Site icon My Marathi Status

लोकमान्य टिळक बद्दल माहिती मराठीत – Lokmanya Tilak Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक बद्दल माहिती मराठीत – Lokmanya Tilak Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात.

१] पूर्ण नाव – बाळ गंगाधर टिळक
२] जन्म – २३ जुलै इ.स. १८५६ रत्‍नागिरी (टिळक आळी), रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
३] मृत्यू – १ ऑगस्ट इ.स. १९२० पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
४] आई – पार्वतीबाई टिळक
५] वडील – गंगाधर रामचंद्र टिळक
६] संघटना – अखिल भारतीय काँग्रेस

लोकमान्य टिळक परिचय – Lokmanya Tilak Information in Marathi

शिवाजीमहाराजांनंतर संपूर्ण भारतात लोकमान्य टिळकांएवढा युगप्रवर्तक महापुरुष दुसरा झालाच नाही. लोकमान्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगांव येथे झाला.

पार्वतीबाई व गंगाधरपंत ही त्यांच्या माता व पित्यांची नावे, अत्यंत तीव्र बुध्दिमत्ता, कणखरपणा, निर्भयता या गुणांमुळे ते सर्वच भारतीयांच्या गळ्यातील कंठमणी बनले. त्यांचे पूर्ण नांव बळवंत गंगाधर टिळक.

बालपणापासूनच टिळकांचा गणित व संस्कृत या विषयांचा अभ्यास चांगला होता. त्यावेळचे सुप्रसिध्द गणिततज्ञ केरुनाना छत्रे ह्यांचे टिळक हे आवडते विद्यार्थी होते.

पुण्याच्या डेक्कन कॉलेजात परीक्षेत त्यांना अपयश आले म्हणून शरीर सुधृढ व्हावं म्हणून विध्यार्थीदशेत एक वर्ष व्यायाम करण्यासाठी घालवलं होतं ही पण अत्यंत विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

पौष्टिक आहार आणि खूप व्यायाम करुन शरीर सुदृढ केले. शिक्षण संपल्यावर देशसेवा करायचे ठरविले. वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजे १८७१ साली त्यांचा विवाह सत्यभामाबाईशी झाला.

पुढे ते गणित विषय घेऊन बी.ए. झाले. नंतर त्यांनी १८७९ साली एल.एल.बी. ची पदवी घेतली. त्यांना तीन मुले व तीन मुली झाल्या.

बहुविध क्षेत्रांतील कार्य – Lokmanya Tilak Information in Marathi

शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करतांना, तरुणांमध्ये देशाचे प्रेम निर्माण व्हावे म्हणून, राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रथम शाळा काढण्याचा निर्णय घेतला.

टिळकांनी १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा सुरु केली, त्याचबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी स्थापना केली. आणि २ जानेवारी १८८५ रोजी फग्युसन कॉलेज काढले. ह्यासाठी त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकर, आगरकर, यांनी साहाय्य केले.

लोकशिक्षण आणि जनजागृतीसाठी टिळक आणि आगरकरांनी वृत्तपत्र सुरु करण्याचा बेत निश्चित केला. २ जानेवारी १८८१ रोजी मराठा आणि ४ जानेवारी १८८१ रोजी केसरी चा अंक प्रसिध्द करण्यात आला.

केसरीतून ते आपले विचार निर्भयपणे व निःपक्षपातीपणे मांडीत. त्याकाळत इंग्रज देशाची लूटमार करीत होते. समाजिकदृष्टया देश मागासलेला होता. संबंध समाज निरनिराळे लोकभ्रम व विचित्र रुढींनी ग्रस्त झाला होता. अस्पृश्यता कठोरपणो पाळती जात होती.

स्त्री गुलामगिरीत वावरत होती. अशा परिस्थितीत टिळक व आगरकरांनी केसरी व मराठा या वर्तमानपत्राव्दारा जनतेत जागृती निर्माण केली.

जनतेच्या अन्यायाला वाचा फोडली पण त्याचवेळी राजकीय सुधारणा आधी की, सामाजिक सुधारणा आधी याबद्दल टिळक आणि आगरकरांनी यांच्या मतभेद निर्माण झाले ते विकोपाला गेले. टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला.

केसरीत त्यांनी रॅडच्या खुनानंतर दोन जहाल लेख लिहिले. त्यांना १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. पण काही पाश्चात्य विद्वानांच्या विनंतीनुसार ही शिक्षा ६ महिन्यांची करण्यात आली.

इ.स. १९१६ साली डॉ. अॅनी बेझंट यांच्या सहकार्याने त्यांनी होमरुल लीग ही हिंदस्वराज्य संघ स्थापन केला. त्यांच्या राष्ट्रजागरणाच्या कार्याला पायबंद बसावा म्हणून, केसरीतील अग्रलेखांचे निमित्त करुन त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला ब्रिटिश सरकारने भरला व तो चांगला गाजला. त्यांना ६ वर्षे साध्या कैदेची शिक्षा दिली गेली.

ब्रह्मदेशातील (म्यानमार) मंडाले येथे त्यांना पाठविण्यात आले. मंडालेच्या तुरुंगात असताना, त्यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले. अत्यंत प्रतिकूल वातावरणात त्यांनी जगप्रसिध्द असा गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला १९१४ च्या जूनमध्ये त्यांची सुटका झाली. विविधांगी व राष्ट्रजागृती निर्माण करणारे टिळकांचे कार्य होते.

राजकारणाशिवाय त्यांनी ज्योतिष आणि खगोलशास्त्रात मौलिक संशोधन केले. वेदांचे उत्तरध्रुव प्रदेशातील मूळस्थान, ओरायन यांसारखे मूलगामी ग्रंथ त्यांनी लिहिले.

होमरुल लीगच्या प्रसारासाठी टिळकांनी देशभर दौरा काढला. हजारो व्याख्याने दिली. लेख लिहिले या चळवळीसंबंधी केलेल्या एका भाषणाबद्दल सरकारने टिळकांकडून चाळीस हजार रुपयाचा जामीन मागितला. पण त्यावेळी स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच असे तेजस्वी उद्वार त्यांनी काढले.

टिळकांनी त्यांच्या आचार विचारसरणीच्या प्रसारासाठी राष्ट्रमत नावाचे दैनिक प्रथमच मुंबईला सुरु केले. पुण्यात दारुबंदीचे कार्यही त्यांनी केले. त्यामुळे दारु पिणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि दारुच्या दुकानांची आर्थिक नाकेबंदीही झाली. १९१६ साली लखनौ काँग्रेस झाली.

हिंदू- मूस्लिम यांच्यामध्ये वैर निर्माण करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. त्यावेळी हिंदू – मूस्लिम यांनी एकत्र यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली व ती पूर्ण झाली. समाजात जागृती व्हावी आणि परदास्याची जाणीव लोकांना व्हावी म्हणून गणोशोत्सव आणि शिवजयंती उत्सव टिळकांनी सुरु केले.

दोन्ही उत्सव कमी काळातच लोकप्रिय झाले आणि ते आजपर्य चालू आहेत. ब्रिटिशांच्या नीतीविरुध्द त्यांनी भारतात आंदोलन सरु केले. टिळकांनी वृत्ती स्थितप्रज्ञासारखी होती.

भारतीय असंतोषाचे जनक म्हणून टिळकांना लोक म्हणू लागले. अतिशय कणखर व्यक्तिमत्व , स्थितप्रज्ञ स्वभाव, देशभक्तीने प्रेरित होऊन कार्य करण्याची निष्ठा हे गुण असणाऱ्या क्रांतिविरांच्या या महामेरुची प्राणज्योत १ ऑगस्ट १९२० ला मावळली. घोषणावाक्य: स्वातंत्र्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, व तो मी मिळविणारच.

लोकमान्य टिळक बद्दलची एक गोष्ट – Lokmanya Tilak Information in Marathi

एकदा वर्गात शिक्षकांनी मुलांना विचारले की मुलांनो समजा तुमच्या वर जर आभाळ कोसळले तर तुम्ही काय कराल. वर्गातली सगळी मुलं तर घाबरूनच गेली.

आभाळ कोसळणं किती भयंकर गोष्ट. हे आकाशातले मोठं मोठे ग्रह तारे जमिनीवर पडले तर सगळं संपूनच जाईल ना. कुठं पळायचं, कुठं लपायच. कोणाला काहीच सुचेना. अशा वेळी, लोकमान्य टिळक उभे राहिले आणि ताठ मानेने म्हणाले,

गुरुजी जर आभाळ कोसळून पडलं ना तर मी त्यातले चंद्र, सूर्य, तारे जमा करून घेईन. आणि त्यांचा माझ्या देशासाठी वापर करेन. असं आभाळ कोसळलं असताना ज्यांच्या मनात चंद्र, सूर्य, तारे वेचण्याचा विचार तात्काळ निर्माण होतो त्या लोकमान्य टिळकांचा दुर्दम्य आत्मविश्वास या गोष्टीतून दिसतो.

काय शिकलात?

आज आपण लोकमान्य टिळक बद्दल माहिती मराठीत – Lokmanya Tilak Information in Marathi पहिली आहे, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version