Krishna Janmashtami Nibandh Marathi – मित्रांनो आज “कृष्णा जन्माष्टमी निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
Contents
Krishna Janmashtami Nibandh Marathi
“दहयात साखर साखरेत भात
उंच दहीहंडी उभारून
देऊ एकमेकांना साथ
जोशात साजरा करू श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण”
श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस श्रावण महिन्यात वय अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून त्यादिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो. रात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या मूर्तीला पाळण्यामध्ये ठेवून त्याला दही-दुधाचा प्रसाद दाखवला जातो श्रीकृष्ण जन्मावर आधारित पाळणे आणि गवळण गाऊन श्रीकृष्णाची पूजा आणि आरती केली जाते. [Krishna Janmashtami Nibandh Marathi]
कृष्णा जन्माष्टमी निबंध मराठी
हा जन्मोत्सव भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडली जाते. या दिवसाला गोपाळकाला असेही म्हटले जाते.
यादिवशी बालगोपालांचा गट दहीहंडी फोडण्यासाठी तयारच असतो. दहीहंडीसाठी आजूबाजूच्या मंडळींकडून वर्गणी जमा केली जाते. या वर्गणीतून मोठी मातीची हंडी आणली जाते. या हंडीत दही भरले जाते. हंडीच्या बांधलेल्या मजबूत दोराला हंडीच्या दोन्ही बाजूंनी केळी आणि इतर पाच फळे बांधली जातात.
फुलांच्या माळा तसेच फुगे लावले जातात. हंडीभोवती फुलांचे हार, रूपयांच्या नोटा बांधल्या जातात. हंडीला अतिशय सुंदररीत्या सजवले जाते. अशी पूर्वतयारी झाली की वेळ येते प्रत्यक्ष दहीहंडी फोडण्याची.
“राधेची भक्ती, बासरीची गोडी,
यशोदा- देवकी मैयामौरी,
श्रीकृष्ण-सुदामाची मैत्री न्यारी,
लोण्याचा स्वाद, सोबतीला गोपिकांचा रास,
मिळून साजरा करू श्रीकृष्णजन्माष्टमीचा दिवस आज”
Krishna Janmashtami Nibandh Marathi
गोविंदा आला रे आला’
गोकुळात आनंद झाला.
हे गाणं म्हणत बालगोपाल ढोल, लेझीमच्या गजरात गुलाल उधळत दहीहंडी फोडण्यासाठी येतात. दहीहंडी जमिनीपासून उंचावर बांधलेली असल्यामुळे बालगोपाल ऐकमेकांच्या खांद्यावर चढून मानवी मनोरा रचतात व दहीहंडी फोडतात. {Krishna Janmashtami Nibandh Marathi}
या दिवसाचा आनंद लुटतात. आज दहीहंडी फोडणारी अनेक गोविंदा मंडळे आहेत दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या मंडळाना लाख-लाख रुपयांची बादीसे लावली जातात. जास्तीत जास्त थर लावण्याकडे भर दिला जातो मात्र त्यामुळे जीवाचे नुकसान होण्याची शक्यता असते.
कृष्णा जन्माष्टमी निबंध मराठी
सण साजरा करताना त्याला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर आज आपण श्रीकृष्णाच्या भक्तीत दंग होऊन जावूया आाम अतिउत्साहात नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घेऊया.
विसरून सारे मतभेद लोभ,
अहंकार दूर सोडा
सर्वधर्मसमभाव मनात जागवूया
आपुलकीची दहीहंडी फोडूया.”
तर मित्रांना “Krishna Janmashtami Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “कृष्णा जन्माष्टमी निबंध मराठी” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ. “Krishna Janmashtami Nibandh Marathi”
श्रीकृष्णाचा जन्म कधी आणि कुठे झाला?
श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यात वय अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कोणत्या तिथीला केली जाते?
श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा श्रावण कृष्ण अष्टमी तिथीला केली जाते