महिला दिन निबंध मराठी | Mahila Din Nibandh Marathi
Mahila Din Nibandh Marathi – मित्रांनो आज आपण “महिला दिन निबंध मराठी” मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.
Contents
Mahila Din Nibandh Marathi
८ मार्च या दिवसाचं महत्त्व काय आहे? आणि महिला दिन साजरा करतो त्यामागचे नेकमे कारण काय आहे? चला आज आपण जाणून घेऊया ह्याच महिला दिना मागचा माहित नसलेला इतिहास! आपल्या या स्वतंत्र भारतात तुम्ही खूप वेळा पाहिले असेल महिलांची खूप प्रगती आणि त्यांच्या अधिकारांवर बोलताना.
त्यांचा सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी महिला दिवस आणि जागतिक महिला दिवस साजर केला जातो. ८ मार्च रोजी संपूर्ण जगात महिला दिवस साजरा केला जातो. चला तर आज पाहूयात 8 मार्च या दिवशी महिला दिन साजरा का केला जातो? महिलांनी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला होता. ‘mahila din nibandh marathi’
सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचने नुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. [Mahila Din Nibandh Marathi]
महिला दिन निबंध मराठी
८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा “जागतिक महिला-दिन” म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या.
त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन हा 8 मार्च 1943 ला साजरा झाला. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी जागतिक महिला दिवस साजरा करताना एक विशेष थीम बनवण्यात येते असते. जागतिक महिला दिनाची पहिली थीम सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लानिंग फॉर द फ्युचर ठेवली होती. “mahila din nibandh marathi”
१९७१ साली ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
Mahila Din Nibandh
बदलत्या सर्व सामाजिक, आर्थिक, राजकीय, किंवा सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही सुद्धा बदलत गेल्या. बॅंका, कार्यालयांमधूनही ८ मार्च हा दिवस साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.
काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात. इटली मध्ये या दिवशी पुरुष महिलांना पिवळ्या मिमो सासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात. महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. Mahila Din Nibandh Marathi
तर मित्रांना “Mahila Din Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “महिला दिन निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो?
८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
पहिला महिला दिन कधी साजरा झाला?
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन हा 8 मार्च 1943 ला साजरा झाला.