराठी | Marathi Bhasheche Bhavitavya Nibandh Marathi

मित्रांनो, तुमच्याकडे “मकर संक्रांति निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

मकर संक्रांतीचा देव कोण?

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यासोबत विष्णूची पूजा करण्याचा नियम आहे.

संक्रांतीचा अर्थ काय?

संक्रांती (संस्कृत: संक्रांति संक्रांति किंवा संक्रमण) म्हणजे भारतीय खगोलशास्त्रात सूर्याचे एका राशीतून दुसर्‍या राशीत हस्तांतरण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: