Site icon My Marathi Status

गोकुळाष्ठमी माहिती, इतिहास मराठी । Gokulashtami Information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला गोकुळाष्ठमी माहिती, इतिहास मराठी । Gokulashtami Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

आणखी वाचा – नारळी पौर्णिमा

गोकुळाष्ठमी मराठी । Gokulashtami Information in Marathi

श्रावण वाद्य अष्ठमीला श्री कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्ठमी असे म्हणतात. श्रावण वद्य अष्टमी, बुधवार, रोहिणी नक्षत्र असता मध्यरात्री मथुरेत कंसाच्या तुरुंगात वसुदेवदेवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा पूर्णावतार आहे. श्रीकृष्णाचे जीवनकार्य जसे अद्भुत, अलौकिक, तशी त्याच्या जन्माची कथाही अद्भुत, अलौकिक आहे.

राम अवतार संपल्यावर पुन्हा या पृथ्वीवर सर्वत्र दैत्य उन्मत्त झाले. कंस, चाणूर, मुष्टिक, अघ, बक, केशी, शिशुपाल, जरासंध असे अनेक दैत्य लोकांचा छळ करू लागले. गोब्राह्मणांची हत्या सुरू झाली. विष्णुभक्तांना जगणे नकोसे झाले. पृथ्वीवरील यज्ञयाग बंद पडले. पृथ्वीचा थरकाप उडाला. ती आक्रोश करू लागली. मग इंद्रादी सर्व देव क्षीरसागरात पहुडलेल्या भगवान विष्णूकडे गेले. त्यांनी भगवान विष्णूचे स्तवन करून त्याला सर्व हकीकत सांगितली व प्रार्थना केली की, ‘आता तूच आमचे रक्षण कर. तू दयासागर आहेस.’ त्या वेळी भगवान विष्णू घनगंभीर स्वरात म्हणाले, ‘भिऊ नका. चिंता करू नका.

मी यदुकुळात अवतार घेऊन दुष्ट-दुर्जनांचा संहार करीन. मी सर्वांचा उद्धार करीन. मी मथुरेत वसुदेव व देवकी यांच्या पोटी कृष्ण म्हणून अवतार घेईन. त्या दोघांनी तीन जन्म तप केले आहे. त्या तपाचे फळ म्हणून मी त्यांचा पुत्र होईन.’ हे शब्द ऐकताच सर्वांना अतिशय आनंद झाला. त्या वेळी मथुरेत उग्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. दुरात्मा कंस त्याचा मुलगा. तो अत्यंत दुष्ट बुद्धीचा होता. तो आपल्या आईबापांना मुळीच जुमानीत नसे. यादवांचा तो द्वेष करीत असे. त्याने उग्रसेनाला राजपदावरून दूर केले व तो स्वतःच मथुरेचा राजा झाला.

गोब्राह्मणांना, विष्णुभक्तांना तो ठार मारत असे. मथुरेत अधर्माचे राज्य सुरू झाले. उग्रसेनाला एक सुंदर, सुलक्षणी कन्या झाली. तिचे नाव देवकी. देवकी मोठी झाल्यावर तिचा वसुदेवाशी विवाह झाला. वसुदेव आणि देवकी यांच्या लग्नाची मिरवणूक निघाली होती. कस स्वतः रथ चालवीत होता. त्या वेळी एकाएकी आकाशवाणी झाला : ‘अर दुष्टा, कंसा, देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करील हे त्रिवार सत्य!’ ही आकाशवाणी होताच ती मिरवणूक तिथल्या तिथे थांबली. क्रुद्ध झालेला कंस तलवार बाहेर काढून देवकीला ठार मारण्यास धावला तेव्हा वसुदव हात जाडून त्याला म्हणाला – ‘अरे कंसा, स्त्रीहत्या महापाप आहे.

