Site icon My Marathi Status

माझी मातृभूमि निबंध मराठी | Majhi Mathrubhumi nibandh In Marathi

Majhi Mathrubhumi nibandh In Marathi – मित्रांनो आज “माझी मातृभूमि निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Majhi Mathrubhumi nibandh In Marathi

‘सुजलाम् सुफलाम्,
मलयज शीतलाम्
सस्यशामलाम्,
मातरम्, वन्दे मातरम् ॥

असे ज्या भूमीचे वर्णन केले आहे, ती भारतभू माझी मातृभूमी आहे. माझ्या भारतमातेला फार मोठी वैभवशाली ऐतिहासिक परंपरा आहे. अनेक मोठे राजे, सम्राट येथे होऊन गेले.

या प्राचीन देशाची संस्कृतीही महान आहे. आजही या संस्कृतीचे महात्म्य जगात शिरोधार्य मानले जाते. भारत हा वीरांचा देश आहे. Majhi Mathrubhumi nibandh In Marathi

छञपती शिवाजी महाराज मेवाडचा राणा प्रताप सिंह अशा वीरांना आजही कोणी विसरू शकत नाही. त्या प्राचीन युगात भारत ही सुवर्णभूमी होतो. ज्ञानभूमी होती.

माझी मातृभूमि निबंध मराठी

जगातील वेगवेगळ्या देशांतून माणसे येथे ज्ञान संपादन करण्यास येत होती. याचा उल्लेख अनेक चिनी प्रवाशांनी आपल्या लिखाणात केला आहे.

प्राचीन काळी तत्त्वज्ञान, अध्यात्म यांची भूमी म्हणून भारताला मान होता. जही जगातून अनेक विद्वान लोक भारतात अध्यात्माचा अभ्यास करायला येतात. Majhi Mathrubhumi nibandh In Marathi

अध्यात्माबरोबर आयुर्वेद, गणित आणि विज्ञानातील अनेक संकल्पना भारताने जगाला दिल्या आहेत. निसर्गही माझ्या भारतभूवर प्रसन्न आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी इत्यादी नदयांनी भारतभू सुजलाम् केली आहे.

Majhi Mathrubhumi nibandh In Marathi

त्यामुळे येथे सृष्टीची विविध रूपे पाहायला मिळतात, भव्य हिमालय आम्हापुढे उदात्ततेचा व महानतेचा आदर्शच उभा करतो. भारताच्या तिन्ही बाजूंना महासागर पसरलेला आहे.

सागर हा अथांग आहे. रत्नांचे आगर आहे. असा हा सर्वसमावेशक सागर आमच्या मनाला विशालता देतो. भारत भूमी ही वृक्ष, पाने, फुले व फळे यांच्या दृष्टीने समृद्ध आहे. ही विविधता भारत भूमीतील माणसांत आहे. Majhi Mathrubhumi nibandh In Marathi

भिन्न भाषा, भिन्न धर्म, भिन्न पंथ, भेन्न विचार यांनी भारतीय संस्कृती जलेली आहे. विविधतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे स्वरूप आहे. भारतीय संस्कृती म्हणजे सहस्र कळ्यांचे कमळच जणू!

माझी मातृभूमि निबंध मराठी

भारतात विविध भाषा बोलल्या जातात आणि या विविध भाषांतील साहित्यही समृद्ध आहे. भारतातील अनेक भाषांचा उगम असलेली संस्कृत भाषा ही आमची प्राचीन भाषा आहे. या भाषेत रामायण महाभारत 9 यांसारखे महान ग्रंथ आहेत.

भगवतगीता आजही जगाला मार्गदर्शक ठरत आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची कहाणीही जगाला स्फूर्तिदायक आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला अनेक नैसर्गिक संकटांना आणि परका आक्रमणांना तोंड द्यावे लागले. तरीही भारत अखंड राहिला. “Majhi Mathrubhumi nibandh In Marathi”

भारतात हरित क्रांती, श्वेत क्रांती आणि औदयोगिक क्रांती झाली. भारत कोणत्याही क्षेत्रात मागे राहिला नाही. आजच्या संगणक युगातही भारताने आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच मी अभिमानाने मायभूमी म्हणू शकतो की, माझी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे.

तर मित्रांना “Majhi Mathrubhumi nibandh In Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “माझी मातृभूमि निबंध मराठी” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Exit mobile version