Site icon My Marathi Status

how to create account on quora in marathi – Quora वर अकाउंट कसे तयार करावे

 नमस्कार मंडळी! आज आपण Quora चा वापर करायला शिकणार आहोत. म्हणजे Quora चा काय उपयोग आहे, Quora कसा वापरावा,Quora वर अकाउंट कसे तयार करावे (how to create account on quora) , Quora कसे जॉईन करावे इत्यादी. मित्रांनो आपल्याला जर Quora बद्दल जास्त माहिती नसेल तर या अगोदरच मी quora काय आहे, quora म्हणजे काय यावर विस्तारित लेख लिहिला आहे आपण या लिंक वर क्लिक करुन तो लेख वाचू शकता.

तर चला मग पाहूया Quora वर अकाउंट कसे तयार करावे (how to create account on quora)

Quora वर अकाउंट कसे उघडावे (how to create account on quora in marathi)

  • Quora जॉईन करण्यासाठी तुम्हाला अगोदर कोरा वर अकाउंट उघडावे लागेल त्यासाठी तुम्ही email id, google account किंवा तुमच्या facebook account द्वारे देखील quora वर sign up करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी किंवा तुम्ही ज्याद्वारे quora sign up केलाय ते अकाउंट varify करावे लागेल. त्यासाठी तुमच्या ईमेल आयडी वर किंवा मोबाईल नंबर वर एक ओटीपी(OTP) येईल तो OTP टाकून तुम्ही अकाउंट varify करून घ्या.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या पसंदिच काही विषय निवडायचे आहेत व next वर क्लिक करायचे आहेत. तुम्ही निवडलेल्या विषयाच्या आधारे तुम्हाला तुमच्या feed मध्ये प्रश्न दिसतील. समजा तुम्ही ब्लॉगींग, टेक्नॉलॉजी आणि विज्ञान असे विषय निवडले तर तर तुमच्या feed मध्ये सर्व प्रश्न या विषयाच्या संबंधितच असतील. तुम्ही निवडलेले हे विषय नंतर बदलू देखील शकतं
  • त्यानंतर तुमच्या विषयाच्या संबंधित काही मंच व लोकांना follow करायचे आहे. तुम्हाला जर करायचे नसेल तर तुम्ही skip देखील करू शकता.
  •  तुमचे अकाउंट तयार आहे आता तुम्हाला तुमची प्रोफाइल पूर्ण करायची आहे. सर्वात अगोदर तुम्ही तुमचा एखादा प्रोफाइल फोटो अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शिक्षांबद्दल माहिती लिहायची आहे जसे तुमचे शिक्षण किती झाले, तुम्ही कोणत्या शाळा/महाविद्यालय अथवा विद्यापीठातून पूर्ण केले. तुम्ही सध्या कोणते काम करतात, इत्यादी
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता लिहायचा आहे आणि तुमची प्रोफाइल पूर्ण होईल. आता तुम्ही quora वापरायला सुरुवात करू शकता.

Quora वर अकाउंट कसे बनवावे (how to create account on quora step by step in marathi)

  1. Quora.com वर भेट द्या
  2. Sign up वर क्लिक करा
  3. तुमच्या email id, google account किंवा facebook account द्वारे sign up करा
  4. ईमेल आयडी verify करा
  5. तुमच्या आवडीचे विषय निवडा
  6. Quora वर तुमची माहिती भरून प्रोफाइल पूर्ण करा
  7. तुमचे quora account तयार आहे आता तुम्ही quora वापरायला सुरुवात करू शकता

Quora चा वापर कसा करावा (How to use quora in marathi)

Quora account तयार करा

मित्रानो quora जॉईन करणं फार सोपं आहे कुणीही अगदी सहज quora वर अकाउंट उघडून quora जॉईन करू शकतो. पण अडचणी येतात त्या म्हणजे quora जॉईन केल्यानंतर. कारण असे अनेक लोक आहेत ज्यांना quora चा उपयोग माहिती नाही, quora कसे वापरायचे माहिती नाही.

प्रश्न विचारा आणि उत्तरे द्या

Quora चा वापर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला quora वर अकाउंट उघडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या प्रश्नावर माहिती हवी आहे ती प्रश्न quora वर लिहायची आहेत आणि नंतर quora वरील इतर सदस्य तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतील. जर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे माहिती असतील तर तुम्ही देखील इतर सदस्यांच्य प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. नाहीतर तुम्ही केवळ विविध विषयावर माहिती देखील वाचायला Quora वर येऊ शकता कारण quora हे माहिती व ज्ञान मिळवण्याचा सर्वात उत्तम स्रोत आहे.

उत्तरं Upvote करा

ज्याप्रमाणे फेसबुक,इंस्टाग्राम वर आपल्या ला लाईक्स मिळतात त्याच प्रमाणे Quora वर तुम्ही लिहिलेली उत्तरे कुणाला आवडली तर ते तुम्हाला upvote करतात. येथे upvote करण्याचा अर्थ असतो की “मी तुम्ही दिलेल्या उत्तराशी सहमत आहे”. Quora वर upvote करणं म्हणजे उत्तराला सहमती दर्शवणे किंवा मला माझ्या प्रश्नाचे समाधानारक उत्तर मिळाले असा अर्थ होतो.

Followers मिळवा

Quora वर तुमचे किती followers आहेत व तुमच्या उत्तराणा किती upvote मिळतात यावर तुमची quora वर ओळख ठरते. तुमचे quora वर जेवढे जास्त followers असतील व जेवढे जास्त तुमच्या उत्तराणा upvote मिळतात तर तेवढेच जास्त लोक तुमच्यावर व तुमच्या दिलेल्या उत्तरावर विश्वास ठेवतात. त्यामुळे तुम्हाला quora वर जास्तीत जास्त followers वाढवण्यासाठी भर द्यावा लागेल आणि अचूक व लोकांना आवडतील अशी सुंदर उत्तरे द्यावी लागतील.

निष्कर्ष – how to create account on quora marathi

मंडळी आजच्या या लेखामध्ये आपण quora वर अकाउंट कसे तयार करावे (how to create account on quora in marathi) याबद्दल सविस्तर माहिती घेतली. मला आशा आहे की आपल्याला ही माहिती नक्कीच समजली असेल. पुढच्या लेखामध्ये आम्ही अशीच एखाद्या विषयावर उपयुक्त माहिती आपल्यासाठी लिहू.

आपण कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहचवा आणि या माहिती ला सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू अशाच्या एखाद्या नवीन माहिती सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा, धन्यवाद…!!!

Exit mobile version