मला जो पुत्र होईल तो मी तुला देईन. पण कृपा करून देवकीला ठार मारू नकोस.’ वसुदेवाने असे वचन दिले असता कंसाने तलवार मागे घेतली. मग कंसाने देवकीला व वसुदेवाला बंदिशाळेत कोंडले. त्यांच्या हातापायांत बेड्या घातल्या. पुढे यथाकाळी देवकी गर्भवती झाली. तिला अत्यंत सुंदर पुत्र झाला. पण कंसाने त्याकडे लक्षच दिले नाही. कारण देवकीचा आठवा पुत्र कंसाला ठार मारणार होता. म्हणून तो आठव्याची वाट पहात होता. एके दिवशी नारदमुनी कंसाला भेटून म्हणाले, ‘अरे कंसा, तू देवकीच्या मुलाला सोडून कसे दिलेस? तुझा शत्रू कोण हे तुला माहीत नाही. आठापासून उलटे मोजले तर पहिला पुत्रच तुझा शत्रू ठरतो.’

नारदांचा कुटिल डाव कंसाच्या लक्षातच आला नाही. त्याला नारदांचे बोलणे खरे वाटले. आणि त्याने एकामागोमाग एक याप्रमाणे देवकीचे सहा पुत्र जन्मताच ठार मारले. सहा बालहत्या करून त्याने पापांचा फार मोठा संचय केला. त्याने अनेक गोब्राह्मणांची, विष्णुभक्तांची हत्या करून पापांचा ठेवा मोठा केला. मग क्षीरसागरातील शेषशायी भगवान विष्णू शेषाला म्हणाले, ‘आता आपण पृथ्वीवर अवतार घेऊन कंसादी दुष्टांचा संहार करू व सज्जनांचे रक्षण करूया.’ भगवान विष्णूंच्या सांगण्यानुसार शेष देवकीच्या ठिकाणी सातवा गर्भ म्हणून राहिला.

देवकी सात महिन्यांची गर्भवती असताना एके दिवशी रात्री योगमायेने देवकीच्या गर्भात प्रवेश करून तो गर्भ बाहेर काढला व गोकुळात वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी नंदाघरी होती, तिच्या उदरात नेऊन ठेवला व रोहिणी प्रसूत झाली. तिला सूर्यासारखा तेजस्वी पुत्र झाला. तो म्हणजे बलराम. देवकीच्या पोटातील गर्भ नाहीसा झाला हे समजताच कंस सेवकांना म्हणाला, ‘आता आठव्या गर्भावर लक्ष ठेवा. आठव्याची आठवण विसरू नका.’ मग स्वतः भगवान विष्णूंनी देवकीच्या गर्भात प्रवेश केला.

देवकी गर्भवती झाली. त्या वेळी तिच्या शरीराचे तेज आकाशात मावेना. ती आनंदाने डोलत होती. तिला त्या बंदिशाळेत सर्वत्र भगवंताचे दर्शन होत होते. देवकीचे नऊ महिने भरत आले, तेव्हा कंस ‘आता मी आठव्याला ठार मारीन’ असे सारखे बडबडू लागला. तो श्रावण महिन्याचा कृष्ण पक्ष होता. सगळीकडे मुसळधार पाऊस कोसळत होता. श्रीकृष्णाचा जन्मकाळ पाहण्यासाठी आकाशात देवांनी गर्दी केली होती. आकाशातून पुष्पवृष्टी होत होती. श्रावण कृष्ण अष्टमी, बुधवार, रोहिणी नक्षत्र या शुभ मुहूर्तावर मध्यरात्री भगवान विष्णूंनी देवकीच्या पोटी अवतार घेतला. त्या मध्यरात्री अंधाऱ्या बंदिशाळेत लख्ख प्रकाश पडला.

चतुर्भुज भगवान विष्णू देवकीपुढे प्रकट झाले. देवकीचा आनंद गगनात मावेना. ती हात जोडून म्हणाली ‘भगवंता, तू माझ्या पोटी पुत्र म्हणून अवतीर्ण हो.’ भगवान म्हणाले, ‘मी तुझ्यासाठी या क्षणीच लहान मूल होतो. पण मला येथून गोकुळात नेऊन ठेवावे.’ देवकी वसुदेवाला म्हणाली, ‘हा अजन्मा आहे. याला गोकुळात नेऊन नंदाच्या घरी ठेवा. कसलीही भीती बाळगू नका.’ त्या मध्यरात्री भयंकर पाऊस पडत होता. यमुनेला महापूर आला होता. त्या बंदिशाळेच्या दारांना मोठमोठी कुलपे होती. बाहेर रक्षक पहारा करीत होते. परंतु परमेश्वराची लीला अगाध! वसुदेवाच्या पायांतील बेड्या तटातट तुटल्या. कारावासाची दारे आपोआप उघडली गेली.

पहारेकरी गाढ झोपेत होते. सगळीकडे अगदी सामसूम! वसुदेव बाल कृष्णाला घेऊन निघाला. त्यांना कुणीच पाहिले नाही. यमुनेने वाट करून दिली. वसुदेव नंदाच्या वाड्यात गेला. सगळेजण गाढ झोपेत होते. त्याच वेळी यशोदा प्रसूत होऊन तिला मुलगी झाली होती. ती योगमायाच होती. वसुदेवाने बाल कृष्णाला यशोदेजवळ ठेवले व तिची मुलगी उचलून घेतली. तिला घेऊन वसुदेव मथुरेच्या बंदिवासात परत आला. त्यांना कुणीच पाहिले नाही. ती लहान मुलगी एकाएकी रडू लागली.

कंसाला वाटले आठवा जन्मास आला. तो धावत बंदिशाळेत गेला. देवकीच्या हातातील ती मुलगी ओढून घेतली. तो आठवाच आहे असे समजून कंस तिला दगडावर आपटणार, तोच ती मुलगी त्याच्या हातातून निसटला व आकाशात गला. तो कसाला म्हणाला, “अरे दुष्ट कसा, तुझा वरा गोकुळात सुखरूप वाढत आह! अस बालून तो महाशक्ती अदृश्य झाली. कंस मात्र त्यामुळे अतिशय घाबरला. तिकडे गोकुळात यशोदा जागी झाली. तो आनंदाचा कंद असा श्रीरंग कृष्ण पाहून ती अतिशय आनंदित झाली. यशोदेला मुलगा झाला ही बातमी वाऱ्यासारखी गोकुळात पसरली. सर्व गोप-गोपी आनंदाने धावतच नंदाच्या वाड्यात आले.

गोकुळात नंदाच्या वाड्यात श्रीकृष्णजन्माचा उत्सव सुरू झाला. त्या वेळी गर्गमुनींनी बाल कृष्णाचे भविष्य सांगितले, तसेच त्याचे जीवनचरित्र घडत गेले. भारतीय संस्कृतीत श्रीकृष्णचरित्राचा महिमा फार मोठा आहे. दुर्जनांचा नाश, साधूंचे संरक्षण व धर्माची संस्थापना हे श्रीकृष्णचरित्राचे सार आहे. हतवीर्य झालेल्या अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली. कंस, जरासंध, नरकासुर, शिशुपाल इत्यादी दुष्ट राजांना ठार मारून श्रीकृष्णाने लोकांना सुखी केले.

श्रीकृष्ण मनुष्याप्रमाणे जन्मला, वाढला, जगला; परंतु त्याने आयुष्यभर केलेल्या महान कार्यामुळे त्याला देवत्व प्राप्त झाले. तो अवतारी पूर्णपुरुष ठरला. या सर्व गोष्टींचे स्मरण म्हणून गोकुळअष्टमीचा उत्सव करावयाचा असतो. या दिवशी गावातील श्रीकृष्णमंदिरात हा उत्सव अत्यंत थाटाने साजरा केला जातो. घरोघरी घरगुती स्वरूपातही श्रीकृष्णजन्मोत्सव साजरा करतात. श्रीकृष्णाचे पूजन, कीर्तन आणि नंतर रात्री बारा वाजता जन्मकाळ साजरा करतात. या दिवशी एकादशीप्रमाणे उपवास करतात. भागवतपुराण, हरिविजय इत्यादी ग्रंथांचे वाचन करतात. दुसऱ्या दिवशी दहिहंडी, गोपाळकाला, पारणे असते. आबालवृद्ध स्त्री-पुरुष सर्वांना आनंद देणारा हा गोकुळअष्टमी उत्सव आहे.

काय शिकलात?

आज आपण गोकुळाष्ठमी माहिती, इतिहास मराठी । Gokulashtami Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version