Site icon My Marathi Status

Mahalaxmi Temple Dahanu | महालक्ष्मी मंदिर डहाणू

महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ चारोटीपासून सुमारे 4 किमी अंतरावर मुंबई अहमदाबाद highway ला लागून असलेल्या विवळवेढे या गावात आहे. मंदिराची प्रमुख देवी महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी लांबून लोक येत असतात. महालक्ष्मी महादेवी मातेच्या मंदिरामुळे या स्थानिक तीर्थक्षेत्राला बरीच लोकप्रियता मिळाली आहे. देवी महालक्ष्मी स्थानिक आदिवासींची तसेच अनेक कुटुंबाची कौटुंबिक देवता आहे.

Mahalaxmi temple dahanu History | महालक्ष्मी मंदिर इतिहास आणि आख्यायिका

असं म्हणतात कि एकेकाळी Mahalaxmi aai च हे मंदिर अतिशय श्रीमंत होते. १००८ या सालामध्ये मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटले होते. त्या वेळी त्याने खूप सारा किमती ऐवजी लुटून नेला होता. असेही म्हणतात की गझनीच्या महम्मदाने हे मंदिर लुटून आणि उध्वस्त करून तिथे मशीद बांधली होती. त्यानंतर काही काळाने इथे पुन्हा मंदिर बांधले गेले. पंजाबचा प्रदेश स्वतंत्र झाल्यानंतर राजा रणजितसिंहाने मंदिरावर सोन्याचा कळस चढवला होता.

पेशवाईच्या काळात येथील रहिवासी सातवी कुटुंबातील कान्हा ठाकूर यांच्या स्वप्नात महालक्ष्मी देवी आली. तिने आपण आताच्या महालक्ष्मीच्या मुसळ्या डोंगरावर आहे असे सांगितले. तेव्हापासून सातवी कुटुंब देवीची पूजा करतात आणि मंदिराच्या डोंगरावर झेंडा लावतात.

देवीच्या आख्यायिकेनुसार असे म्हणतात कि Mahalaxmi temple dahanu मध्ये महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी एक आदिवासी गरोदर स्त्री वार्षिक यात्रेच्या वेळी देवीच्या गडावर जात असतांना तिच्या पोटात कळा आल्या आणि तिला डोंगरावर जाण्याचा पुढचा मार्ग  चालणे कठीण झाले. देवीचे दर्शन होणार नाही म्हणून तिने देवीकडे दया याचना केली.

त्यावेळी देवीने दृष्टांत देऊन सांगितले की मी गडाच्या पायथ्याशी आहे तेथे तू दर्शनाला ये. त्या गरोदर मातेला  गडाच्या पायथ्याजवळ येताच देवीच्या मूर्तीचे दर्शन झाले. त्यानंतर पुढे या जागी आई महालक्ष्मी मातेचे मंदिर बांधण्यात आले. देवी हि नवसाला पावते म्हणून दरवर्षी अनेक लोक येथे देवीजवळ नवस कारण्यासाठी आणि  फेडण्यासाठी येत असतात. असेच गुजरातमधील सुरतचे भाविक यांचा एक नवस पूर्ण झाला म्हणून त्यांनी तिथे धर्मशाळा बांधून दिली.

About Mahalakshmi temple dahanu | महालक्ष्मी मंदिर डहाणूबद्दल

mahalaxmi temple dahanu highway लगत असून ते खूप भव्य आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर झेंड्याचा एक स्तंभ असून त्याच्यावर असून त्याच्या वरील झेंडा हा नेहमीच फडकत असत्तो . तसेच मंदिराच्या समोर एक सभामंडप आहे. आणि प्रवेश करताना दोन दीपमाळा असून त्यांच्या मध्ये होम साठी वापरला जाणारा कुंड आहे. यामध्ये प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला  व वद्य अष्टमीला होम असतात.

देवीचे मुख्य स्थान हे मंदिराच्या पश्चिम दिशेला असलेल्या पर्वतावर आहे. हे स्थान जमिनीपासून सुमारे १४०० फूट उंच पर्वतावर आहे. त्यामुळे त्यावेळेस मंदिर उभारणीसाठी लागणारी साधन सामग्री जसे कि विटा, रेती, मेटल्स,सिमेंट, लाकडे, पाणी व बांधकामाला लागणारी विविध प्रकारची अवजारे आणि साधने हि मजुरांनी डोक्यावर घेऊन चढवली. त्यामुळे या मंदिराच्या बांधकामाला जवळपास सहा वर्षांचा कालावधी लागला. देवीचा गडाच्या मध्यभागी लाकडी खांबावर प्रत्येक यात्रोत्सवाला ध्वज लावण्याची परंपरा आहे हि परंपरा खूप जुन्या काळापासून चालत आली आहे .

मंदिरावरील झेंडा सातवी यांच्या घराण्यातील व्यक्ती लावतात. देवीचा हा डोंगर अणकुचीदार आकाराचा आहे. आई महालक्ष्मी च्या या गडावर सुमारे २५ फूट व्यास असलेला सपाट भाग आहे. मंदिराजवळून  शिखरावर चढण्यासाठी तुम्हाला सुमारे १:३० ते २  तासांचा प्रवास करावा लागेल.

देवीच्या गडाच्या पायथ्याखालील मंदिरापासून डोंगरावर जाताना पुढे जाण्‍यासाठी काँक्रिटचा रस्‍ता बांधलेला आहे. काही अंतर पुढे गेल्यावर मात्र तेथून पुढील मार्ग थोडा खडतर चढण असलेला आहे. पुढे गेल्यावर मग डोळ्यासमोर हनुमानाचे मंदिर नजरेस पडते. तेथून Mahalaxmi temple dahanu मधील मुख्‍य मंदिर जवळपास पाच ते सात मिनिटांच्‍या अंतरावर आहे. डोंगरावरील मंदिराजवळ पोचल्‍यावर आजूबाजूला असलेल्या सुंदर निसर्गाला आपण बघू शकतो हा नजर खूपच सुंदर असतो.

मंदिराच्‍या आत मधील गाभारा संगमरवरी दगडाचा बनलेला आहे. आणि त्याच्यामध्ये  गणपती, महालक्ष्मी, अंबामाता, राम-लक्ष्मण, सीता व राम, सरस्वती, समोर हनुमान व शंकराची पिंड अशी विविध देवतांची मंदिरे आपणास बघायला मिळतील.

Mahalaxmi temple dahanu च्या गाभा-याच्‍या एका बाजूला एक लहान गुहा आहे. तुम्हाला महालक्ष्मी देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी त्या गुहेतून पुढे जावे लागेल. गुहेचा आकार हा खूपच लहान आहे. त्‍यामुळे तुम्हाला आतमध्ये जाताना सरपटत जावे लागेल.  डोंगरावरील देवीच्या स्थानाजवळ देवीची गुहा आहे असे म्हणतात कि त्या गुहेमध्ये वाघाचा वास आहे.

Mahalaxmi temple dahanu Festivals | महालक्ष्मी मंदिर सण आणि उत्सव

Mahalaxmi yatra dahanu | महालक्ष्मी यात्रा 

प्रत्येक वर्षी येथे फाल्गुन वद्य अष्टमीपासून ते चैत्र वद्य अष्टमीपर्यत dahanu mahalaxmi mandir येथे पंधरा दिवस यात्रा-उत्सव भरतो. या यात्रेला `महालक्ष्मी यात्रा`असेहि म्हणतात. हि यात्रा खूप भव्य असते. तसेच या यात्रेत हजारो लोक सहभागी होतात.  महालक्ष्मी आई च्या उत्सवाची हि यात्रा मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या खूप मोठा मैदानात भरते.  त्यासाठी महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त मंडळ प्रशासकीय भूमिका बजावते. या यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रदेशांमधून अनेक लोक मोठ्या प्रमाणात आशीर्वाद घेण्यासाठी आणि देवीच्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी येतात

यात्रेमध्ये अनेक मनोरंजक सुविधा असतात जसेकी आकाशी पाळणे, The Well of Death, तसेच येतेच मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची छोटी मोठी दुकाने स्टॉल्स असतात, जेथे तुम्ही खाण्याच्या वस्तू, विविध प्रकारची खेळणी, कपडे, घरघुती सामान, सजावटीचे सामान, आभूषणे इत्यादी सर्व कमी किमतीमध्ये विकत घेऊ शकता.

या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून यात्रा परिसरातील सर्व जागेची स्वच्छता करण्यात येते तसेच शासनाद्वारे येथे आरोग्य सुविधा , शौचालय सुविधा , पिण्याचे पाणी सुविधा आदी सुविधा दिल्या जातात. तसेच लांब

अंतरावरन येणाऱ्या भाविकांसाठी डहाणूच्या एसटी आगाराकडून विशेष आणि वाढीव संख्येत बस सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यात्रेदरम्यान वाईट प्रकारांना आळा घालण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष निगराणी तसेच चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जातो.

mahalaxmi temple dahanu मधील या यात्रेची तयारी हि ज्येष्ठ प्रतिपदेपासून चाललेली असते. अहमदाबाद महामार्गावर असलेल्या आणि नवसाला पावणाऱ्या श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला यात्रेच्या वेळेस मुंबई, ठाणे, कोकण, पूणे, सातारा असा संपूर्ण महाराष्ट्र तसेच  गुजरात, दादरा नगरहवेली या राज्यातून सुद्धा अनेक लोक आईच्या दर्शनासाठी तसेच आईला केलेला नवस फेडण्यासाठी आणि नवस करण्यासाठी  येत असतात . यामुळे चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रे वेळेस देवीच्या  दर्शनासाठी मोठी गर्दी उसळलेली असते.

१५ दिवस चालणाऱ्या mahalakshmi temple dahanu मधील महालक्ष्मी यात्रेसाठी दरवर्षी दीड ते दोन लाख भाविक येतात. यात्रेदरम्यान लाखो भाविक महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी येत असतात आणि आपल्याला लागणाऱ्या वास्तू स्वस्त किमतीमध्ये त्यांना येथे असलेल्या दुकानांमधून घेता येतात त्यामुळे येथे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते आणि स्थानिकांना रोजगार मिळतो.

ह्या यात्रेत फिरायला खूपच जास्त मजा येते त्यामुले एकदातरी या यात्रेत सहभागी होऊन जा, आणि हहा अनुभव कसा होता ते सुद्धा आम्हाला कळवा.

पितृबारस | Pitrubaras

dahanu mahalaxmi mandir द्वारे भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात पितृबारस हा सण साजरा केला जातो. त्या दिवशी सूद्धा मंदिरात एका दिवसाची यात्रा भरते व उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी सर्व भाविक बांधव आपल्या जमिनीवर पिकणारी पिके जसे की तांदूळ, काकड्या, डांगर, चवळी, खुरासन, तीळ इत्यदी देवीला नैवेद्य दाखवतात.

वाघबारस | Waghbaras

हा उत्‍सव पुजार्‍याच्‍या घरी साजरा केला जातो. वाघबारस हा उत्सव मुख्यतः दिवाळीनंतर साजरा केला जातो. त्या दिवशी परिसरातल्या देवदेवतांची पूजा केली जाते. बारशीत वंशपरंपरेने जतन केलेली जुनी, दुर्मीळ देवदेवतांची चित्रे आणि  मुर्त्यांची पूजा केली जाते. त्या दिवसांत dahanu mahalaxmi mandir मधील भाविक पुजा-याच्‍या घरी जमून देवीची हि पूजा करतात आणि आशीर्वाद घेतात

Other Festivals | इतर सण आणि उत्सव 

‘महालक्ष्मी यात्रा’  व्यतिरिक्त अनेक सण आणि उत्सव mahalaxmi temple dahanu मध्ये साजरे केले जातात जसे किदिवाळी, दसरा, चैत्र आणि आश्विन नवरात्रीचे उत्सव सुद्धा मंदिराद्वारे साजरे केले जातात. तसेच चैत्र  महिन्यातील नवरात्री सुद्धा साजरी केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्री हा सण देवी दुर्गाला समर्पित आहे आणि हा सर्वात प्रसिद्ध उत्सव मानला जातो. त्यामुले हा सण सुद्धा मंदिरद्वारे मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.

How to reach Mahalaxmi temple dahanu | कसे पोहचावे

BY AIR

mahalaxmi temple dahanu मध्ये जाण्यासाठी विमानाने सर्वात जवळचे विमानतळ म्हणजेच मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हे आहे. हे विमानतळ पालघर जिल्हापासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहे. तर mahalakshmi temple mumbai पासून सुमारे 120 किमी च्या अंतरावर आहे.

BY TRAIN

पालघर जिल्हामधील डहाणू स्टेशन जवळून महालक्ष्मी मंदिर हे अंतर सुमारे 27 किमी आहे. पुढचा प्रवास तुम्ही बस किंवा टॅक्सी द्वारे करू शकता.

BY ROAD

महालक्ष्मी मंदिर येथे जाण्यासाठी अनेक आजूबाजूच्या प्रदेशातून अनेक बस उपलब्ध आहेत. मुंबई, ठाणे, डहाणू आणि नाशिक ते पालघर, महालक्ष्मी मंदिर या ठिकाणांहून पालघर मध्ये नियमित बस येत असतात.

Dahanu Mahalaxmi Mandir timings

मंदिर उघडणे (सकाळ) 5:00 AM
मुख्य आरती (सकाळ) 7:00 AM
धूप आरती (संध्याकाळ) 6:30 PM
मुख्य आरती (संध्याकाळ) 7:30 PM
शेजारती (रात्री) 10:00 PM
मंदिर बंद (रात्री) 10:00 PM
Dahanu Mahalaxmi Mandir timings

mahalaxmi temple dahanu contact number & Address

mahalaxmi temple dahanu contact number
At :- Vivalwedhe, Post :- Charoti, Taluka :- Dahanu, Dist:-Palghar, state :- Maharatra, Pin Code :- 401602
Phone : +91 9226632350
Website : www.mahalaxmidahanu.com
Email : info@mahalaxmidahanu.com
mahalaxmi temple dahanu contact number & Address

FAQ

how to reach dahanu mahalaxmi temple ?

There are of Lot Auto Rickshaws and taxies are available from Dahanu Railway Station to mahalaxmi temple

mahalaxmi temple open tomorrow ?

Yes, mahalaxmi temple open tomorrow you can visit temple from 5:00 AM to 10:00 PM

Dahanu Mahalaxmi yatra 2023 date ?

there Is no Update about Mahalaxmi yatra 2023 for now, we will update about this ASAP

What are the Dahanu Mahalaxmi Mandir timings ?

you can visit Dahanu Mahalaxmi Mandir from 5:00 AM to 10:00 pm

Exit mobile version