Site icon My Marathi Status

Hostinger Hosting Information होस्टिंगर शेअर होस्टिंग

आपल्याला कुठलीही वेबसाईट, ब्लॉग बनवताना लागणारा मुख्य घटक होस्टिंग हा असतो. 

अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे, जसे कुठलाही व्यवसाय किंवा दुकान सुरु करायचे झाल्यास आपण जशी सर्वप्रथम जागा विकत घेतो किंवा भाडे तत्वावर घेतो. त्या जागेवर आपल्या व्यवसाय किंवा दुकानाचा फलक लावतो. 

तसेच वेबसाईट बनवताना घ्यावयाची जागा म्हणजे होस्टिंग आणि त्यावर लावलेला फलक म्हणजे डोमेन.  

वेबसाईट ने सुरळीत काम करण्याकरिता लागणारी  सगळी माहिती म्हणजेच लागणारे फोटो, फाइल्स इत्यादी  होस्टिंग मध्ये सुरक्षित साठवून ठेवले जातात. अनेकदा डोमेन निवडण्याच्या नादात होस्टिंग कडे फारसं लक्ष दिल्या जात नाही. पण वेबसाईट दिसण्याकरता लागणार वेळ आणि फोटो, फाइल्स यांची सुरक्षा पूर्णतः होस्टिंग वर अवलंबून असते. एकंदरीत सांगायचं झाल्यास उत्तम होस्टिंग विकत घेणे हे देखील अत्यंत महत्वाचे आहे.

अनेक कंपन्या वेब होस्टिंग ची सेवा देतात. आपल्या गरजेप्रमाणे महिन्याचे किंवा वर्षाचे पैसे देऊन आपण  वेब होस्टिंग विकत घेऊ शकतो. 

वेब होस्टिंग(Web Hosting) चे मुखतः ४ प्रकार असतात. 

  1. सामायिक होस्टिंग (Shared hosting)
  2. समर्पित होस्टिंग (Dedicated Hosting)
  3. व्हीपीएस होस्टिंग (VPS Hosting )
  4. क्लाऊड होस्टिंग (Cloud Hosting )

वेबसाईट चा प्रकार आणि अंदाजे येणारे ट्रॅफिक यावरून आपण वेब होस्टिंग निवडू शकता.  

Hostinger hosting information in marathi

नवीन वेबसाईट वर सुरुवातीला येणारे ट्रॅफिक कमी असल्या कारणाने शेअर होस्टिंग एक उत्तम आणि स्वस्त पर्याय आहे.   

होस्टिंगर(Hostinger hosting shared plan) चे  शेअर होस्टिंग 

होस्टिंगर ही एक होस्टिंग सेवा प्रदान करणारी कंपनी आहे, ज्याची सुरुवात  2004 झाली होती. याचे पूर्वीचे नाव होस्टिंग मीडिया होते परंतु २०११ मध्ये ते बदलून होस्टिंगर केले गेले.  2021 मध्ये, होस्टिंगरला युरोपमधील वेगाने विकसित होणार्‍या कंपन्यांपैकी एक म्हणून सूचीबद्ध केले गेले.

होस्टिंगर ही 000वेबहॉस्ट(000Webhost), नायागॉस्टर(Niagahoster) आणि वेबलिंकची(Weblink) यांची पॅरेंट कंपनी आहे. 

होस्टिंगर चे वैशिष्ट्ये(Hostinger Hosting information pros)

होस्टिंगर चे वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत – 

होस्टिंगर वेब होस्टिंग मध्ये आपल्याला Cpanel  मिळत नाही.

होस्टिंगर आपल्याला  Cpanel ऐवजी Hpanel देतो, जे वापरण्यास अतिशय सोपे आहे. तांत्रिक ज्ञान नसले, तरीही Hpanel समजण्यास आणि हाताळण्यास अतिशय सोपी आहे.  

नवीन वापरकर्त्यांसाठी कस्टमर सपोर्ट सर्वात महत्वाचे होस्टिंग वैशिष्ट्य म्हणून विचार घेतले जाते. अनेकदा  शेअर होस्टिंग चा उपयोग करून वेबसाइट चे सेटअप करताना आपल्यास काही समस्या निर्माण होऊ शकतात. जरी इंटरनेट वर संपूर्ण माहिती असली तरी आपल्या विशिष्ट प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी थेट कस्टमर सपोर्ट नेहमीच वरदान ठरते.  

होस्टिंगर चा कस्टमर सपोर्ट  20+ भाषांमध्ये 24/7 उपलब्ध आहे. आपण त्यांना कॉल करून सरळ संवाद साधू शकतो किंवा त्यांना संदेश देखील पाठवू शकतो. आपल्या कोणत्याही होस्टिंग विषयी समस्ये करता होस्टिंगर च्या कस्टमर सपोर्ट प्रतिनिधी सोबत आपण चर्चा करू शकतो. ते अत्यंत उपयुक्त आणि योग्य मार्गदर्शन आपाल्याला देतात. होस्टिंगर कस्टमर सपोर्ट सोबत संपर्क साधण्यास सुलभ आहे आणि त्याचा प्रतिसाद वेळ देखील अतिशय वाजवी आहे. 

होस्टिंगर मधील शेअर होस्टिंग चा उपयोग करून मात्र ७९ रूपये प्रति महिना या दराने आपण शेअर होस्टिंग घेऊ शकतो. एका नवीन ब्लॉगर किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही नवशिक्यांसाठी हि अतिशय  परवडणारी होस्टिंग आहे. 

होस्टिंगर कडून प्रीमियम वेब होस्टिंग योजना खरेदी केल्यास आपल्याला एक डोमेन एका वर्षासाठी विनामूल्य (फ्री) मिळू शकते.

होस्टिंगरच्या सर्व योजनेमध्ये एसएसएल(SSL) प्रमाणपत्र विनामूल्य उपलब्ध आहे. आपण आपल्या आवश्यकते अनुसार अगदी बेसिक ७९ रूपये प्रति महिना या दराने जरी होस्टिंग खरेदी केले तरीही विनामूल्य एसएसएल प्रमाणपत्र आपल्याला मिळते.

होस्टिंगर च्या होस्टिंग सेवे बद्दल आपल्याला कुठलीही तक्रार असल्यास आपण 30 दिवसांच्या आत आपले पैसे परत घेऊ शकतो. होस्टिंगर आपल्याला आपले सर्व पैसे परत करतो.

होस्टिंगर आपल्या वेबसाइटवर 99.99% अपटाइम ची हमी आणि सोबतच उत्तम लोडींग वेग देतो.

आपल्याला होस्टिंगर सिंगल वेब होस्टिंग प्लॅनमध्ये 30 जीबी एसएसडी स्टोरेज आणि प्रीमियम आणि बिझनेस प्लॅनमध्ये 100 आणि 200 जीबी एसएसडी स्टोरेज मिळते.

 बँडविड्थ प्रीमियम आणि बिझनेस प्लॅनमध्ये अमर्यादित तर सिंगल प्लॅनमध्ये 100 जीबी उपलब्ध आहे. 

    होस्टिंगर योजना/ होस्टिंगर प्लॅन्स (Hostinger plans)

वैशिष्ट्यसिंगल  वेब होस्टिंग(Single Web Hosting)प्रीमियम वेब होस्टिंग(Premium Web Hosting)बिझनेस वेब होस्टिंग( Business Web Hosting)
वेबसाइट१००१००
एसएसडी स्टोरेज३० जीबी १०० जीबी २०० जीबी 
बँडविड्थ१०० जीबी अमर्यादितअमर्यादित
विनामूल्य डोमेननाही होय होय 
विनामूल्य एसएसएलहोय होय होय 
किंमत७९/- प्रति महिना१७९/- प्रति महिना२७९/-प्रति महिना
30 दिवसांची मनी बॅक गॅरंटीहोय होय होय 
ईमेल खाते१ विनामूल्य१०० विनामूल्य१००विनामूल्य
डेटाबेसअमर्यादितअमर्यादित
उपयुक्तता नवशिक्यांसाठी उत्तम वैयक्तिक वेबसाइटसाठी परिपूर्ण पॅकेजलहान आणि मध्यम व्यवसायासाठी अनुकूलित

होस्टिंगर फायदे आणि तोटे 

ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात एक चांगली आणि एक वाईट, तसेच होस्टिंगर ला हि आहे. होस्टिंगर वापरण्याचे तोटे हि आहेत, परंतु त्याचे फायदे तोट्यावर मारक ठरतात.  बघूया काय फायदे आणि तोटे आहे ते –

फायदे

तोटे  

आपल्यासाठी होस्टिंगर योग्य वेब होस्ट आहे का?

हो, अगदीच.👍  

नवीन ब्लॉगरसाठी होस्टिंगर वेब होस्टिंग योग्य आणि स्वस्त आहे, म्हणून आपण अगदी सहज हे घेऊ शकतो.आपल्या आवश्यकते अनुसार प्लॅन चा अभ्यास करून आपण होस्टिंगर ला आपली पसंत नक्कीच बनवू  शकता.  

आशा आहे की आपल्या मनात असणाऱ्या सगळ्या प्रश्नाचे निरसन हा लेख नक्की करेल. आपल्या मित्रांसह हा लेख शेअर करण्यास विसरू नका जेणेकरून ते देखील योग्य आणि स्वस्त किमतीत होस्टिंग खरेदी करु शकतील. आपला अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये आमच्यासह शेअर करा. तसेच, आपल्याकडे काही खास वैयक्तिक अनुभव असल्यास, आपण तो आमच्याबरोबर शेअर करू शकता.

धन्यवाद !! ✒️

Exit mobile version