Site icon My Marathi Status

माझी आजी निबंध मराठी | Majhi Aaji Nibandh in Marathi

Majhi Aaji Nibandh in Marathi – मित्रांनो आज माझी आजी निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.प्रत्येकाच्या आयुष्याच्या आईप्रमाणेच आजीला खूप महत्त्व आहे. आजी एक प्रेमळ गोडवा आहे, आजी मऊ सावलीची भावना देते.

माझी आजी निबंध मराठी

सकाळच्या वेळी स्वच्छ नऊवारी लुगडे नेसून, मोठे लालचुटुक कुंकू लावलेली, सदा हसतमुख असणारी अशी जी स्त्री आमच्या बागेत फुले काढीत असताना दिसते ना! तीच माझी आजी. आजी म्हणजे आमचे परब्रम्ह आहे. आजी रोज छान छान खाऊ देते. खूप गंमतीदार गोष्टी सांगते. कधी कुठे लागले तर हळूच फुकर घालते, तेल लावते, औषध लावते. मलमपट्टी सुद्धा करते.

रात्री तर आजीचा प्रेमळ हात अंगावर फिरल्यावाचून झोपच येत नाही. आजीची गोष्ट ऐकता ऐकता केव्हा झोप लागते तेच कळत नाही. आईबाबा रागावले की खुशाल आजीच्या मागे जाऊन दडावे. आजीचं संरक्षण मिळालं की आईबाबांचीच काय कुणाचीच भीती नको. ‘Majhi Aaji Nibandh in Marathi’

पण संध्याकाळचा परवचा, शुभं कराति, रामरक्षा जर कां राहिली तर मात्र खैर नाही हं! मग मात्र आजीकडून मिळतो तो धम्मकलाडू अन् चापटपोळीचा प्रसाद मुकाट्याने खावाच लागतो. अशी ही आजी- चार दिवस कुठे गेली तर मला मुळीसुद्धा करमत नाही.

मग माझ्या मोठ्या मोठ्या अक्षरात मी तिला सारखी पत्र पाठवून “घरी लवकर ये” असं कळवतो. तिला तरी कुठे माझ्यावाचून करमतं? ती सुद्धा चारच दिवसात परत येते.

Majhi Aaji Nibandh in Marathi

आजी म्हणते जन्मभर
काढल्या खस्ता केले कष्ट
‘तू’ म्हणजे त्या सगळ्याची
शेवट गोड असलेली गोष्ट

नुसतंच कथा पुराण झालं
देव काही दिसला नाही
कुशीत येतोस तेंव्हा कळतं
कृष्ण काही वेगळा नाही ….

माझे आई-बाबा दोघेही नोकरी करतात. त्यामुळे मी जास्त काळ माझ्या आजीच्याच सहवासात असते. माझी आजी चांगली शिकलेली असल्यामुळे तिच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळतात.

ठेगणी-ठुसकी व किरकोळ शरीरयष्टीची माझी आजी खूप प्रेमळ आहे. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ अशा या माझ्या आजीला काय येत नाही ते विचारा. Majhi Aaji Nibandh in Marathi

अभ्यासात तर ती हुशार आहेच. पुस्तकातल्या कविता ती माझ्याकडून पाठ करून घेते. तशीच अडलेली गणितेही ती लगेच सोडवून देते. तिची शिकवण्याची पद्धत इतकी छान आहे की प्रथम अवघड वाटलेला विषय नंतर एकदम सोपा वाटू लागतो.

माझी आजी निबंध मराठी

माझी आजी कविता करते. शाळेतील वेशभूषा स्पर्धेत गेल्या वर्षी तिने माझ्यासाठी ‘झाशीवाली रणरागिणी’ हे गाणे लिहून माझ्याकडून साभिनय म्हणून घेतले. तसेच मी दुसरीत असताना ‘ढमा ढमा ढोलकं’ हे डोंबारणीचे गाणे माझ्याकडून बसवून घेतले. दोन्ही वर्षी स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला.

याशिवाय संक्रांतीला हलव्याचे दागिने बनवणे, हलवा ठेवण्यासाठी छोटे बटवे तयार करणे, माझ्या बाहुलीसाठी छोटीसी गादी-उशी-पांघरूण तयार करणे, मण्यांच्या विविध वस्तू बनवणे असे आजीचे आवडते छंद आहेत.

या सर्व कामात माझी तिच्यामागे लुडबूड चालू असतेच. अशी ही माझी गुणी आजी सर्वांना मदत करायला तयार असते. म्हणून ती सर्वांनाच हवीहवीशी वाटते. Majhi Aaji Nibandh in Marathi

आजीची माया असतेच अशी
मनाच्या कुपीत जपून ठेवावी जशी
आजीची माया असतेच अशी
तूप रोटी साखर खावी जशी
आजीची माया असतेच अशी
मुरंब्याची गोडी वाढावी जशी

तू माझ्यासाठी सगळ्या कोड्यांची ती उत्तर आहेस जीच्याकडे माझ्या सगळ्या प्रश्नानांची Solutions असतात. आजपण तुझ्या कुशीत डोकं ठवून त्या कावळ्या चिमण्यांच्या गोष्टी ऐकायला आवडतं कारण ती वेगळीच Feeling असते तुझ्या बोलण्यात. कधी आईने मला मारलं की तू लगेच येतेस आणि कुठे लागलं तुला अस विचारुन आईला ओरडत बसतेस.

तुला माहीत आहे मी एवढी fit कसा आहे कारण मी जन्माला आल्यापासून तू माझी चांगली मॉलिश केली होतीस. तू आजपण तशीच आहेस एकदम गोड आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी तू अशीच नेहमी हसत रहा आणि मस्त रहा.. “Majhi Aaji Nibandh in Marathi”

Majhi Aaji Nibandh in Marathi

आजी माझी जशी चंद्रकोर…..
जगण्याचा तिचा अनुभव थोर
कपाळावर तीच्या आठी
शिकवितात जीवनातील

आडकाठींच्या गाठीभेठी
तशी धडधाकट आहे माझी आजी
बनवते ती चविष्ट भाकरी आणि भाजी

आजीच आमचा पाया आणि

आजीची आम्हा सगळ्यांवर अफाट माया……

तर मित्रांना “Majhi Aaji Nibandh in Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे माझी आजी निबंध मराठी  मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

आजी म्हणजे कोण?

आजी म्हणजे आई ची आई किव्हा वडिलांची आई असते.

Exit mobile version