राष्ट्रगीत, भारताचे संविधान, प्रतिज्ञा । Indian National Anthem, Constitution, Pledge in Marathi
हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला राष्ट्रगीत Indian National Anthem in Marathi । भारताचे संविधान Indian Constitution in Marathi । प्रतिज्ञा Indian Pledge in Marathi हे सर्व एकाच पोस्ट मध्ये देणार आहे तर चला बघुयात.
Contents
राष्ट्रगीत । Indian National Anthem in Marathi
जनगणमन – अधिनायक जय हे
भारत-भाग्यविधाता।
पंजाब सिन्धु गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे
गाहे तव जय गाथा।
जनगण मंगलदायक जय हे
भारत-भाग्यविधाता।
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे।
भारताचे संविधान । Indian Constitution in Marathi
प्रास्ताविका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस :
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
प्रतिज्ञा । Indian Pledge in Marathi
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.