कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध | Karmaveer Bhaurao Patil Nibandh Marathi
Karmaveer Bhaurao Patil Nibandh Marathi – मित्रांनो आज “कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
Contents
Karmaveer Bhaurao Patil Nibandh Marathi
ज्ञानाचा दिवा महाराष्ट्रातल्या मनामनात पेटवणारा लोकांच्या मनात स्वाभिमान रुजवणारा देव दगडात नसतो माणसात असतो हे हेरून इथल्या माणसांमध्ये माणुसकी पेरणारा “शिक्षणमहर्षी” म्हणजेच “कर्मवीर भाऊराव पाटील”.
बहुजनांच्या मुलांमध्ये शिक्षण प्रसार करणारा देवमाणूस शिक्षणसम्राट म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. एकवेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलीन पण वसतीगृहाला दिलेलं “शिवाजी महाराजांचे” नाव नाही बदलणार अस छातीठोक पणे सांगणारे “कर्मवीर भाऊराव पाटील” ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज 100 वर्षांपूर्वीच ओळखणारा, ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक म्हणजेच “कर्मवीर भाऊराव पाटील.
लोकशाहीचा मुळगाभा लोकशिक्षण हे आहे आणि हे लोकशिक्षण समाजाला विकासाकडे नेते हे कर्मवीरांना ज्ञात होत म्हणून अनवाणी पायांनी वणवण करून अवघा महाराष्ट्र पिंजून काढून शिक्षणाचीज्ञानगंगा बहुजनांच्या झोपडीपर्यंत पोहचविणारे शिक्षणसम्राट कर्मवीर भाऊराव कर्मवीर भाऊराव पाटील होते.
कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध
त्यांचा जन्म २२सप्टेंबर १८८७ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते भाऊरावांचे बालपण कुंभोज, तासगाव, दहिवडी विटा यासारख्या गावी गेले.
भाऊराव पाटील विट्याच्या शाळेतून पाचवी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले.
मॅट्रिक होण्यापूर्वीच त्यांना शिक्षण सोडावे लागले. कोल्हापूरच्या सात वर्षाच्या वास्तव्यात त्यांचे शालेय शिक्षणात विशेष प्रगती दिसून आली नाही. याच दरम्यान त्यांचा सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीशी परिचय झाला आणि ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले.
Karmaveer Bhaurao Patil Nibandh Marathi
सामाजिक कार्य करताना त्यांना असे लक्षात आले की बहुजन समाज अज्ञान व अंधश्रद्धा यामध्ये पार अडकून गेला असल्याचे आढळून आले. त्यातून त्यांच्यातील समाजसेवक जागा झाला. समाजाला त्यातून बाहेर काढण्यास शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही ही जाणीव झाल्याने त्यांनी महात्मा फुले व राजर्षी शाहू महाराज यांच्या पावलावर पाऊल टाकायचे ठरविले.
शेतकरी म्हणजेच रयत. रयतेला शिक्षण देणारी संस्था म्हणूनच या संस्थेला “रयत शिक्षण संस्था” असे नाव देण्यात आले. अशा तऱ्हेने ५ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्था स्थापन झाली. श्रम, स्वावलंबन व समता या तीनतत्वांवर त्यांच्या शैक्षणिक कार्याचा वटवृक्ष आधारलेला होता. “Karmaveer Bhaurao Patil Nibandh Marathi”
रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडे यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रूपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले.
या संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती
- शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
- मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
- निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
- अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्यां प्रेमभाव निर्माण करणे.
- अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावणे. Karmaveer Bhaurao Patil Nibandh Marathi
- संघशक्तीचे महत्त्व कट्टीने पटवून देणे.
- सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
- बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
हा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बाधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.
साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. (Karmaveer Bhaurao Patil Nibandh Marathi)
कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध
दिनांक २५ फेब्रुवारी १९२७ ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ रोजी महात्मागांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे असे नाव ठेवले. महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला.
तसेच भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांनासन्मानित केले. पुणेविद्यापीठाने त्यांचा इ.सन १९५९ मध्ये सन्मानदर्शक डी. लिट. ही पदवी दिली. रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ६७५शाखा आहेत. त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक, २७प्राथमिक, ४३८ माध्यमिक, ८अध्यापक विद्यालय, २आय. टी. आय व ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे. कोल्हापूरला असताना कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी शाहू महाराज होते. Karmaveer Bhaurao Patil Nibandh Marathi
Karmaveer Bhaurao Patil Nibandh Marathi
भविष्यकाळाचा विचार करणारा राजा होता. त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला. सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले. समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये एक सुधारक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. {Karmaveer Bhaurao Patil Nibandh Marathi}
१९३२ मध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पूणे करार झाला. या ऐक्याच्या स्मरणार्थ ‘युनियन बोर्डींग ची स्थापनाभाऊरावांनी पुणे येथे केली. हे ऐक्य व्हावे या विषयीची तळमळ भाऊराव पाटील यांना होती.
१९३५ मध्ये ‘महात्मा फुले अध्यापक विद्यालय’ त्यांनी सुरू केले. या मागे त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते. इ.स. १९४७ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज या नावाने पहिले महाविद्यालय सुरू केले.
कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध
शिक्षणामध्ये शारीरिक श्रमाची प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न भाऊरावांनी केला. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच काम केलं पाहिजे व त्यातन शिक्षणाचा खर्च भागवला पाहिजे भाऊराव पाटील यांची शिक्षण संकल्पना स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय व स्वातंत्र्य ही शिक्षणाची चतुःसूत्री होती. “Karmaveer Bhaurao Patil Nibandh Marathi”
‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे बिद्र’ हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे. “ज्याच्या हाताला घट्टा व चट्टा नाही तो स्वावलंबी विद्यार्थी नाही” असे भाऊराव नेहमी म्हणत. अशा थोरसमाजसुधारक, शिक्षणसम्राट, पद्मभूषण, कर्मवीरांचे ९ मे १९५९ रोजी निधन झाले.
दिधली दिन दुबळ्यांना
विद्येच्या पंखांची सावली
धन्य धन्य ते कर्मवीर
अवघ्या रयतेची माऊली…
तर मित्रांना “Karmaveer Bhaurao Patil Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य कोणते?
“स्वावलंबी शिक्षण हेच आमचे बिद्र” हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे.
रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय कधी आणि कुठे सुरू केले?
इ.स. १९४७ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज या नावाने पहिले महाविद्यालय सुरू केले.