गुढीपाडवा सणाबद्दल माहिती मराठी – Gudi Padwa Information in Marathi

हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला गुढीपाडवा सणाबद्दल माहिती मराठी – Gudi Padwa Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – १५ Festivals Information in Marathi

दिनांक : १३ मार्च २०२१
महिना : चैत्र
तिथी : प्रतिपदा
पक्ष : शुक्ल

धार्मिक महत्त्व

हिंदू कालगणनेनुसार चैत्र महिन्यापासून हिंदूंचे नवीन वर्ष सुरू होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. हा दिवस वर्षातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे. या दिवसापासून आयुष्यातल्या अनेक चांगल्या गोष्टींचा शुभारंभ केला जातो.

दिवसाचे महत्त्व

हिंदू लोक या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करतात. गृहिणी घरापुढील अंगण झाडून सडा शिंपडतात, सुंदर रांगोळी काढतात. घरातील पुरुष मंडळी दाराच्या चौकटीला आंब्याच्या झाडाच्या पानांचे तोरण बांधतात. या दिवशी बांबूची काठी घेऊन, त्या काठीला तेल लावून स्नान घालतात.

नंतर त्या काठीला हळद- कुंकू लावून, नवीन साडी किंवा नववस्त्र काठीच्या वरच्या भागास बांधून त्यावर धातूचे भांडे किंवा पाण्याचा गडू ठेवतात. फुलांचा हार, फुले, साखरेचा हार (गाठी) आणि कडुलिंबाची डहाळी बांधून गुढीची मनोभावे पूजा करून गुढी उभारतात.

धार्मिक फल

प्रतिवर्षी चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. या दिवशी संवत्सरफल श्रवण केल्याने रोग, दु:ख व दारिद्र्य इ. चा नाश होऊन जीवन आनंद वधनधान्ययुक्त होते.

इतर फल

वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. म्हणून या दिवशी नवीन वास्तू, वाहन, सोने-चांदी आदि खरेदी करतात. व्यापारी लोक या दिवशी नवीन उद्योगधंदा सुरू करतात. वास्तुशांती करण्यासाठी हा दिवस उत्तम मानतात.

काय शिकलात?

आज आपण गुढीपाडवा सणाबद्दल माहिती मराठी – Gudi Padwa Information in Marathi पहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: