kalpana Pradhan Nibandh – मित्रांनो आज “कल्पनाप्रधान निबंध मराठी “ ‘आज शिवाजीराजे असते तर……!’ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
Contents
kalpana Pradhan Nibandh
सध्याच्या परिस्थितीत जेव्हा एखाद्या कर्तुत्वाचा व्यक्तिमत्त्वाची उणीव भासते, तेव्हा भूतकाळातील कर्तव्यकठोर थोर व्यक्तींची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते.
सध्या आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्रातली अंदाधुंदी पाहिली की मनात सहज विचार येतो, ‘आज शिवाजीराजे असते तर……!’
शिवाजीराजांना राजकारणातील डावपेच उपजतच लाभले होते. शिवाजीराजांनी महाराष्ट्रातील सरदारांची अंतर्गत बंडाळी मोडून, उत्तरेकडील औरंगजेब, दक्षिणेकडील आदिलशहा व कुतुबशहा, पश्चिम किनाऱ्यावरील इंग्रज व पोर्तुगीज या साऱ्यांचा बंदोबस्त करून स्वतंत्र राज्य निर्माण केले.
कल्पनाप्रधान निबंध मराठी
आज शिवाजीराजे असते तर पाकिस्तान, चीन अफगानिस्तान या शत्रूंची वारंवार डोके वर काढण्याची हिम्मत झाली नसती. शिवाजीराजांनी शुन्यातून राज्य निर्माण केले. पण त्यांना त्याबद्दल कधीच लालसा नव्हती. [kalpana Pradhan Nibandh]
हे प्रजेचे राज्य आहे, ही त्यांच्या मनात सतत जाणीव होती. सामान्य माणसाला देशभक्तीची प्रेरणा देऊन त्यांनी आपले सैन्य घडवले होते. राजे राजे हित दक्ष होते. राजांना अन्याची, भ्रष्टाचाराची अत्यंत चीड होती. भ्रष्टाचारी लोकांना राजे कठोर शासन करत असत.
बेदिली करणाऱ्या स्वतःच्या पोटचा पोर संभाजी आणि भाऊ व्यंकोजी हेही राजांच्या कडक शासनातील सुटले नाहीत. आताच्या काळात शिवाजीराजे असते, तर असे भ्रष्टाचार झालेच नसते. आधुनिक स्त्री प्रत्येक क्षेत्रात मोठ्या समर्थपणे वावरतांना दिसते आणि तरीही त्यांच्यावर अनेक प्रकारे अत्याचार होत असलेले दिसतात. {kalpana Pradhan Nibandh}
kalpana Pradhan Nibandh
शिवाजीराजे असते तर त्यांना निर्भयता लागली असती; कारण ते स्वतःपरस्त्री मातेसमान मानत असत आणि स्त्रियांच्या संदर्भात वाईट वर्तन करणाऱ्याचे हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. शिवाजीराजांच्या काळात प्रदूषणाचा प्रश्न नव्हता.
परंतु,पर्यावरणातील संतुलनाची राजांना कल्पना होती.म्हणून तर झाडांना संवर्धनाची त्यांची विशेष काळजी घेतली होती. राजे धर्मनिष्ठ होते; परंतु अंधश्रद्धाळू नव्हते. आताच्या विज्ञान युगात राज्य असते, तर ढोंगी माणसे आपले बस्तान बसवू शकली नसती.
राजांनी राज्यव्यवहार कोश तयार करवले होते. आज शिवाजीराजे असते तर सध्या भाषेच्या बाबतीत माजलेला गोंधळ उद्भवला नसता. मातृभाषेला प्रोत्साहन देऊन महाराजांनी आवश्यक तेथेच इंग्रजीचा स्वीकार केला असता. परंतु परकीय भाषेचे आक्रमण सहन केले नसते, नवनवीन शस्त्राकडे महाराजांचे नेहमी लक्ष असते. हे आठवले की वाटते लष्कर, आरमार, हवाईदल या संरक्षणाच्या सर्वच फळ्या राजांनी नेहमी अत्याधुनिक ठेवल्या असत्या.
कल्पनाप्रधान निबंध मराठी
आज शिवाजीराजे असते तर भारताने स्वीकारलेली लोकशाही राज्यपद्धती,धर्मनिरपेक्षता या साऱ्या मूल्याचे, खऱ्याखुऱ्या ठाणे पालन झाले असते. स्वच्छ राज्यकारभार, कर्तव्यदक्ष शासन, भ्रष्टाचार विरहित व्यवहार,उच्च सांस्कृतिक मूल्यांचे आणि सांस्कृतिक वारशाचे जतन झाले असते. भारताची शान शंभर पटीने वाढली असती. “kalpana Pradhan Nibandh”
भारत एक वैभवशाली राष्ट्र म्हणून ओळखले गेले असते व त्याचबरोबर परकियांच्या मनात भारताबद्दल धबधबा निर्माण झाला असता. आजच्या या अंधारी भागात या पुण्यश्लोक महामानवाने पुन्हा अवतार घ्यावा, असे मनोमन वाटते.
तर मित्रांना “kalpana Pradhan Nibandh” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “कल्पनाप्रधान निबंध मराठी आज शिवाजीराजे असते तर……!’ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला?
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० / एप्रिल १६२७ रोजी झाला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला?
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ला (पुणे) येथे झाला.