माझ्या स्वप्नातील आदर्श गाव मराठी निबंध | Majhya Swapnatil Adarsh Gaon Marathi Nibandh
Majhya Swapnatil Adarsh Gaon Marathi Nibandh – मित्रांनो आज “माझ्या स्वप्नातील आदर्श गाव मराठी निबंध” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
Contents
Majhya Swapnatil Adarsh Gaon Marathi Nibandh
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेले कार्य आणि मांडलेली भूमिका एकविसाव्या शतकातही तितकीच उपयोगी आहे. आदर्श गाव कसं असावं, याविषयी तुकडोजी महाराजांनी मांडलेले हे विचार.
ग्राम्सुधार्नेचा मुल मंत्र ।
सज्जनांनी व्हावे एकत्र।
संघटना हेच शक्तीचे शुत्र।
मित्रांनो! आदर्श ग्रामनिर्माण योजना हा आजच्या युगाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकेकाळी यज्ञाला जे महत्त्व होते ते महत्त्व आजच्या काळी या योजनेला आहे. (Majhya Swapnatil Adarsh Gaon Marathi Nibandh)
आपल्या प्रत्येक गावाला आज फार पुढे जावयाचे आहे. राज्याचे किंवा राष्ट्राचे केंद्र दिल्ली नसून आपले प्रत्येक गाव आहे. आपण आपले गाव आदर्श करू तरच राष्ट्र सुखी, समृद्ध, सामर्थ्यवान व उन्नत होईल.
माझ्या स्वप्नातील आदर्श गाव मराठी निबंध
गावा-गावातून आपण सुरू केलेले कार्य पाहण्यासाठी दिल्लीचे थोर-थोर नेते येत आहेत. येत राहतील. अनेक पुढारी मला आपल्या छोटय़ा-छोटय़ा खेडय़ातील कार्यासंबंधी मोठय़ा आस्थेने विचारीत असतात.
अशी चिमुकली गावे आदर्श झालेली पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. पुढार्यांनी आमच्या गावाला भेट द्यावी हे भूषणावहच आहे, पण केवळ त्यासाठी आपले काम होता उपयोगी नाही.
नाहीतर त्यात तकलादूपणा-दिखाऊपणा येईल. आपल्याला कार्याची धुंदी चढली पाहिजे, आत्मसंतोषासाठी कार्य करता आले पाहिजे. भक्त पुंडलिकाने आईबापाची सेवा एकनिष्ठेने केली.
त्यावेळी देव वैकुंठातून त्याचेकडे आले नि म्हणाले, पुंडलिका, मी प्रसन्न झालो आहे, माझे दर्शन घे. पुंडलिकाने म्हटले – देवा! [Majhya Swapnatil Adarsh Gaon Marathi Nibandh]
Majhya Swapnatil Adarsh Gaon Marathi Nibandh
ज्या आईबापाच्या सेवेमुळे तुम्हाला येथे यावे लागले ती सेवा तुम्हा देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, ती मी कशी सोडू? अखेर आपली सेवा चालू ठेवूनच त्याने वीट फेकली आणि तिचेवर विठ्ठलाला तिष्ठत उभे राहणे भाग पाडले.
भक्त गोर्या कुंभाराने मडकी घडवून समाजाची सेवा केली. त्यात त्याची तन्मयता इतकी झाली होती, की स्वतःचे मूल मातीत तुडवले गेले तरी त्याला भान नव्हते.
मडके घडविण्यात त्याने कधीतरी बेईमानी किंवा चुकारपणा केला काय? या तन्मयतेने नि इमानदारीनेच त्याची भक्ती योगी-तपी लोकांहूनही श्रेष्ठ ठरली.
माझ्या स्वप्नातील आदर्श गाव मराठी निबंध
गावचे काम अशाच वृत्तीने आपण केले तर तीच खरी भक्ती ठरेल! कामातच नाम घेता येईल! किंबहुना देवाचे नाम घेण्यापेक्षाही देवाचे असे काम करणेच मी अधिक श्रेष्ठ समजतो.
ग्राम आदर्श करताना श्रमदान, समयदान इत्यादी गोष्टींची अत्यंत गरज भासते, शोषकखड्डे, धान्यभांडार इत्यादी व्यवस्थाकार्ये त्यात करावी लागतात. “Majhya Swapnatil Adarsh Gaon Marathi Nibandh”
ग्रामपंचायत नसताही लोकांनी मनात आणले तर सर्व सोयी ते करू शकतात. ग्रामपंचायत सत्तेने सुधारणा करून घेईल तर सेवामंडळ प्रेमाने समजावून करायला लावील.
Majhya Swapnatil Adarsh Gaon Marathi Nibandh
आपण गावाच्या सुधारणेकडे दुर्लक्ष करतो, सार्वजनिक कामांकडे कानाडोळा करतो, अशा वेळी सरकारला ग्रामपंचायत स्थापन करावी लागते आणि मग तुमचाच पैसा सक्तीने वसूल करून गावाच्या सुधारणेस लावला जातो त्यासाठी पैशाचे जागी दोन पैसे खर्च होतात, शिवाय गावात कलह माजतात.
सेवाप्रेम व सहकार्याने स्वयंप्रेरणेने केलेले काम टिकाऊ होते, तसे सत्तेने होत नाही. प्रेमाने लोकात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पूज्य विनोबांची ग्रामदानाची योजना अत्यंत महत्त्वाची आहे.
गावाच्या उन्नतीसाठी सर्वांनी कटिबद्ध होणे याचेच नाव आहे ग्रामदान ! सहकारिता, सद्भावना,सद्गुण, सत्प्रेम यांचे पवित्र वातावरण गावभर निर्माण करून गावाला एक आदर्श कुटुंब बनविणे हेच महान पुण्यकार्य आहे, हाच खरा धर्म आहे.
माझ्या स्वप्नातील आदर्श गाव मराठी निबंध
अशा धर्माने रसरसलेले छोटे-मोठे आदर्श गाव पाहून कोणाच्याही हृदयात नवचैतन्य निर्माण होईल असे कार्य आपण आपापल्या गावी करू शकलो तर तीर्थोतिर्थी जाण्याऐवजी लोक आपल्या गावाचे दर्शन घ्यायला वारंवार उत्सुकतेने येतील. श्रीगुरुदेव आपणास ही प्रेरणा व शक्ती देवो, हीच प्रार्थना !
प्रामाणिकतेने करणे काम।
हेचि आमुचे ईश्वरनाम।
सर्व जीवमात्रासी ऐक्यप्रेम।
धर्म हा आमुचा ।।
माझ्या स्वप्नांचे गांव. जिथे आजूबाजूला हिरवळ आणि समृद्धी असेल, जिथे कल-कल करते नद्यांचे पाणी स्वच्छ आणि निर्मल असेल. सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य असेल.
Majhya Swapnatil Adarsh Gaon Marathi Nibandh
शेतकरी संपन्न, समृद्ध आणि आत्मनिर्भर असावा . गावात कुठेही प्रदूषण होऊ नये, वातावरण स्वच्छ असले पाहिजे. प्रत्येकांचे घर एक सारखे असले पाहिजे, किंवा श्रीमंत नाही, गरीब नाही.
गावात गावात झाडे, झाडे आणि हिरवीगार पालवी असावी. गावातले सर्वजण दुश्मनीशिवाय एकत्र राहतात. एकमेकांना मदत करा. Majhya Swapnatil Adarsh Gaon Marathi Nibandh
लोकांना खेड्याजवळून लहान नोकऱ्या मिळतात जेणेकरून त्यांना गावापासून दूर जाऊ नये. गावाजवळ रुगणालयाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे.
माझ्या स्वप्नातील आदर्श गाव मराठी निबंध
“निळ्या खाडीच्या काठाला
माझा हिरवाच गाव
जगात मी मिरतो
त्याचे लावुनिया गावा !”
गावात आंबा, पींपळ, कडूलिबांची झाडे असावीत जेणेकरून प्रत्येकाला फळे आणि सावली मिळतील. हे माझे स्वप्नातल गाव आहे.
तर मित्रांना “Majhya Swapnatil Adarsh Gaon Marathi Nibandh” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “माझ्या स्वप्नातील आदर्श गाव मराठी निबंध” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.