ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी | Granth Hech Guru Nibandh Marathi

Granth Hech Guru Nibandh Marathi – मित्रांनो आज “ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. गणित, विज्ञान, औषधशास्त्र, अंकशास्त्र, जन्म-मृत्यू, वैद्यकशास्त्र आदी विविध विषयांवरील ग्रंथ एकत्रित पाहिले तर ग्रंथांचे स्वतंत्र व वेगळे विश्व आपल्यासमोर उभे राहिल्यासारखे वाटते. ग्रंथ आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात.

Granth Hech Guru Nibandh Marathi

ज्ञानेश्वरांच्या शब्दात ग्रंथ म्हणजे वाग्यज्ञ होय. डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे ग्रंथाची थोरवी स्पष्ट करताना लिहितात, सर्व जगावर चालणारी एकमेव सत्ता म्हणजे ग्रंथसत्ता होय.

ग्रंथ हे जिवलग मित्र आहेत, गुरू आहेत. योग्य मार्गदर्शन करून माणसाला सन्मार्गाने नेण्याचे त्याचे व्रत असते.

सदैव मानवाच्या कल्याणाची काळजी करणारे व निःस्पृह सल्ला देणारे प्रेमळ मित्र व गुरू ग्रंथावाचून कोणीच नाही. म्हणून ग्रंथ वाचाल तरच जीवनसंघर्षात वाचाल. “Granth Hech Guru Nibandh Marathi”

ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी

ग्रंथ जीवनाची गोडी लावतात. मनुष्य हा समाजशील प्राणी असला तरी पुष्कळदा त्याला सामाजिक जीवनाचा उबग येतो. पण त्याचबरोबर एकांतवासाचे दुःखही त्याला नको असते.

अशावेळी तो ग्रंथाकडे धाव घेतो. ग्रंथ त्याच्या मनाची मरगळ झटकून टाकतात. त्याला जीवनोन्मुख करतात, वैचारिक बळ व विवेकाचा आधार देतात. ग्रंथ हे ज्ञानदाते तपस्वी आहेत याचा अनुभव ग्रंथालयात येतो. Granth Hech Guru Nibandh Marathi

जनवास सोडून वनवासात रमणारे तपस्वी जसे आपल्याला नतमस्तक करतात तसेच हे ज्ञानसंपदेने युक्त ग्रंथ एखाद्या अद्भुत जादुगारासारखे आपले मन मोहून घेतात.

Granth Hech Guru Nibandh Marathi

‘हे विश्वचि माझे घर’ असणारे ग्रंथ प्रत्येकाविषयी प्रेम बाळगतात. ग्रंथांच्या अंतरंगाचे दर्शन घेतांना आपण आपले दुःख विसरतो, स्वतःला नवलसृष्टीत हरवून घेतो, आणि ज्ञानसागरात डुबून आनंद लुटतो. ग्रंथवाचनासारखा निर्भेळ आनंद दुसरीकडे मिळत नाही.

ग्रंथ म्हणजे जादूची कांडी फिरवणारे नवलभांडारच असते. स्वा. सावरकरांचे ‘सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हे वाचतांना आपण भान हरवून भूतकाळात प्रवेश करतो.

रहस्यकथा वाचतांना आपण गुप्तचरांच्या सोबत असतो. लो. टिळकांचे ‘गीतारहस्य’ वाचून आपण जीवनाचे रहस्य उलगडत असतो. ‘Granth Hech Guru Nibandh Marathi’

ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी

ग्रंथ आपल्या भावनेप्रमाणे फळ देतात. गुरुप्रमाणेच ग्रंथाच्या अंगी लीनता असते. आणि कळत न कळत ते आपल्या सान्निध्यात येणाऱ्यास विनम्र बनवतात, त्यांच्यावर सुसंस्कार करतात, सांगतात.

विद्या विनयेन शोभते मित्राचा सहवास जसा हवाहवासा वाटतो कारण त्याच्या सान्निध्यात मन सदैव समाधानी व प्रसन्न राहते, तसेच ग्रंथाच्या सहवासात नेहमी टवटवीतपणा वाटतो, शिवाय नवी क्षितीजे दिसू लागतात. अज्ञात ज्ञान होते, ज्ञान विस्तार पावते.

Granth Hech Guru Nibandh Marathi

कोणत्याही क्रांतीचे अधिष्ठान ग्रंथच आहेत, मग ती अमेरिकेतील स्वातंत्र्याची क्रांती असो, फ्रान्समधील लोकशाहीची क्रांती असो की रशियातील साम्यवादी क्रांती असो.

क्रांतीला वैचारिक अधिष्ठान थॉमस पेनने दिले, रूसो व्हाल्टेअरने दिले, कॉर्ल मॉर्क्सने दिले. पण काही गुरू चुकीचे मार्गदर्शन करतात, तसेच ग्रंथाचेही असते. Granth Hech Guru Nibandh Marathi

माझा लढा’ हे हिटलरचे आत्मचरित्र किंवा ‘मनुस्मृती’ हे या प्रकारचे ग्रंथ आहेत. म्हणून ग्रंथ गुरू असले तरी त्यांची निवड विवेकाने व सावधपणे करायला हवी.

ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी

असे अपवाद वगळले तर ग्रंथ मानवी मनाला उन्नत करतात, अंतःकरण विशाल करतात, अनुभवाचे अमृत देतात, ज्ञानसंपदा देतात आणि व्यक्तीला व समाजालाही निरोगी बनवतात. म्हणूनच ग्रंथकारांकरिता विशेष पसायदान मागतांना ज्ञानेश्वर म्हणतात,

आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकी इये।
दृष्टादृष्टविजये। होआवे जी ।।

यावरून एक नक्की सांगता येईल की, ग्रंथाची ताकद ज्याला समजली तो त्यांना शरण गेला. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो पाहिला, एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची कंपाउंड वॉल वेगळाच पध्दतीने रंगवण्यात आली.

साधारणत: कार्टून वगैरे आपल्याला बघायला मिळतात. परंतु या भिंतीवर चक्क वेगवेगळ्या ग्रंथांचे मुखपृष्ठ रंगवण्यात आले होते. या कल्पनेचे खरोखरी कौतुक करण्यासारखे आहे. आपला पूर्वापार चालत आलेला ग्रंथांचा वारसा पुढे नेणं ही आपलीच जबाबदारी नाही का!

तर मित्रांना “ग्रंथ हेच गुरु निबंध मराठी “ हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “Granth Hech Guru Nibandh Marathi” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

आपला पहिला गुरु कोण ?

आपला पहिला गुरु आपली आई.

ज्ञानेश्वरांच्या शब्दात ग्रंथ म्हणजे काय?

ज्ञानेश्वरांच्या शब्दात ग्रंथ म्हणजे वाग्यज्ञ होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: