Site icon My Marathi Status

जांभूळ फळाबद्दल माहिती मराठीत – Java Plum Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला जांभूळ फळाबद्दल माहिती मराठीत – Java Plum Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात.

आणखी वाचा – फणस

जांभूळ फळाबद्दल माहिती | Java Plum Information in Marathi

१] मराठी नाव – जांभूळ
२] इंग्रजी नाव – Java plum/Rose apple
३] शास्त्रीय नाव – Ujenia Jambolina

जांभळाची झाडे सर्वत्र वाढतात. जांभळाच्या झाडाचा रंग फिक्कट व भुरकट असतो, साल खडबडीत असते. जांभळाचे झाड ४० फुटांपासून ८० फुटांपर्यंत वाढते. चैत्र -वैशाखात जांभळाच्या झाडांना फळे येतात.

पाने – जांभळाची पाने बकुळीच्या पानांसारखी असतात, पानांचा आकार लांबट असून, ती जाड व सुगंधी असतात. पानांपासून तेल काढले जाते. ते औषधी असते.

फुले – जांभळाची फुले पांढऱ्या रंगाची असून, फार नाजूक असतात. फुलांचे गुच्छ पाहून मन सुखावते. फळ – जांभळाची फळे चैत्र- वैशाखात येतात. फळात एकच बी असते.

चव – जांभळाची चव गोड, थोडीशी आंबट व तुरट असते. रंग – बाहेरून काळसर जांभळ्या रंगाची फळे आतून लाल तांबूस असतात.

आकार – जांभळे लहान किंवा मोठी गोलाकार किंवा लंबगोलाकार असतात. उत्पादन क्षेत्र – जांभळाचे झाड महाराष्ट्रात सगळीकडे आढळते.

उत्पादने – जांभळाच्या रसापासून आसववसरबते बनवितात. घटकद्रव्ये – जांभळामध्ये थोड्या प्रमाणात ‘ब’, ‘क’ जीवनसत्त्वे, फॉलिक अॅसिड व कॉलीनदेखील असते.

जाती – राज जांभूळ वसूद्र जांभूळ अशा दोन जाती आहेत. गुलाब जांभूळ दिसण्यास अतिशय सुंदर व गुणांनी श्रेष्ठ असते. गुलाब जांभूळ बीविरहित, गुलाबी रंगाचे व गोलाकार असते. यांना गुलाबासारखा सुगंध येतो. ही जांभळे बंगाल व ब्रह्मदेशामध्ये येतात.

फायदे – प्लीहा व यकृत विकार, पंडुरोग, मधुमेह व कावीळ यावर जांभळाचा औषधी उपयोग करतात. जांभळाच्या सेवनाने रक्त शुद्ध व लाल होते. जांभूळ वीर्यवृद्धी करणारे आहे.

साठवण व पिकाची निगा – जांभळीच्या फुलांप्रमाणेच फळेही नाजूक असतात. झाडावरून खाली पडताच ही फळे फुटतात. म्हणून झाडावर चढून झेल्याने ही फळे अलगद काढावी लागतात. जांभळे लाकडी पेटीत किंवा करंड्यात खालच्या बाजूला पाला, पाने घालून अलगद ठेवली जातात.

इतर उपयोग – जांभळाची पाने, फळे, बिया, मुळे आणि खोड असे सर्व अवयव औषधी असतात. जांभळाच्या बिया उगाळून घामोळ्यावर लावतात. हे फळ कफ, पित्त, दाह, वायूयांचा नाश करणारे आहे.

जांभळाच्या पानांचे तेल औषधी असते. विंचूचावल्यास पानांचा रस काढून विंचूचावलेल्या जागी लावावे, वेदना वसूज नाहीशी होते.खोडाचा उपयोग इमारतीसाठी, फर्निचर तयार करण्यासाठी आणि शेतीच्या अवजारांसाठी करतात.

काय शिकलात?

आज आपण जांभूळ फळाबद्दल माहिती मराठीत – Java Plum Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version