Site icon My Marathi Status

{सुंदर} गुढी पाडवा निबंध मराठी | Gudi Padwa Nibandh in Marathi

Gudi Padwa Nibandh in Marathi मित्रांनो आज आपण गुढी पाडवा निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात. Essay on Gudi padwa in marathi

Gudi Padwa Nibandh in Marathi

गुढी पाडवा निबंध मराठी:- भारतीय संस्कृती मध्ये सण-उत्सवांच्या परंपरांना काल चक्रानुसार होणाऱ्या पानगळ होते. साऱ्या सृष्टीलाच एक प्रकारची मरगळ आलेली असते.

शिशिरानंतर वसंत ऋतूचे आगमन होते. झाडांना नवीन पालवी फुटते, नवा बहर येतो. उत्साहाचे, नव चैतन्याचे वारे वाहू लागतात. असा हा आनंददायी ऋतु मध्ये बदल चैत्र महिन्यात घडतो.

म्हणून तर झाडांना फुटलेल्या नव्या पालवीला ‘चैत्र पालवी’ म्हणतात. पूर्वीच्या काळी चैत्र महिन्याला ‘मधुमास’ म्हणत. या नावावरूनच या ऋतूचा, या महिन्याचा गोडवा ध्यानात यावा.

गुढी पाडवा निबंध मराठी

‘Gudi Padwa Nibandh in Marathi’- महाराष्ट्रात हिंदू परंपरेनुसार चैत्र महिना हा नव्या वर्षाचा प्रारंभ मानला जातो. या महिन्याची पहिली तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा ही वर्ष प्रतिपदा मानत जाते.

‘प्रतिपदा’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषेत ‘पाडवा’ हा शब्द रूढ झाला. वसंत ऋतूचे आगमन आणि नव्या वर्षाचा प्रारंभ म्हणून ‘चैत्र पाडवा’ साजरा होतो.

या दिवशी गुढ्या-तोरणे उभारण्याची परंपरा रुजल्याने या सणाला ‘गुढीपाडवा’ असे संबोधले जाते.

Gudi Padwa Nibandh in Marathi

Essay on Gudi padwa in marathi अशा प्रकारे हा सण ‘ऋतू’ आणि ‘काल’ यांच्याशी संबंधित आहे. अर्थात, हिंदूंमध्ये चैत्रारंभ हाच वर्षारंभ असे समान सूत्र भारतात सर्वत्र आढळून येत नाही.

काही भागांत चंद्राच्या गतीवरून, तर काही भागांत सूर्याच्या गतीनुसार कालगणना ठरवलेली दिसते. उदाहरणार्थ, तमिळनाडू-केरळमध्ये सौरवर्ष मानले जाते, तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात चांद्रवर्षाप्रमाणे काल  गणना करतात.

उत्तर भारतात बहुतांश भागांत कार्तिक महिन्याची पहिली तिथी नव वर्षारंभ मानली जाते. या तिथीला महाराष्ट्रात दिवाळी पाडवा म्हणतात. “Gudi Padwa Nibandh in Marathi”

ही व्यापारी वर्षाची सुरुवात मानली जाते. चैत्र हा चांद्रवर्षानुसार वर्षाचा पहिला महिना मानला जातो. आपल्या महिन्यांची नावे नक्षत्रांनुसार ठरवण्यात आली आहेत.

उदा. चैत्र महिन्याच्या आगेमागे चित्रा नक्षत्र येते, म्हणून हा चैत्र महिना. सुमारे ८00 वर्षांपूर्वी काश्मीर प्रांतात ‘चैत्र महिन्याचा आरंभ हाच वर्षारंभ होता,’ असे प्राचीन प्रवासी अल्बेरुणीने आपल्या प्रवासवर्णनात लिहून ठेवले आहे.

त्याला ‘अगदूस’ म्हणत असत. ब्रह्मदेवाने याच दिवशी नवीन युगाचा प्रारंभ केला. म्हणून या दिवसाला ‘युगादि’- युगाचा आद्य, पहिला दिवस मानतात.

Gudi Padwa Nibandh in Marathi

‘गुढी पाडवा निबंध मराठी’: युगादी या शब्दाचेच अपभ्रंशीत रूप ‘उगादी’ असे आहे. कर्नाटक प्रांतात या सणाला ‘उगादी’ म्हणतात ते यामुळेच. धर्मशास्त्रानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा सृष्टीच्या निर्मितीचा पहिला दिवस मानला जातो.

ब्रह्मपुराणात यासंबंधीचे उल्लेख आहेत. त्यानुसार ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी जग निर्माण केले आणि कालगणनेला आरंभ केला.

त्यामुळे चैत्र पाडवा सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवासंबंधी कृतज्ञतेचा दिवस मानला जातो. सृष्टिनिर्मितीचा दिवस म्हणून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.

या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा करावी, सृष्टीच्या निर्मितीच्या आनंदाप्रीत्यर्थ ‘ब्रह्मध्वज’ उभारावा, म्हणजेच गुढी उभारावी, असे धर्मशास्त्र सांगते. Gudi Padwa Nibandh in Marathi 

या दिवशी पंचांग पूजा करावी, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या कालगणनेच्या पाच अंगांचे स्मरण करावे, असे धर्मशास्त्रात सांगितलेले आहे.

गुढीपाडवा चे महत्व

Essay on Gudi padwa in marathi विविध पुराणांमध्ये या दिवसांचे महत्त्व आणि करावयाचे पूजा विधी यांचे उल्लेख आहेत. Gudi Padwa Nibandh in Marathi 

नारद पुराणानुसार, वर्ष प्रतिपदेच्या वाराचा स्वामी हा त्या वर्षाचा स्वामी (अधिपती, राजा) मानून त्याचा उत्सव साजरा करावा, असे म्हटले आहे.

उदाहरणार्थ, चैत्री पाडवा रविवारी आल्यास सूर्याची पूजा करावी. विष्णुपुराण, गरुडपुराण, चतुर्वर्ग चिंतामणी आदी ग्रंथांमधून वर्षप्रतिपदेस विद्यारंभ करावा, असे म्हटले आहे.

त्यानुसार एका वेदीवर अक्षतांचे अष्टदल कमळ काढून त्यावर चारी वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांची स्थापना करून पूजा करावी.

बारा वर्षे सातत्याने हे ‘विद्याव्रतारंभ’ करणारा ‘महापंडित’ होतो, अशी फलश्रुती सांगितली आहे. या पाडव्याच्या दिवशी ‘पाटीपूजन’ केले जाते किंवा शाळेत जाऊन विद्येचा श्रीगणेशा केला जातो, ही परंपरा यातूनच आली आहे.

या दिवशी शाळेत जाणारी मुले पाटावर रांगोळी काढून त्यावर पाठ्यपुस्तके ठेवून त्यांची पूजा करतात. हीच प्रतिकात्मक सरस्वतीची पूजा, विद्यापूजा होय. Gudi Padwa Nibandh in Marathi 

मत्स्यपुराण आणि कृत्यकौमुदी या ग्रंथांमध्ये या दिवशी आनंदवत सांगितले आहे. त्यामध्ये जलदानाचे महत्त्व विशद केलेले आहे. तहानलेल्याला पाणी देणे हा मनुष्यधर्म मानला जातो.

या दिवशी पाणपोयी सुरू करून स्वच्छ व शीतल पाणी उपलब्ध करावे, असे म्हटले आहे. ‘आरोग्यव्रत’, ‘तिलकव्रत’ अशी या दिवशी करावयाची आणखी सव्वीस व्रते धर्मशास्त्राने सांगितली आहेत.

gudi padwa nibandh marathi madhe

चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा चैत्री पाडवा या सणाच्या संदर्भात अनेक पौराणिक आख्यायिका आहेत.

श्रीविष्णूंनी चैत्र शुद्ध प्रतिपदेला दुपारी दोन प्रहरी पृथ्वीच्या द्धारासाठी मत्स्यावतार घेतला, म्हणून हा दिवस ‘मत्स्यजयंती’ म्हणूनही साजरा केला जातो.

या संदर्भातील उल्लेख ‘स्मृतिकौस्तुभ’ या ग्रंथात आहेत. लक्ष्मण आणि सीतेसह श्रीराम चौदा वर्षांसाठी वनवासाला गेले.

वनवासात असताना रावणाने सीतेचे हरण केले व तिला लंकेला नेले. Essay on Gudi padwa in marathi

राम व लक्ष्मण यांनी हनुमान व वानरसेनेच्या मदतीने युद्धात रावणाचा वध केला व सीतेची सुटका केली. अशा प्रकारे विजय मिळवून आणि वनवासकाल संपवून श्रीराम सीता व लक्ष्मणासह अयोध्येत परतले.

तो दिवस वर्ष प्रतिपदेचा होता.  त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ अयोध्येच्या नागरिकांनी उत्सव साजरा केला,

गुढ्या-तोरणे उभारली. या दिवसाचे स्मरण म्हणूनही गुढीपाडवा साजरा केला जातो. Gudi Padwa Nibandh in Marathi 

दैवी शक्तींच्या विजया प्रीत्यर्थ त्या देवतांचे नवरात्र साजरे करण्याची प्रथा आहे. त्यानुसार रामनवरात्राचा प्रारंभ या दिवशी केला जातो. चैत्र शुद्ध नवमीला रामजन्म झाला.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला इंद्राने वृत्रासुर नावाच्या राक्षसाचा वध करून पृथ्वीला भयमुक्त केले, याचा आनंद म्हणून हा सण साजरा होतो, अशीही आख्यायिका आहे.

या दिवशी गुढी उभारण्याच्या परंपरेसंबंधीही काही आख्यायिका आहेत. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, म्हणून ‘ब्रह्मध्वज’ उभारण्याचे संकेत धर्मशास्त्रात असल्याचा उल्लेख वर केला आहेच.

गुढी पाडवा कथा

‘Gudi Padwa Katha in Marathi’  त्याचप्रमाणे आणखी एक आख्यायिका महाभारतात आहे. चेदी देशाचा राजा वसू याने वनात जाऊन तपश्चर्या केली. देव त्याला प्रसन्न झाले.

त्यांनी वसूराजाला यशोदायी अशी वैजयंतीमाला, एक विमान आणि राजदंड वर म्हणून दिले. आपल्या राज्यात परतल्यानंतर वसू राजाने या राजदंडाला जरीचे वस्त्र बांधले.

त्यावर सोन्याचे पात्र ठेवून त्याची पूजा केली. हीच गुढीपूजनाची सुरुवात असे मानले जाते. एका काठीला रेशमी वस्त्र बांधून त्या काठीच्या टोकावर चांदीचे अथवा पितळेचे भांडे ठेवून ती काठी उभी केली जाते व तिची पूजा केली जाते.

ही प्रथा आजतागायत चालू आहे. या गुढीला पुष्पहार, कडुनिंबाचा पाला व साखरेचे गाठले (गाठी) बांधतात. भारतीय कालमापन परंपरेत शालिवाहन शक आणि विक्रम संवत् यांना महत्त्व आहे.

उत्तर भारतात प्रामुख्याने विक्रम संवत् प्रचलित आहे, तर आपल्याकडे शालिवाहन शक प्रचलित आहे. शालिवाहन राजाने चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून आपल्या शकाची सुरुवात केली.  या संदर्भातही काही आख्यायिका आहेत.

शालिवाहन विजयी झाला तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहनाने आपला शक या दिवसापासून सुरू केला.

शकांचा पराभव केला म्हणून शक म्हणायचे, असे आख्यायिका सांगत असली, तरी ‘शक’ म्हणजे एखाद्या राजाचा काल. शालिवाहनाप्रमाणेच आणखीही काही शककर्ते होऊन गेले. Gudi Padwa Nibandh in Marathi 

Essay on Gudi padwa in marathi

राजा विक्रम हा त्यापैकीच एक. इसवी सन आणि शालिवाहन शक यांच्यात ७८ वर्षांचे अंतर आहे. म्हणजे शालिवाहन शक हा इसवी सनाच्या ७८ वर्षे मागे आहे.

पाडव्याच्या दिवशी नवे वर्ष सुरू होत असल्याने नव्या वर्षाचे पंचांग पाहण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. नवे वर्ष कसे जाईल, पीक-पाणी कसे होईल, याची उत्सुकता लोकांना असायची.

पूर्वीच्या काळी साक्षरतेचे प्रमाण कमी होते. तसेच छपाईची माध्यमे नसल्याने आजच्यासारखी पंचांगे प्रचलित नव्हती. तेव्हा पाडव्याच्या दिवशी ब्राह्मण घरोघरी जाऊन पंचांग सांगत असत.

या वर्षी वेगवेगळे सण कोणत्या वारी येत आहेत, चंद्र-सूर्याची ग्रहणे कोणत्या महिन्यांत होतील, पाऊस-पाणी कसे असेल, एकूण वर्षाचे फल काय सांगणारा सण आहे.

ऋतुबदलाचे स्वागत करणारा हा उत्सव आहे. त्याला पर्यावरणीय संदर्भ आहे. आज वाढत्या प्रदूषणाच्या काळात पर्यावरणाची चिंता
सर्वांनाच भेडसावत आहे. Gudi Padwa Nibandh in Marathi

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पर्यावरणाचे रक्षण करण्याचे, निसर्ग अबाधित राखण्याचे ‘व्रत’ आपण सर्वांनीच स्वीकारले, तर या सणाला नवे औचित्य व अर्थ प्राप्त होईल.

शेतकर्यांसाठी गुढीपाडवा महत्वाचा

गुढी पाडवा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक मोठा सण आहे. फार पूर्वी बहुतेक लोक शेतीच करीत होते अगर शेतीशी अप्रत्यक्ष संबंध असे. पाडव्यानंतर रब्बी हंगामातील पिकांच्या कापण्या सुरू होत असत.

तत्पूर्वी नवीन धान्याच्या आगमनाची तयारी घरोघरी व्हावी म्हणून पाडव्याचे धुणे ही परंपरा आजही शेतकऱ्यांच्या घरात पाळली जाते. Gudi Padwa Nibandh in Marathi 

हे धुणे म्हणजे घरातील काना कोपरा झाडून स्वच्छ करणे, सर्व अंथरूण- पांघरूण, भांडीकुंडी धुऊन, घासून पुसून घराची पूर्ण स्वच्छता करणे.

या मोठ्या सणापूर्वी आपले घर स्वच्छ झाले पाहिजे ही परंपरा पडून गेली. एक धार्मिक परंपरेचे बंधन असल्यामुळे कितीही अडचणी असल्या तरी ही परंपरा पाळली जाते.

हे काम भरपूर कष्टप्रद असते. घराच्या आकारमानानुसार घरातील बायका २-४ दिवस राबून हे काम पार पाडतात. अनेक घरात पुरुषही ह्या कामात मदत करतात.

या निमित्ताने वार्षिक साफसफाई व्हावी असा उद्देश असला तरी खरा उद्देश अशी साफसफाई झाल्यानंतर घरात येणारे धान्य किडा-मुंगीपासून सुरक्षित रहावे हा आहे.

पूर्वी आजच्या सारखे भिंतींना रंग नसत. मातीने भिंती सारविल्या जात. म्हणून काही भागात पाडव्याचे सारवण असाही शब्द रूढ आहे.

अनेकांना रजा काढून प्रसंगी रोजगार बुडवून हे काम करावे लागते. याबाबत कोणाचीच तक्रार नसते. परंपरेला धर्माचे अधिष्ठान लावल्याने हे काम आपोआप होते व धान्याची आपोआप चांगली साठवणूक होते.

तर मित्रांना तुम्हाला “Gudi Padwa Nibandh in Marathi” हा मराठी निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे गुढी पाडवा निबंध मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठूम कॉपी केल्यास आम्ही घेत नाही. इमेल – pawarshubham66@gmail.com

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Exit mobile version