Site icon My Marathi Status

महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Nibandh in Marathi

 Mahatma Gandhi Nibandh in Marathi: मित्रांनो आज आपण महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

सत्य आणि अहिंसा परस्परांपासून अविभाज्य आहेत, असे गांधीजी मानतात तरीसुद्धा अहिंसा हे साधन व सत्य हे साध्य आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे; आणि त्यामुळेच अहिंसा हे सत्यान्वेषी मानवाचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य ठरते, असे गांधींना वाटते. ‘Mahatma Gandhi Nibandh in Marathi’

Mahatma Gandhi Nibandh in Marathi

अहिंसा जाणीवयुक्त क्लेश

महात्मा गांधी निबंध मराठी

किंबहुना, त्यांची अहिंसा ही दुर्बलांची अहिंसा नव्हतीच. उलट भारताला आपल्या आत्मिक-आध्यात्मिक सामर्थ्याची जाणीव व्हावी आणि आत्मविश्वासपूर्वक स्वातंत्र्यलढ्यात तो उभा राहावा,अशीच गांधीजींची अपेक्षा होती.

शस्त्रास्त्र-शिक्षणाची त्यासाठी गरज नाही. ती गरज वाटणे हेच गांधींच्या मते आपल्या दौर्बल्य भावनेचे प्रतीक आहे. आपल्याला आत्मा असून तो अमर आहे. तो सर्व प्रकारच्या प्राकृतिक दुर्बलतेवर मात करू शकतो व संपूर्ण जगाशी टक्कर देऊ शकतो,याची त्यांना भारताला जाणीव करून द्यावयाची होती.

अहिंसेला गांधीजी सर्वश्रेष्ठ बल मानीत असत.  त्याला ते ‘आत्मबल’ किंवा ‘माणसातील ईश्वरी बल’ असे संबोधतात. हे निश्चितच सत्य आहे की, अपूर्ण असलेला माणूस अहिंसेचे पूर्ण आकलन करू शकत नाही. तिचे प्रखर तेज त्याला सहन करता येत नाही; परंतु तिचा अत्यल्प अंशसुद्धा आपल्यात जेव्हा जागृत होतो, तेव्हा चमत्कार घडून येऊ शकतो. ज्या माणसाच्या अंगी अहंभाव, अहंमन्यता असेल तेथे अहिंसेचे वास्तव संभवत नाही.  विनम्रतेखेरीज अहिंसा अशक्य आहे.

Mahatma Gandhi Nibandh in Marathi

अर्थात, ही विनम्रता म्हणजे दुबळेपणा नक्कीच नव्हे!  संपूर्ण साम्राज्याला आव्हान देणारे धैर्य एका व्यक्तीच्या ठायी निर्माण करणाऱ्या अहिंसेला दुर्बलता कसे समजता येईल? अशी अहिंसा दुर्बल असूच शकत नाही, तसेच ती दुर्बलांचीही असू शकत नाही. दुसऱ्याला न मारता मरण्याचे शौर्य फक्त अहिंसेचे तत्त्व अंगी बाणवणाराच दाखवू शकतो.

प्रतिशोध घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुरुषार्थापेक्षा अपराध्यास क्षमा करण्यासाठी अधिक पुरुषार्थ हवा असतो, हेच खरे! गांधीजी अहिंसेला शौर्याची चरणसीमा मानतात. हिंसक माणूस एक वेळ अहिंसक होऊ शकेल; पण भेकड माणसाने अहिंसेचा अंगीकार करणे सर्वथैव अशक्य आहे, असे गांधीजींनी प्रतिपादले आहे. ही अहिंसेच्या मार्गावरून जाण्याची पहिली कसोटी होय. अहिंसेच्या मार्गावरून जाणे, हे दुर्बलांचे काम नव्हेच नव्हे! Mahatma Gandhi Nibandh in Marathi

तर मित्रांना तुम्हाला “Mahatma Gandhi Nibandh in Marathi” हा मराठी निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.

महात्मा गांधींची घोषणा काय आहे?

भारत छोडो भाषण हे महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलन सुरू करताना दिलेले भाषण आहे. याच भाषणात त्यांनी भारतीयांना निर्धाराचे आवाहन करताना ‘करो किंवा मरो’ चा नारा दिला.

गांधींचा मुख्य संदेश काय आहे?

गांधींचा विश्वास होता की प्रत्येक धर्माचा गाभा सत्य (सत्य), अहिंसा (अहिंसा) आणि सुवर्ण नियम आहे.

Exit mobile version