हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला गुरूनानक जयंती माहिती, इतिहास मराठी | Guru Nanak Jayanti Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
महिना : | कार्तिक. |
तिथी : | पौर्णिमा. |
पक्ष : | शुद्ध. |
आणखी वाचा – नाताळ
Contents
गुरूनानक जयंती मराठी । Guru Nanak Jayanti Information in Marathi
भारतामध्ये विविध जाती-धर्मांचे लोक राहतात. सण साजरे करतात. त्यामध्ये ‘गुरू नानक जयंती’ हा सण शीख धर्मीय लोक साजरा करतात. धार्मिक महत्त्व विविध धर्मसंस्थापकांनी तपश्चर्या करून, अभ्यास करून मानवी जीवनउद्धारासाठी स्वत:चा एक मार्ग आखला. तो त्यांनी इतरांना दाखवला. त्यातूनच एक धर्म बनला. प्रत्येक धर्माला एक संस्थापक लाभला. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक हे होत. त्यांची जयंती शीख बांधव मोठ्या उत्साहाने साजरी करतात. गुरू नानक यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी पंजाबमधील तळवंडी या खेडेगावात झाला.
गुरू नानक हे ज्या वयात खेळायचे, त्या वयात गावात जी साधू-संत मंडळी येत, त्यांचा उपदेश ऐकत बसत. त्यांना चिंतन करण्याचा नाद लागला. पुढे मोठे झाल्यावर त्यांचे मन संसारात रमेना. त्यांनी फकीरत्व स्वीकारले. गुरू नानक हे उत्तम व उपजत कवी होते. त्यांनी अनेक रचना केल्या. त्यांची रचना जपजी’ ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. त्यांच्या एकत्रित काव्यरचना, पदे, ‘गुरुग्रंथसाहिब’ मध्ये समाविष्ट आहेत. गुरुग्रंथसाहिब हा शीख धर्मीयांचा पवित्र ग्रंथ आहे.
शिखांच्या मंदिरांना ‘गुरुद्वारा’ म्हणतात. तेथे गुरुग्रंथसाहिबाची पूजा होते. हिंदू, मुसलमान, शीख ही सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. ही शिकवण गुरू नानक यांनी दिली. गुरू नानक जयंतीला शीखधर्मीय बांधव ‘गुरुद्वारा’ येथे जाऊन प्रार्थना करतात. पहाटेपासून गुरुद्वारामध्ये अनेक कार्यक्रम होतात. गुरुद्वाराला विद्युत रोषणाई करतात. पूजन, कीर्तनादी कार्यक्रम होतात. शीख धर्मीय बांधव जगाच्या कुठल्याही भागात असले तरी आपल्या आद्य गुरूंची जयंती आपल्या परंपरागत व धार्मिक पद्धतीने साजरी करतातच.
गुरूनानक जयंती । Guru Nanak Jayanti Information in Marathi
“परमेश्वर एकच आहे. तो कोणत्याही एका धर्माचा नाही. जो भक्तिभावनेने त्याला शरण जातो, त्याला तो मिळतो. तो सर्वत्र आहे. सर्व मानव एकमेकांचे बंधू आहेत. जातिभेद निरर्थक आहे,” असा अत्यंत मोलाचा उपदेश करणारे गुरुदेव नानक शीख पंथाचे संस्थापक-प्रवर्तक आहेत. शीख लोक नानकांना आपले धर्मगुरू मानतात. गुरुदेव नानकांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी लाहोरजवळील रावी नदीच्या तीरावरील तलवंडी या गावी झाला. शीख पंथाचे जे सण, उत्सव आहेत त्यांत al गुरुनानक जयंती हा सर्वाधिक महत्त्वाचा उत्सव आहे. या दिवशी शीख बांधव गुरुदेव नानकांच्या प्रतिमेची मोठ्या थाटात मिरवणूक काढतात.
गुरुद्वारात (प्रार्थना मंदिरात) प्रार्थना-प्रवचन, भजन, ग्रंथसाहेब या ग्रंथाचे पठण, लंगर इत्यादी कार्यक्रम होतात. या उत्सवात हिंदू लोक सुद्धा सहभागी होतात. नानकांच्या वडिलांचे नाव काळुचंद व आईचे नाव तप्ता. ते खत्री म्हणजे क्षत्रिय होते. नानकांचा जन्म त्यांच्या आजोळी म्हणजे नानांकडे झाला म्हणून त्यांना नानक असे म्हणतात. असे म्हणतात की नानकांच्या जन्माच्या वेळी सहा योगी, नवनाथ, बावन पीर, चौसष्ट योगिनी, चौऱ्याऐंशी सिद्धी व तेहेतीस कोटी देव त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्या वेळी हा मुलगा छत्रधारी, चक्रधारी होणार असून सर्वांनी याची पूजा करावी असा होणार आहे.
हा एका परमेश्वराशिवाय कुणाचीही पूजा करणार नाही, असे भविष्य सांगण्यात आले होते. गुरुदेव नानक लहानपणापासूनच अत्यंत सात्विक, धार्मिक होते. त्यांची बुद्धी कुशाग्र होती. साधुसंतांच्या संगतीत बसून चिंतन करण्यात, भजन करण्यात ते वेळ घालवीत. नानक सात वर्षांचे झाले तेव्हा त्यांना शाळेत घातले. त्यांनी हिंदी, संस्कृत व फारसी भाषांचा सखोल अभ्यास केला. नवव्या वर्षी वडिलांनी त्यांची मुंज केली; पण त्यांनी जानवे धारण करण्यास नकार दिला. त्या वेळी नानक म्हणाले, “मला वेगळ्या प्रकारचे जानवे हवे आहे. दयेचा कापस बनवा. त्यापासून संतोषाचे सूत काढा. त्या सुताला सत्याचा लेप द्या व त्यावर संयमाचे संस्कार करा. असे जानवे मला घाला, की जे कधी तुटणार नाही. मळणार नाही. जळणार नाही.”
नानकांचे शिक्षणातही मन रमत नसे. नानकांच्या या विचित्र वागण्याने लोक त्यांना वेडा समजू लागले. शिक्षणात नानकांचे लक्ष नाही हे पाहून त्यांच्या वडिलांनी त्यास घरची गुरे राखण्याचे काम सांगितले. परंतु नानक रानात गुरांना सोडून द्यायचा व देवाचे भजन करीत बसायचा. मग नानकाला व्यापारात गुंतविले. पण व्यापारासाठी दिलेले पैसे नानक गोरगरिबांना दान करीत असे. विक्रीसाठी आणलेल्या वस्तू गरजू लोकांना फुकट देत असे. चौदाव्या वर्षी नानकाचा विवाह झाला पण संसारातही ते रमेनात. एके दिवशी नानक घरादाराचा त्याग करून घरातन एकाएकी निघन गेले. वैन नदीच्या तीरावर ते तीन दिवस चिंतन करीत बसले. त्या तीन दिवसांत त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला. परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाचे त्यांना ज्ञान झाले.
परमेश्वराने त्यांना नामपठणाचा, जप करण्याचा व ॐ हेच संतनाम आहे असा संदेश दिला. त्यानंतर नानकांनी कायमचा गहत्याग केला. भारतभर प्रवास करून त्यांनी सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. लोकांना उपदेश केला. प्रवचने केली. त्यांच्या दर्शनासाठी सर्व धर्म, पंथांचे- जातिपातीचे लोक येत. लोकांचे दुःख दूर करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. मी हिंदू नाही – मुसलमान नाही, असे ते सांगत.
जगात परमेश्वर एकच आहे. त्याचे नाव सत्नाम. तोच या सृष्टीचा निर्माता आहे. तो स्वयंभू आहे. परमेश्वर मीत नाही. म्हणन मर्तिपजा व्यर्थ आहे. त्याचे खरे रूप हृदयात आहे जातिभेद, धर्मभेद, पंथभेद खरे नाहीत. हा मूलमंत्र सांगून नानकाना जा नवान धर्म स्थापन केला त्याचे नाव शीख. नाम व गान, दान, स्नान, देवाची व मानवाचा सवा व ईश्वराचे स्मरण या पाच तत्त्वांवर नानकांनी भर दिला होता. परमेश्वर निगुण, निराकार, ॐकारस्वरूप आहे. तो सत श्री अकाल म्हणजे सर्वशक्तिमान आदिपुरुष आहे.
तो सत्यस्वरूप असन अकाल म्हणजे कालातीत आहे. अनंत आहे. सर्वव्यापी आहे. यावर शीख बांधवांची गाढ श्रद्धा आहे. गुरुदेव नानक शांतीचे दूत होते. विश्वबंधुत्वाचे, सर्व धर्म समभावाचे पुरस्कर्ते होते. मानवतेचे पूजक म्हणून त्यांनी केलेले कार्य फारच मोलाचे आहे. त्यांनी नुसत्या स्वतंत्र पंथाची स्थापना केली नाही तर त्या काळात विशेषतः उत्तर भारतात सामाजिक क्रांती घडवून आणली. संगत (धर्मसंघ) व लंगर (अन्नछत्र) यांचा पाया घालून जातिधर्मरहित सामाजिक परंपरा सुरू केली. शिखांचा पवित्र ग्रंथ ग्रंथसाहेब यात नानकदेवांची ९४७ पदे आहेत.
अशा प्रकारे शीखपंथीयांचे साक्षात् देवच असलेले, हिंदुमुसलमानांना एकत्र आणणारे, जगाला प्रेमाचा संदेश देणारे गुरुदेव नानक यांनी १५३८ साली कर्तारपूर (सध्या पाकिस्तानात) येथे आपले अवतारकार्य संपविले. आपल्या मृत्यूनंतर हिंदुमुसलमानांत तंटे होऊ नयेत म्हणून नानकानी अगोदरच सर्व व्यवस्था करून ठेवली होती. माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीरावर फुले वाहावीत. चोवीस तासांनंतर ज्यांची फुले टवटवीत राहतील त्यांनी माझे मृत शरीर घ्यावे.
नानकांच्या या आदेशानुसार हिंदू व मुसलमान यांनी नानकांच्या मृतदेहावरील चादर दूर केली तेव्हा सर्व फुले टवटवीत होती. मात्र नानकांचा पार्थिव देह अदृश्य झाला होता. लोकांनी ती चादर अधी अर्धी वाटून घेतली. मुसलमानांनी तिचे दफन केले तर हिंदूंनी तिचे दहन केले. अशा या थोर अवतारी पुरुषाच्या जयंतीदिनी आपण सर्वांनीच त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्या शिकवणुकीनुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे व ‘सत् श्री अकाल’ असे म्हटले पाहिजे.
काय शिकलात?
आज आपण गुरूनानक जयंती माहिती, इतिहास मराठी | Guru Nanak Jayanti Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.