Majhe Avadte Shikshak Nibandh in Marathi -: मित्रांनो आज माझे आवडते शिक्षक निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
लहान मूल एक मातीचा गोळा असते. त्याला आकार देण्याचे काम आई, वडील आणि गुरुवर्य करत असतात. मला माझ्या आईवडिलांप्रमाणेच घडविण्याचे कार्य माझ्या गुरुवर्यांनी केले.
Contents
Majhe Avadte Shikshak Nibandh in Marathi
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा,
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः |
गुरुचे स्थान हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणूस शिकतो. आपल्याला चांगले शिकवण्याचे व घडवण्याचे कार्य गुरु करतात.
आई ही मुलाला घडवणारी पहिली गुरु आहे. त्यानंतर त्या मुलाला चांगला विद्यार्थी व व्यक्ती म्हणून घडविण्याचे कार्य शाळेतील शिक्षक करतात. Majhe Avadte Shikshak Nibandh in Marathi
माझे आवडते शिक्षक प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यामध्ये त्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी एका गुरुची गरज असते. सर्वात प्रथम आपले आई वडील हे आपले गुरु आहेत, ते आपल्याला चालायला, बोलायला अशा अनेक गोष्टी शिकवतात. आपणास चांगले वळण लावतात. आपली प्रत्येक गरज पूर्ण करतात. कोणत्याही गोष्टीसाठी नकार देत नाहीत.
आई वडिलांन सोबत आपल्या आयुष्यामध्ये दुसरे एक महत्वाचे गुरु असतात ते म्हणजे आपले शिक्षक. शिक्षक हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहेत. शिक्षक आपल्याला जगभरची माहिती आपल्या पर्यंत पोचवतात.
माझे आवडते शिक्षक निबंध मराठी
मी जेव्हा पहिल्यांदा शाळेत गेले तेव्हा मला खूप भीती वाटत असायची कारण आपले आई वडील, सगे सोयरे हेच आपले जग असते. शाळेत गेल्यावर सर्व काही नवे होते खूप रडावं असे वाटायचे परंतु माझ्या शाळेतील शिक्षकानी खूप प्रेमाने मला शिकवले. “Majhe Avadte Shikshak Nibandh in Marathi”
आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा,
ध्येयापूर्तीसाठी मार्ग दाखविणारी दिशा,
कधी बिकट परिस्थितीत, प्रेमाची साय,
तर कधी पाठीवरील शाबासकीचा हात,
कधी कौतूकाचे गोड शब्द तर कधीहातावर बसणारा घडीचा मार.शिक्षक म्हणजे,
चांगले संस्कार करणारी मूर्ती
संकटकाळात धैर्य देणारी स्फूर्ती
चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवारा शिल्पकार,
जादूची छडी जी करते विदयाध्याची स्वप्न साकार.शिक्षक म्हणजे,
सजोल मूलभूत ज्ञानाचे भांडार,
दूर करी जीवनातील अज्ञातमय अंधार,
अन्यायाविरूदय आवाज उरविवारी तलवार,अनूभवातून निर्माण होणारा साक्षात्कार.
असे शिक्षकांचे आजन्म न फिटणारे उपकार…….
माझे आवडते शिक्षक निबंध मराठी
माझी वर्गशिक्षिका माझी आवडती शिक्षिका आहे. तिचे राहणीमान अगदी साधे आहे. ती नेहमी प्रसन्न व हसतमुख असते. तिला स्वस्थ बसायला आवडत नाही. तिच्या अवती भोवती नेहमी विद्यार्थ्यांचा गराडा असतो. फावल्या वेळात ती ग्रंथालयात विविध पुस्तके वाचण्यात दंग असते.
माझी वर्गशिक्षिका आम्हाला मराठी विषय शिकवते. आमच्या वर्गात मराठी मातृभाषा नसलेले बरेच विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांना हा विषय सुरवातीपासूनच अवघड वाटत आला आहे. या शिक्षिकेमुळे सर्वांना या विषयात गोडी निर्माण झाली आहे. या विषयाची आता त्यांना भिती वाटत नाही. ‘Majhe Avadte Shikshak Nibandh in Marathi’
या विषयाचा तास कधी संपू नये असे सर्वांना वाटते. माझ्या वर्गशिक्षिकेच्या शिकविण्याच्या पध्दतीमुळे आम्हाला कठीण विषयसुध्दा अतिशय सोपा वाटतो. मराठी विषयाव्यतिरिक्त अन्य विषयांमध्ये ती आम्हाला मदत करते. प्रत्येक लहान-सहान गोष्टी ती समजावून देते.
Majhe Avadte Shikshak Nibandh in Marathi
त्यामुळे ती आम्हाला मैत्रिणीसारखी वाटते. ती आमची वर्गशिक्षिका असल्याने तिचे आमच्याकडे बारकाईने लक्ष असते. ती स्वतः टापटीप असते व आम्हाला टापटीप, व्यवस्थित राहण्यास शिकवते. अभ्यासात मागे असणाऱ्यांकडे ती जास्त लक्ष देते. शिक्षणाची सुरुवात ही प्रत्येकाच्या घरापासून होते. लहानपणी आई मुलांवर संस्कार करते.
तसेच संस्कार शाळेत शिक्षक करतात. माझ्या वर्गशिक्षिकेने आम्हाला चांगल्या सवयी लावल्या आहेत. उदा. दुसऱ्यांना मदत करणे, इतरांचे कौतुक करणे, मोठ्यांचा आदर करणे इत्यादी. ती आम्हाला प्रत्येक बाबतीत पुढे आणू इच्छिते. त्यासाठी वेळोवेळी ती आम्हाला मार्गदर्शन करते. आमचा उत्साह वाढवते.
तर मित्रांना माझे आवडते शिक्षक निबंध मराठी हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे माझे आवडते शिक्षक निबंध मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ. ‘Majhe Avadte Shikshak Nibandh in Marathi’
शिक्षक दिन कधी साजरा करतात?
शिक्षक दिन 5 सप्टेंबर ला साजरा करण्यात येतो.
भारतामध्ये सर्वप्रथम शिक्षक दिन कधी साजरा करण्यात आला?
भारतामध्ये सर्वप्रथम सन १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.