Kelva beach palghar information | केळवा बीच पालघर माहिती
केळवा बीच हे बाहेरच्या राज्यांसह मुंबई व पालघर मधील स्थानिक लोकसाठी मोठी मौजमजा करण्याची एक संधीच आहे.
Contents
Kelva beach | केळवे बीच
पालघर जिल्ह्यातील kelva beach हा सुंदर किनारपट्टीचा सर्वात लांब प्रदेश असल्याने केळवा बीचला त्याची ख्याती मिळते. या किनाऱ्याची एकूण लांबी ही जवळपास 8 किलोमीटर आहे.
Kelva beach समुद्र किनारा सुरूच्या झाडांनी वेढलेला आहे. तसेच येथील अनेक आकर्षणे तुम्हाला येथे आकर्षित करतील ती म्हणजे येथील केळवा किल्ला आणि शितलादेवी मंदिर. हा समुद्रकिनारा खूप सुंदर असल्यामुळे येथे पालघरमधील राहिवासी व मुंबईकरांची एकच गर्दी होत असते. खासकरून येथे रविवारी खूप जास्त गर्दी असते त्यामुळे येथे फिरण्याची मजा जास्त होते.
सूर्य मावळताना समुद्रकिनारी राहून बघण्याचा आनंद वेगळाच असतो तो आनंद तुम्हाला या समुद्रकिनाऱ्यावर घेता येईल. आभळाकडे बघताना त्याचे निरनिराळे रंग बघताना मन हरवून जाते
Kelva beach वर गेल्यावर सर्वात आधी तुमच्या नजरे समोर सुरूची झाडे दिसतील उंच असलेली ही झाडे समुद्रकिनारी बघताना त्यांच्या सोबत एक सेल्फी क्लिक करण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. त्यापुढे गेल्यावर समुद्रकिनारी येणाऱ्या लाटांचा आवाज तसेच एकावर एक आदळणाऱ्या लाटा बघता येतील. लोक समुद्रकिाऱ्यावर फिरताना, पोहताना, मजा करताना दिसतील. बाहेरच्या किनाऱ्यावर आनंदाने फिरताना वाळू हळूहळू तुमच्या पायाच्या बोटांमधून घसरते.
बीचवरील मनोरंजक सुविधा
उन्ह्याळ्यात उन्हाच्या तडाख्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि स्वतःचे मन शांत करण्यासाठी हा palghar beach तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. ATV bike राइड, हॉर्स राईड, उंट राईड, parachute gliding इत्यादी अनेक मनोरंजक सुविधा आहेत थोडे खर्चिक असेल तरी त्यातून मिळणाऱ्या आनंदाच्या तुलनेत हा खर्च खूप कमी वाटेल.
तसेच आपल्याला केळवा समुद्रकिनाऱ्यावर नारळपाणी पिण्याची मजा घेता येईल. यासोबत समुद्र किनारीवर पाणीपुरी, खाण्याची हौस सुद्धा भागवता येते. येथील हॉटेल मधील चविष्ट Veg आणि nonveg पदार्थांचा स्वाद घेता येतो.
How to reach | कसे जाल
palghar to kelva beach distance हे जवळपास १२ ते १३ km आहे तर मुंबई पासून हेच अंतर १०४ km आहे, तसेच ठाणे पासून हे अंतर ८७ km चे आहे. तसेच nashik to kelva beach distance हे 150 km आहे तर kalyan to kelva beach 80 ते ११० किमी आहे. हे अंतर तुम्ही तेथे पोहोचण्यासाठी कोणता रस्ता निवासाला आहे त्याच्यावर आधारित आहेत तसेच तुम्हाला येथे पुणे वरून यायचं असल्यास pune to kelva beach हे अंतर जवळपास 240 किमी आहे.
1) By train : केलवे बीच पासून kelva road station हे अंतर जवळपास 7 KM आहे. ट्रेन मधून उतरल्यानंतर तुम्हाला रिक्षा पकडून पुढचा प्रवास करता येईल.
2) by bus: पालघर मधे जाण्यासाठी मुंबई तसेच ठाणे येथून MSRTC च्या अनेक बस उपलब्ध आहेत जे पालघर किंवा सफाळे आणि केळवा रोड ते स्टेशन पर्यंत वारंवार प्रवास करतात.
इतर महत्त्वाची ठिकाणे
1) Shitladevi mandir kelva | शितलादेवी मंदिर
केळवा शहरामधे असलेले शितलामातेचे हे मंदिर अत्यंत प्राचीन मंदिर आहे. अत्यंत पुर्वीच्या काळात बांधलेले हे मंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वी देवी अहिल्याबाई होळकर यांच्याहातून संपूर्ण नूतनीकरण आणि जीर्णोद्धार झाले त्यानंतर मंदिर जीर्ण झाले.
त्यानंतर केळवा शहरातील काही समाजसेवक सुज्ञ आणि विवेकी व्यक्तींनी एक दुरुस्ती व जीर्णोद्धारसंघटना स्थापनकरून 1986 मध्ये या मंदिराचे नूतनीकरण व संपूर्ण जीर्णोद्धार केला. अखंड कोरलेली शितलादेविची ही मूर्ती मनाला शांतता आणि आनंद देणारी आहे. आई शितलादेवी ही विविध आजार आणि अडचणींपासून सुरक्षितपणे मुक्त करते. ती महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील असंख्य भक्तांच्या श्रद्धेचे आणि विश्वासाचे ठिकाण आहे.
2) Kelva beach fort | केळवा बीच किल्ला
kelva beach fort किंवा केळवा किल्ल्याला खूप मोठा जुना इतिहास आहे. सोळाव्या शतकात हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता. तसेच हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठा राजवटीत वापरला होता.
हा किल्ला सुरूच्या उंचच उंच झाडांनी वेढलेला आहे. त्यात सुंदर रचना, मनमोहक वास्तुकला आणि किल्ल्याच आश्चर्यकारक design आहे जे आपल्याला उल्हासित करेल. या किल्ल्यावरून केळवा बीच बघण्याची मजा वेगळीच असते. त्यामुळे येथे फोटो क्लिक करण्याचा मोह आपल्याला आवरता येत नाही.
Where to stay | राहण्याची सुविधा
kelva beach hotels & resorts at kelva beach
पूर्ण दिवस बीचवर एन्जॉय करून आणि एवढी चांगली ठिकाणे फिरून दमल्यानंतर गरज असते ती म्हणजे विश्रांतीची आणि स्वादिष्ट जेवणाची तुम्हाला रात्रभर मुक्काम आणि आराम करण्यासाठी अनेक हॉटेल आणि the kelva beach resort येथे उपलब्ध आहेत. जेथे तुम्हाला खुपच चांगली सुविधा मिळेल.
जेथे तुम्हाला व्हेज व नॉनव्हेज हे दोन्ही प्रकारचे चविष्ठ पदार्थ खायला मिळतील ते हि कमी दरात.
केळवा येथे राहण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. हे सर्व पर्याय सामान्य माणसाच्या खिश्याला परवडण्यासारखेच आहेत. हि सर्व हॉटेल्स, kelva beach villa आणि रिसॉर्ट्स kelwa beach च्या लगतच आहेत त्यामुळे तिथे पोहोचायला जास्त वेळ लागणार नाही.
Other Tourist places near kelva beach | केळवा जवळील इतर पर्यटन स्थळे
केळवा मध्ये समुद्र किनाऱ्यावतिरिक्त अनेक पर्यटन स्थळे किंवा ठिकाणे आहेत जिथे फिरण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. जसे की
- केळवा पानकोट
- (kelva pankot)
- केळवा धरण
- (kelva dam)
- आशापुरी
- (aashapuri)
- शिव मंदिर
- (shiv mandir)
- भावनगड किल्ला
- (bhavangad fort)
- शिरगाव किल्ला
- (shirgaon fort)
- केळवा माहिम किल्ला
- (kelva mahim fort)
FAQ – Frequently asked questions
where is kelva beach?
kelva beach is located in Palghar district in Maharashtra. This place is about 12 km from Palgharrailway station.
is kelva beach safe for couples ?
yes, kelva beach is one of the safest places in palghar tourist places
how to reach kelva beach from palghar station ?
there are Buses and Rickshaws are available from palghar station you can use their service to reach palghar beach
केळवा माहीम मध्ये आपण फिरून आपल्या सुट्टीचा आनंद घेऊ शकता.
आणि हा अनुभव कसा होता ते आम्हाला comment मध्ये कळवू शकता मित्रांनो तुम्हाला आमची हि पोस्ट आवडल्यास कंमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका