हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला पाणडुबी – Little Grebe Information in Marathi देणार आहे. तर चला बघुयात.
१. | मराठी नाव : | पाणडुबी, लांडे बदक, टिबुकली, शेंदया. |
२. | इंग्रजी नाव : | Little Grebe or Dabchick (लिटल ग्रीब किंवा डॅबचीक) |
३. | वजन : | १७० ग्राम. |
४. | आकार : | २३ सेंमी. |
माहिती – Little Grebe Information in Marathi
वर वर पाहता बदकासारखा दिसणारा हा पाणपक्षी गावतळी, नद्या, जलाशय आणि तलावावर सहजपणे दिसतो. शेपूट नसलेली पाणडुबी हि जा कुणी तिच्या पाठीमागे मागे लागलं, तर लगेच पाण्यात बुडी मारते आणि पाण्याखालून पोहत दुसऱ्या बाजूने निघते.
बाहेर निघाल्यावर दुसरीकडेच दिसते. पाणडुबी या पक्षाचा मुख्य खान म्हणजे पाण्यातील किडे, झिंगे, बेडूक, खेकडे हे असतं. जोडी जोडीने किंवा थव्यांसोबत राहणाऱ्या या पक्ष्याचं जीवन पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असतं.
पुरामळे किंवा पाण्याच्या जागा सुकू लागल्या की हे पक्षी स्थानिक स्वरुपाचं स्थलांतर करतात. विणीचा हंगाम पावसावर आणि पाण्याच्या विशिष्ट पातळीवर अवलंबून असतो.
पाणडुबीची पिल्लं अंड्यातून बाहेर पडल्यावर अवघ्या चोवीस तासात पोहू लागतात आणि स्वतःचं खाद्य शोधू लागतात. या पक्ष्यांच्या पायांना कातडीची झालर असते. म्हणून त्यांना पाण्यात सराईतपणे पोहता येतं.
बदकांप्रमाणे त्याच्या पायांना पडदे नसतात. पक्षीनिरीक्षणास ज्या पक्ष्यापासून सुरुवात करावी असा हा सहजपणे दिसणारा पक्षी आहे. या पक्ष्याचं घरटं म्हणजे पाणवनस्पतींचा तरंगणारा ढिगारा असतो.
ज्यावेळी या पक्ष्याला घरट्यात अंडी असताना घरटं सोडून जायचं असतं त्यावेळी हा पक्षी आपली अंडी पाणवनस्पतींच्या पानांनी झाकून टाकतो. आपल्या परिसरात सहजपणे आणि संपूर्ण वर्षभर दिसणारा हा पाणपक्षी शिकाऱ्यांमध्ये ‘पानकोंबडी’ म्हणून प्रसिद्ध आहे.
विणीच्या हंगामात म्हणजे साधारण एप्रिल ते ऑक्टोबर या काळात पाणडुबीचं डोकं आणि मानेवरची पिसं गडद तपकिरी होतात. पोटाकडची पिसं पांढरट असतात. ही पिसं रेशमासारखी मऊ असतात. पाणडुबीला स्वतःची पिसं खायची आणि आपल्या पिल्लांना भरवण्याची विचित्र सवय असते. त्यामुळे कदाचित् पचनाला मदत होत असावी.
काय शिकलात?
आज मी तुम्हाला पाणडुबी – Little Grebe Information in Marathi माहिती दिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.