Jayant Narlikar Information in Marathi – जयंत विष्णू नारळीकर बद्दल माहिती मराठीत

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Jayant Narlikar Information in Marathi – जयंत विष्णू नारळीकर बद्दल माहिती मराठीत देणार आहे. आणखी वाचा – चंद्रशेखर वेंकटरमण

माहिती – Jayant Narlikar Information in Marathi

नारळीकर यांचा जन्म १९ जुलै, १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील बनारस हिंदू युनिव्हर्सिटी येथे गणित विषयाचे प्राध्यापक आणि गणित विभागाचे प्रमुख होते. त्यांची आई संस्कृत या विषयाची अभ्यासक होती.

जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण बनारस (वाराणशी) येथेच झाले. तेथूनच १९५७ मध्ये ते बी.एस.सी.प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर गणिताच्या उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. तेथे त्यांनी फिट्झ विल्यम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

१९६० मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची गणितातील पदवी संपादन केली. १९६३ मध्ये फ्रेंड हॉइल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पी.एच.डी. मिळविली.पुढे एम. ए.आणि डॉक्टर ऑफ सायन्स या पदव्याही त्यांनी संपादन केल्या. केंब्रिज येथे ते १९७२ पर्यंत होते.

या काळात त्यांनी अनेक पारितोषिकेही पटकावली. इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरिटिकल अॅस्टॉनॉमी या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता. तेथेच त्यांनी सर फ्रेड हॉइल यांच्यासह खगोलशास्त्रात संशोधन केले.

१९७२ मध्ये डॉ. जयंत नारळीकर भारतात परत आले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथे त्यांनी आपले संशोधन कार्य चालू केले. त्यामुळे त्यांचे नाव जगभर झाले.

भारतातील युनिव्हर्सिटी ग्रॅट्स कमिशनकडून त्यांना आमंत्रण आले. १९८८ मध्ये त्यांनी आयुकाची स्थापना केली. सन २००३ पर्यंत त्यांनी आयुकाचे संस्थापक व संचालकपदावर काम केले.

आयुका हे जगप्रसिद्ध संशोधन केंद्र व खगोलशास्त्रातील शिक्षण व संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. आजही ते प्राध्यापक म्हणून तेथे काम करीत आहेत.

विश्वाची निर्मिती एका प्रचंड स्फोटातून झाली असावी, असे काही खगोलशास्त्रज्ञांना वाटते; तर काही शास्त्रज्ञ विश्व हे स्थिर स्थितीत आहे म्हणजेच ते अनादी आहे, असे मानतात. डॉ. नारळीकरांनी विश्वाच्या स्थिर स्थितीचे समर्थन केले.

पृथ्वीपासून ४१ कि.मी. उंचीवरील हवेचे नमुने तपासून त्यातील सूक्ष्म जीवांचा अभ्यास करण्यासाठी बनविलेल्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या एका गटाचे नेतृत्व त्यांनी केले.

अवकाशातून पृथ्वीवर सूक्ष्मजीवांचा मारा होऊन त्यातीलच काही जीव पृथ्वीवर स्थिरावले आणि त्यातूनच जीवनिर्मिती झाली असावी, अशी शक्यता त्यांनी वर्तविली.

गुरुत्वाकर्षणाशी संबंधित असलेला हॉइल – नारळीकर सिद्धांत जगप्रसिद्ध आहे. डॉ. नारळीकरांनी अनेक मासिके व वृत्तपत्रांमध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमधून अतिशय उद्बोधक असे लिखाण केले आहे.

क्लिष्ट विषय अतिशय सोप्या भाषेत मांडण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. कित्येक नामांकित संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे विभूषित केली आहेत.

पण ते अतिशय विनम्र आहेत. त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण हे पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा सम्मान केला आहे. मुलांना, आपल्या भारत देशाचे नाव उज्वल करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांचा तुम्ही अभिमान बाळगा.

काय शिकलात?

आज आपण Jayant Narlikar Information in Marathi – जयंत विष्णू नारळीकर बद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: