हॉकी बद्दल माहिती मराठीत – Hockey Information in Marathi
हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला Hockey Information in Marathi – हॉकी बद्दल माहिती मराठीत देणार आहे, तर चला बघुयात. आणखी वाचा – फुटबॉल बद्दल माहिती
Contents
माहिती – Hockey Information in Marathi
भारतात सर्वप्रथम हॉकी हा खेळ कोलकात्यात खेळला गेला. हा भारताचा राष्ट्रीय मैदानी खेळ आहे. दोन संघांत हा खेळ खेळला जातो. महिला व पुरुष, मुले, मुली हा खेळ खेळतात. मेजर ध्यानचंद यांनी या खेळाला प्रसिद्धी मिळवून दिली.
खेळाचे मैदान – हॉकी या खेळाचे मैदान आयताकृती असते. या मैदानाची लांबी सर्वसाधारणपणे ९० ते ९५ मी. असते. रुंदी ५० ते ६० मी. इतकी असते. मैदानाच्या मोठ्या रेषेला सीमा रेषा व छोट्या रेषेला गोल रेषा असे म्हणतात.
गोलरेषेच्या मध्यावर दोन लाकडी खांबांमध्ये एक गोल पोस्ट असते. त्या गोल पोस्टच्या मागे मजबूत जाळी बांधलेली असते. दोन्ही उभ्या खांबांपासून दोन्ही बाजूला गोलरेषेपासून खांबांच्या रेषेपर्यंत एक कंस काढतात. त्याचा उपयोग खेळाडूगोल करण्यासाठी करतात.
खेळाचे साहित्य – पांढऱ्या रंगाचा चेंडू, हॉकीस्टिक, हे साहित्य हॉकी खेळणाऱ्या खेळाडूंसाठी आहे. या खेळात असणाऱ्या गोलकीपरसाठी पॅड, खेळाडूंची संख्या – हा खेळ दोन संघांत खेळला जातो. या खेळात प्रत्येक ग्लोव्हज, शिरस्त्राण (हेल्मेट) इ. साहित्य लागते.
पोशाख – खेळाडूंसाठी टीशर्ट, शॉर्ट पॅण्ट, हाफ पँट, बूट असा पोशाख असतो. राज्यस्तरीय पातळीवर हॉकीचे सामने खेळले जातात. संघात ११ खेळाडू असतात आणि ५ खेळाडू राखीव असतात. संघामध्ये एक कर्णधार व एक गोलकीपर असतो.
खेळाचे नियम – हॉकी हा खेळ खेळताना खेळाडूच्या हातात हॉकीस्टिक असणे आवश्यक असते. हॉकीस्टिकच्या खालच्या बाजूकडील भागानेच खेळणे आवश्यक असते. या खेळातील चेंडू हॉकीस्टिकने मारताना दुसऱ्या खेळाडूंना इजा होईल एवढ्या जोरात मारू नये. चेंडू फक्त हॉकीस्टिकनेच टोलवावा. हाताने किंवा पायाने चेंडू खेळण्यास मनाई (नियमबाह्य) आहे.
इतर माहिती – जेव्हा एखादा खेळाडू हॉकीस्टिकने चेंडू मारून गोल पोस्टमधून क्रॉसबार करतो तेव्हा गोल झाला असे मानले जाते. खेळात ज्या संघाचे जास्त गोल होतात तो संघ विजयी होतो.
जर एखाद्या खेळाडूने चेंडू गोलरेषेच्या बाहेर मारला तर विरुद्ध संघाला ‘पेनल्टी कॉर्नर’ दिला जातो. हॉकी खेळासाठी वापरण्यात येणाऱ्या चेंडूत कॉर्क भरलेला असतो व तो वरून चामड्याने शिवलेला असतो. या प्रकारे हॉकी हा खेळ खेळला जातो.
काही भारतीय लोकप्रिय हॉकी खेळाडू – Indian Hockey Players
- ध्यान चंद
- सुरेंदर कुमार
- कृष्ण पाठक
- धनराज पिल्लई
- मनप्रीत सिंग
काय शिकलात?
आज आपण Hockey Information in Marathi – हॉकी बद्दल माहिती मराठीत पहिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.