Site icon My Marathi Status

कण्हेर फुलाबद्दल माहिती मराठीत – Kanher Flower Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला कण्हेर फुलाबद्दल माहिती मराठीत – Kanher Flower Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा –

कण्हेर – Kanher Flower Information in Marathi

१] मराठी नाव – कण्हेर
२] इंग्रजी नाव – Oleander / Pinkrose

निसर्गात आपण पुष्कळ फुलझाडे पाहतो. त्यापैकीच एक फूलझाड म्हणजे कण्हेर होय. अगदी पूर्वीपासून ही फुले अस्तित्वात आहेत. रंग : या फुलांचा रंग पांढरा, तांबडा, पिवळा, फिक्कट गुलाबी असतो.

वर्णन : कण्हेरीची पाने लांबट, जाड व हिरव्या रंगाची, समोर निमुळती होत गेलेली व नेहमी तुकतुकीत असतात. पानांच्या मध्यशिरा कठीण असतात. पानांची लांबी सुमारे १२ ते १५ सेंमी. असते. कण्हेरीची झाडे सुमारे ३ ते ५ मीटर उंचीची असतात.

कण्हेरीच्या मुळांपासून अनेक फांद्या निघतात. या झाडाचे खोड गुळगुळीत असते. कण्हेरीचे पान तोडल्यास पांढरा चीक बाहेर येतो. कण्हेरीची फुले अतिमंद सुगंधी आणि वेगवेगळ्या रंगछटांनी डवरलेली असतात.

कण्हेरीचे फळ हे गोल किंवा लांबट असते. कण्हेरीला ग्रीष्मात व वर्षा ऋतूत फुले येतात. कण्हेरी हे रानटी फुलांचे झाड आहे. याची झाडे शेते, नाले, नदीकाठ, बांधावर कुठेही येतात. तसेच दलदलीच्या ठिकाणी याची झाडे आढळतात.

प्रकार : फुलांच्या रंगावरून १) पांढरी कण्हेरी २) पिवळी कण्हेरी ३) तांबडी कण्हेरी ४) कृष्ण किंवा कृष्णनिळी कण्हेरी असे चार प्रकार पडतात. कृष्णनिळी कण्हेरी हा प्रकार जास्त दिसत नाही.

पिवळ्या कण्हेरीला व्यवहारात बिट्टी’ असे म्हणतात. उपयोग : कण्हेरीची पाने, फुले व लहानसहान फांद्या तसेच मुळ्यासुद्धा औषधांसाठी उपयोगी पडतात. कण्हेरीच्या मुळ्या अत्यंत विषारी असल्याने या झाडांच्या जवळ साप येत नाहीत.

पांढरी कण्हेरी तिखट, कडू, तुरट आहे, परंतु मूळव्याध व रातआंधळेपणा अशा रोगांचा ती नाश करते. तसेच लाल-गुलाबी व पिवळ्या कण्हेरीमुळे कफ, ज्वर, कुष्ठ, कोड, कृमी, अंगावरचे फोड, मस्तकशूळ (डोके दुखणे) यांवर उपाय करता येतो.

साप चावला तर पांढऱ्या कण्हेरीचे मूळ गोमूत्रात उगाळून दंश झालेल्या ठिकाणी लावले तर रोगी बरा होतो. आयुर्वेदात विषमज्वरावरही कण्हेरी अतिशय गुणकारी आहे.

कण्हेरीची मुळी सहाणेवर पाणी न घालता उगाळावी. जे चूर्ण निघेल ते डोके दुखत असल्यास लावले तर ती व्याधी नाहीशी होते. अलीकडे कण्हेरीची हिरवीगार पाने, हार-तुरे, सण-समारंभ, पूजाअर्चा इत्यादींसाठी वापरतात.

कण्हेरी हे झाड पूर्णतः विषारी असल्याने याचा उपयोग आयुर्वेदात कमी मात्रेत केला आहे. कण्हेरीचा वापर औषधांपेक्षा शोभेसाठी केला जातो.

प्राणी याची पाने खात नाहीत. त्यामुळे याचा कुंपणासाठी विशेष वापर केला जातो. त्याचप्रमाणे शहरात मोठ्या इमारतींच्या, बंगल्यांच्या आवारात, वसाहतीत वगैरे ठिकाणी या झाडाचा वापर केला जातो.

लागवड : कण्हेरी या फुलाची लागवड छाट कलमाने केली जाते. शेतीच्या बांधावर जमीन खचू नये यासाठी छाट कलम घेऊन लावले जाते. कण्हेरीला वर्षभर सुंदर फुले येतात.

काय शिकलात?

आज आपण कण्हेर फुलाबद्दल माहिती मराठीत – Kanher Flower Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version