हिंदी दिवस निबंध मराठी | Hindi Divas Nibandh Marathi

Hindi Divas Nibandh Marathi – मित्रांनो आज “हिंदी दिवस निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Hindi Divas Nibandh Marathi

भारत माता के माथे की बिंदि
है ये हिंदी।
जन-जन की वंदनीय और मा सम
है ये हिंदी |

भारत हा एक विशाल देश आहे. भारतात अनेक धर्म, संस्कृती व भाषा यांचा सुरेख संगम आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागात व प्रांतात वेगवेगळ्या भाषा व बोलीभाषा बोलल्या जातात. इंग्रजांच्या जाचातून भारत 1947 रोजी स्वतंत्र झाला.

अखंड भारतासाठी एक नवीन सुरुवात झाली. भारतासारख्या एवढ्या वैविध्यपूर्ण देशात सर्व गोष्टी एकसंघ ठेवणे हे खूप महत्त्वाचे व जबाबदारीचे काम होते. याला भारतीय संविधानाने प्रत्येक्ष रूप दिले.

हिंदी दिवस निबंध मराठी

प्रत्येक प्रांतात वेगवेगळी भाषा बोलणाऱ्या आपल्या देशाची एक अधिकृत भाषा असावी असा विचार पुढे आला. यावर खूप विचारमंथन झाले. भारतात सर्वात जास्त बोलली व समजली जाणारी भाषा म्हणून ‘हिंदी’ या भाषेला 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधानाने भारताची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आली.

तेव्हापासून 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रभाषा हिंदी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हिंदी ही भाषा देवनागरी लिपीमध्ये आहे. भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा मध्ये हिंदी भाषा सर्वाधिक बोलली जाते.

भारतातील जवळपास 80 टक्के लोकांना हिंदी भाषा समजते. त्याबरोबर हिंदीतून आपले विचार व्यक्त करू शकतात. हिंदी एक सहज व सोपी भाषा आहे. हिंदी भाषेला संस्कृत या भाषेची बहीण मानले जाते. हिंदी भाषेत अनेक प्रादेशिक भाषेतील शब्दांचा समावेश आहे. त्यामुळे ती प्रत्येक भारतीयाला आपली भाषा वाटते.

Hindi Divas Nibandh Marathi

पंजाबी, उर्दू, गुजराती, मराठी, उडिया, राजस्थानी यासारख्या अनेक भाषेतील शब्द आपल्याला हिंदी भाषेत मिळतात. जगात बोलल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या भाषांमध्ये एक प्रमुख भाषा म्हणून ‘हिंदी’ ची ओळख आहे.

जगातील एक प्राचीन, समृद्ध व सोपी भाषा म्हणून हिंदी भाषा परिचित आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते की, “राष्ट्रभाषा शिवाय कोणताही देश मुका आहे.” प्रत्येक देशाची आपली एक राष्ट्रभाषा असते. राष्ट्रभाषेमुळे राष्ट्रीय एकता, समता आणि बंधुभाव वाढण्यास मदत होते. विचारांचे

आदान-प्रदान होते. हिंदी ही व्याकरणदृष्ट्या व साहित्यदृष्ट्या जगातील एक समृद्ध भाषा आहे. हिंदीमध्ये विविध कथा, कविता, कादंबरी, लेख, चरित्र, आत्मचरित्र यासारख्या साहित्यांचे विपुल भांडार उपलब्ध आहे. अनेक प्रतिभावान हिंदी लेखकांनी ते खूप समृद्ध केले आहे व करत आहेत.

हिंदी दिवस निबंध मराठी

विविध नाटिका, सिनेमा, मालिका, जाहिराती या माध्यमातून पूर्ण देशाला हिंदी भाषेची व संस्कृतीची ओळख होत असते. 14 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात ‘हिंदी भाषा दिवस’ म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शाळा, कॉलेज व महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात.

निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य, वाद-विवाद, कथाकथन, कविता वाचन या सारख्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. हिंदी दिवस सप्ताह, हिंदी दिवस पंधरवडा ही काही ठिकाणी साजरा केला जातो. वेगवेगळ्या कार्यालयात अनेक कार्यक्रमांनी हिंदी दिवस साजरा केला जातो.

हिंदी भाषेमध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांना विविध पुरस्कारांनी यानिमित्त सन्मानित करण्यात येते. राज्य व देशपातळीवर सरकार मार्फत ही अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाषा हे आचार व विचार देवाणघेवाणीचे प्रभावी माध्यम आहे.

Hindi Divas Nibandh Marathi

राष्ट्रभाषा म्हणजे तर पूर्ण देशाला एका विचारात व भाषेत बांधणारी भाषा होय. हिंदी या आपल्या राष्ट्रभाषेचे आपल्या व्यवहारात, बोलण्यात विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात संवादासाठी आपल्याला राष्ट्रभाषा हिंदी महत्त्वाची आहे. अखंड भारताचे नागरिक म्हणून आपल्या राष्ट्रभाषा हिंदीचा सन्मान करणे व तिचा जास्तीत जास्त वापर करणे हा आपला राष्ट्रधर्म आहे. प्रत्येक वर्षी हिंदी दिवस साजरा करत असताना आपण आपली खरी ओळख साजरी करतो.

भारतात खूप विविधता असून त्यात एकता कशी आहे हे आपण यातून जगाला दाखवून देतो. फक्त हिंदी दिवसाचे महत्त्व 14 सप्टेंबर या दिवसा पुरते मर्यादित न राहता ते वर्षाचे 365 दिवस अबाधित राहिले पाहिजे. शक्य तितका हिंदीचा वापर करून आपण हिंदी या राष्ट्रभाषेचे महत्त्व कायम ठेवू शकतो. हिंदी दिवसाच्या निमित्ताने आपण हिंदी या राष्ट्रभाषेचे महत्त्व अबाधित ठेवून हिंदीचा गौरव वाढवायला हवा.

हिंदी भाषा नही भावो की
अभिव्यक्ती है।
यह मातृभूमि पर मर मिटने की
भक्ति है।

तर मित्रांना “Hindi Divas Nibandh Marathi”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “हिंदी दिवस निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

कोणता दिवस राष्ट्रभाषा हिंदी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो?

14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रभाषा हिंदी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे?

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४३ नुसार, देवनागरी लिपीतील हिंदी ही देशाची अधिकृत भाषा असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: