गुगलचा रोमांचकारी इतिहास – Google information history in marathi
Google information in marathi – मित्रांनो तुम्हाला आज जगामध्ये क्वचितच असा एखादा व्यक्ती मिळेल की ज्याने कधी google हा शब्द ऐकला नसेल किंवा google search engine वापरले नसेल. आज इंटरनेट बद्दल माहिती असणाऱ्या व इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की google काय आहे? माहिती असायलाच पाहिजे कारण आज इंटरनेट विश्वातील ९५% पेक्षा जास्त भाग हा गूगल ने व्यापला आहे.
गूगल हे आज जगामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. हे एक केवळ सर्च इंजिन च नसून तर गूगल आज १०० पेक्षा ही जास्त प्रोजेक्ट्स वरती काम करत आहे. Google chrome, google playstore, google drive, google toolbar, gmail, इत्यादी हे काही गूगलचे यशस्वी आणि लोकपरीचित प्रोजेक्ट्स आहेत. Google आणखी खूप साऱ्या प्रोजेक्ट्स वरती काम करत आहे.
या सर्व कारकिर्दी मागे गुगलचा एक खूप रोमांचकारी इतिहास आहे, तर चला मग आजच्या या पोस्टमध्ये आपण जाणून घेऊ google काय आहे google information in marathi आणि गुगलचा इतिहास google history in marathi सर्व माहिती मराठीतून.
Contents
- 1 गूगल काय आहे ( google information in marathi)
- 2 गूगलला Google हे नाव कसे पडले?
- 3 Google full form in marathi
- 4 Google चा इतिहास – Google history in marathi
- 5 Google चा शोध कुणी लावला ? (Who is founder of google)
- 6 Google ची कंपनी कुठे स्थित आहे?
- 7 Google चा निर्माता ( Google founder) कोण आहे?
- 8 गुगलचा CEO कोण आहे? ( Who is ceo of google)
- 9 Google कशाप्रकारे कमाई करते?
गूगल काय आहे ( google information in marathi)
Google हे जगामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे आणि सर्वाधिक लोकप्रिय असे सर्च इंजिन आहे. आज तुम्ही गूगल वर कोणतीही माहिती सर्च करा तुम्हाला अगदी काही सेकंदात च हवी ती माहिती मिळेल. गूगल हे एक इंटरनेट वरील माहिती आणि ज्ञानाचा साठा आहे जे की तुम्हाला हवी असलेली माहिती पुरवतो. Google मध्ये माहिती ही web pages च्या साह्याने साठवली जाते आणि हे सर्व web pages एखाद्या वेबसाईट किंवा मग ब्लॉगमध्ये सकलीत केलेले असतात.
पण आज गूगल हे केवळ एक सर्च इंजिन म्हणून मर्यादित न राहता आज गूगल अनेक प्रॉडक्ट च्या स्वरूपात उपलब्ध आहे. आज गूगल चे कित्येक प्रॉडक्ट्स आपण नियमितपणे वापरतो जसे की chrome browser, gmail, playstore, google drive, इत्यादी. त्यामुळे गूगल ही एक multinational company आहे. गूगल ने इंटरनेट क्षेत्रात खुप मोलाची कामगिरी केली आहे आणि आणखी करतच आहे.
आज जगामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि कार्यक्षम mobile operating system जी की android आहे ती देखील गुगलचीच आहे.
गूगलला Google हे नाव कसे पडले?
कदाचित तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की आज जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सर्च इंजिन ला google हे नाव का दिले असेल. Google नाव ठेवण्याचं काय कारण आहे?
Edward kasner आणि James Newman यांनी लिहिलेल्या mathematics and imagination या पुस्तकात Googol हा शब्द आहे. या Googol शब्दाने प्रेरित होऊन Larry Page आणि Surgey Brian यांनी तयार केलेल्या सर्च इंजिन ला Googol असे नाव दिले.
Googol या शब्दाचा अर्थ आहे १ च्या पुढे १०० शून्य म्हणजे एक खूप मोठी गणितीय संख्या. सुरुवातीला या सर्च इंजिन चे नाव हे Googol असे ठेवण्यात आले होते परंतु नंतर ते Googol पासून Google असे नाव प्रचलित झाले. आज गुगलची Google Inc. ही कंपनी कॅलिफोर्निया येथे स्थित आहे.
Google full form in marathi
Google चा कुठलाही असा official full form नाहीये पण इंटरनेट वर एक google full form खूप प्रचलित आहे.
Google चा फुल फॉर्म आहे – ” Global Organisation of Oriented Group Language of Earth “
Google चा इतिहास – Google history in marathi
जर तुम्ही आजपासून १५-२० वर्षांपूर्वीचा विचार केला तर त्यावेळी इंटरनेटचा शोध तर लागलेला होता परंतु इंटरनेट वर पुरेशी ज्ञान व माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे लोकांना सहज माहिती मिळवणे म्हणजे फार कठीण काम होते.
जसे आपण आज गूगल च्या मदतीने कोणतीही माहिती क्षणार्धात मिळवू शकतो. पण त्याकाळी इंटरनेट वर पुरेशी माहिती नव्हती. इंटरनेट वर थोड्या फार वेबसाइट्स होत्या पण त्यावर देखील आवश्यक आणि हवी ती माहिती मिळत नसे. त्यामुळे त्या काळच्या लोकांचा माहिती व ज्ञान मिळवण्याचा एकमेव स्रोत होता तो म्हणजे पुस्तके किंवा मग एखाद्या वरिष्ठ जाणकार व्यक्ती कढून माहिती मिळवणे, परंतु हे फार अवघड काम होते.
या समस्येचा समाधान केलं Larry Page आणि Surgey Brian यांनी Google सर्च इंजिन निर्माण करून. त्यामुळे इंटरनेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास होत गेला आणि लोकांना ही आवश्यक ती माहिती मिळू लागली.
Google चा शोध कुणी लावला ? (Who is founder of google)
कॅलिफोर्नियातील “स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी” ही उच्च शिक्षणासाठी आज ही जगात प्रख्यात आहे. सन १९९५ मध्ये या युनिव्हर्सिटीमध्ये PHD साठी आलेल्या एका तुकडीत Larry page नावाचा मुलगा होता. Larry हा खूप शांत आणि लाजाळू होता परंतु अभ्यासात अतिशय हुशार आणि संशोधक वृत्तीचा होता. याच युनिव्हर्सिटी मध्ये त्याची surgey brian या मुलाशी भेट झाली. तो larry पेक्षा एका वर्गाने समोर म्हणजेच PHD च्या दुसऱ्या वर्षात होता. परंतु त्याचा स्वभाव लारेपेक्षा खूप विरूद्ध होता. तो खूप धीट आणि बोलका होता.
त्याच काळात नुकताच Www म्हणजेच World wide web चा शोध लागला होता आणि ही संकल्पना खूपच गाजत होती. Www हे एक माहितीचे जाळे असते जे की एकमेकांशी विविध हायपरलिंक च्या साह्याने जोडलेले असते. Larry देखील संशोधनासाठी अश्याच एखाद्या विषयाचा शोध घेत होता.
Larry ने संशोधनासाठी www हाच विषय निवडला कारण त्याच्या लक्षात आले होते की या विषयात खूप मोठे भविष्य आहे आणि यात आणखी खूप सुधार करता येतील.
त्याला या विषयात संशोधन करताना एक गोष्ट लक्षात आली होती, त्याला लक्षात आले की web pages वर ज्याप्रमाणे आपण दुसऱ्या webpages च्या links देऊन forward linking करतो. त्याचप्रमाणे याच webpages च्या अनेक backword linking देखील असू शकतात. म्हणजेच असे अनेक webpages असू शकतात ज्यावर की या webpage ची लिंक असेल. या backword linking लाच आपण सध्या backlink असे म्हणतो.
त्यांच्या लक्षात आले की forward linking पेक्षा backword linking अधिक महत्वाचे आहे. नंतर काही काळाने larry सोबत surgey brian देखील त्याच्या या प्रोजेक्ट मध्ये काम करू लागला.
मग दोघांनी मिळून असा एक प्रोग्राम तयार केला की जो या backlinks ची मोजणी करत असे त्याला त्यांनी Bakerb असे नाव दिले. यातूनच नंतर त्यांनी ‘web crawlers’ ची निर्मिती केली.
त्याकाळात जे काही सर्च इंजिन उपलब्ध होते ते सर्व webpages ची रँकिंग ही त्यात उपलब्ध असणाऱ्या keywords च्या तीव्रतेवर आधारित करत असतं. म्हणजे एखादा keyword ज्या webpages मध्ये सर्वाधिक वेळा आहे त्याचा पहिला रँक त्याचा पेक्षा कमी असणारा दुसरा मग तिसरा अशा प्रकारे. पण या संकल्पनेतून माहितीचे योग्य मूल्यांकन होत नसे हे Larry page आणि Surgey brian च्या लक्षात आले होते.
म्हणून त्यांनी स्वतःचा एक असा algorithm तयार केला जो की web pages ची रँकिंग ही केवळ keyword frequency वर अवलंबून न ठेवता त्यांनी त्यात आणखी एक पैलू समाविष्ट केला. तो म्हणजे backlinks. एखाद्या वेब पेज ला जेवढ्या जास्त backlink असतील तेवढा जास्त त्या वेब पेज रँक असेल. या algorithm त्यांनी सुरुवातीला ‘pagerank’ असे नाव दिले. हाच algorithm आज google म्हणून ओळखला जातो.
नंतर त्यांनी १५ सप्टेंबर १९९६ मध्ये google.com हे डोमेन नोंदवून google search engine सर्व जनतेसाठी लाँच केले. यातूनच त्यांनी मग पदभार सांभाळण्यासाठी ४ सप्टेंबर १९९७ मध्ये “Google Inc. ” या कंपनीची स्थापना केली.
Google ची कंपनी कुठे स्थित आहे?
Google हि एक अमेरिकन कंपनी आहे. Google चे हेड ऑफिस हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात स्थित आहे. Google च्या संस्था ह्या खूप साऱ्या देशात आहेत. भारतात देखील गूगल ची संस्था (sub branch) आहे.
Google चा निर्माता ( Google founder) कोण आहे?
गूगल चा निर्माता हा कुणी एक व्यक्ती नसून Google ला Larry page आणि Surgey Brine या दोघांनी मिळून बनवले आहे. दोघेही Phd चे विद्यार्थी आहेत आणि ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील “stanford university” येथे एकत्र पहिल्यांदा भेटले होते. त्यांनी Www (World wide web) हा विषय त्यांच्या संशोधनासाठी निवडून एकत्र काम केले. यातूनच त्यांना Google तयार करण्याची प्रेरणा मिळाली. आज कलिफॉर्निया येथे google inc. ही कंपनी स्थित आहे.
गुगलचा CEO कोण आहे? ( Who is ceo of google)
सध्या गुगलचा CEO हा सुंदर पिचाई नामक एक भारतीय व्यक्ती आहे. ही आपल्यासाठी खूप आभिमानाची गोष्ट आहे इंटरनेट विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा म्हणजेच Google चा CEO हा भारतीय व्यक्ती आहे.
येवढ्या मोठ्या कंपनीचा CEO होणं म्हणजे खरंच खूप कठीण आहे. ये सर्व शक्य झालं सुंदरच्या स्वभावामुळे आणि त्याच्या कऱ्यशक्तिमुळे. सुंदर पिचाई हा अत्यंत शांत स्वभावाचा आणि प्रामाणिक आहे. तो कोणतीही गोष्ट बोलून दाखवित नाही तर तो आपल्या कार्यातून सिद्ध करतो.
सुंदर हा आज जगातील सर्वात जास्त मागणी असणाऱ्या CEO पैकी एक आहे कारण सुंदर ला गुगलमध्ये काम करत असताना मायक्रोसॉफ्ट सारख्या कित्येक मोठ मोठ्या कंपन्यांच्या ऑफर आल्या. परंतु सुंदर ने google चे भविष्य लक्षात घेऊन तिथेच काम करण्याचे ठरवले.
सुंदर चे google chrome, gmail सारख्या प्रोजेक्ट्स मध्ये मोलाचे योगदान आहे. आज त्याच्या मार्गदर्शनाखाली गूगलने खूप सारे ध्येय साध्य केले आहेत.
Google कशाप्रकारे कमाई करते?
गूगल तुम्हाला gmail, google drive,playstore, google chrome यासारख्या खूप साऱ्या सुविधा मोफत देते. मग तुमच्या मनात कधी तरी प्रश्न पडला असेल की गूगल जवळपास सर्वच सुविधा मोफत देते तर मग गूगल कमाई कसे करते?
Google चे कमाई करण्याचे सर्वात मोठे साधन म्हणजे जाहिरात. आपण ब्लॉग किंवा वेबसाइट्स ला भेट दिल्यानंतर आपल्याला ज्या जाहिराती दिसतात त्याद्वारे गूगलला पैसे मिळतात. त्यामुळे google ला जवळपास ९० ते ९५% पैसे हे केवळ जाहिराती मधून मिळतात.
गूगलचे Google Adword हे एक advertising network आहे. ज्यावर अनेक उद्योजक व कंपन्या आपला उद्योग व व्यवसाय वाढवण्यासाठी जाहिराती तयार करतात आणि गूगल त्या जाहिराती ब्लॉग्स आणि वेबसाइट्स च्या मदतीने हजारों लाखों लोकांपर्यंत पोहचवतो. त्यामुळे व्यवसाय वाढवण्यासाठी व नवीन ग्राहक मिळवण्यासाठी उद्योजकांना मदत मिळते आणि उद्योजक किंवा मग जाहिरातदार त्याबद्दल गूगलला पैसे देतो. अशाप्रकारे Google ची जाहिराती मधून कमाई होते. Google वर जाहिरातीचे मूल्य हे CPC आणि CPM वर अवलंबून असते.
निष्कर्ष : Google information in marathi
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला google बद्दल पूर्ण माहिती google information in marathi दिली. त्याचप्रकारे मी तुम्हाला गुगलचा इतिहास म्हणजेच google history in marathi समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला.
मला अशा आहे की तुम्हाला गूगल बद्दल माहिती google information आणि google history नक्कीच समजली असेल. Google आज इतक्या प्रगतीपथावर आहे त्यामुळे आपल्याला त्याच्या बद्दल माहिती आणि इतिहास माहिती असणे गरजेचे आहे म्हणूनच आजचा हा लेख खास तुमच्या करिता लिहिलेला आहे.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही माहिती सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका, धन्यवाद…!!!