गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध | Godhadiche Atmakathan Nibandh in Marathi

Godhadiche Atmakathan Nibandh in Marathi – मित्रांनो आज “गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Godhadiche Atmakathan Nibandh in Marathi

देई विश्वाची गोडी ।
माझ्या आईची गोधडी ।।
पांघरूण नव्हे कवच ती ।
शिदोरी साऱ्या जन्माची ॥

गोधडी हे कापडाचे तयार केलेले अंथरूण किंवा पांघरूण आहे. जुनी कापडे किंवा कपडे वाया जाऊ नयेत म्हणून ते एकत्र करून आणि धुवून त्याची गोधडी बनवतात. पारंपरिक पद्धतीत गोधडी सुई-दोरा वापरून, सर्व कापडे व्यवस्थित अंथरून छोटे-छोटे टाके घालून शिवली जाते.

 

 

गोधडी आयताकार असते. त्याच्यावर वेगवेगळ्या रंगाच्या कपड्याने नक्षी काढतात. तिला बाहेरच्या बाजूने कापणीच्या आकाराची नक्षी लावली जाते. गोधडी वर नाव किंवा वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या ही लावतात. शिवणयंत्रावरही गोधड्या शिवता येतात. “गोधडीला वाकळ व लेपाटी असेही म्हणतात. पावसाळ्याचे दिवस चालले होते. [Godhadiche Atmakathan Nibandh in Marathi]

गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध

सर्वत्र ‘मुसळधार पाऊस पडत होता आणि मी शाळेत होतो. माझी घरी जाण्याची वेळ झाली होती तरी पाउस काही थांबायला तयार नव्हता. म्हणून मी पावसामध्ये घरी जाण्याचा निश्चय केला. घरी जाईपर्यंत मी पूर्ण भिजलो होतो आणि मला थंडी वाजू लागली. आता मी ठरवले की सर्वप्रथम कपडे बदलून गोधडी अंगावर पांघरून अंगातील थंडी घालवणार.

ठरल्याप्रमाणे मी माझ्या रूममध्ये गेलो आणि गोधडी अंगावर पांघरलेल्या ने मला खूप बरे वाटले. माझ्या अंगातील थंडी क्षणात पळून गेली व मला गरम वाटू लागले. खरंच या गोधडी मध्ये इतकी उब असते की, कितीही थंडी असो गोधडी पांघरली की थंडी क्षणामध्ये पळून जाते.

 

 

हा देखील निबंध वाचा »  क्रिसमस / नाताळ निबंध मराठी | Natal Nibandh in Marathi

खरतर ही गोधडी मला माझ्या आईने दोन वर्षापूर्वी तिच्या हाताने शिवून दिली होती. आता या गोधडीची अवस्था थोडी खराब झाली आहे तरीसुद्धा या मध्ये मला अधिकच ऊब मिळते. जरासा डोळा लागतो नी लागतो काय, मला एक आवाज आला ‘काय मित्रा मस्त झोपला’.

Godhadiche Atmakathan

मी दचकचतच उठलो आणि आजूबाजूला बघितले की कोण बोलत आहे, नंतर पुन्हा आवाज आला अरे वेड्या इकडे तिकडे काय बघतोस मी गोधडी बोलते आहे. [Godhadiche Atmakathan Nibandh in Marathi]

गोधडीचे हे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले, गोधडी मला म्हणाली तुला या थंडीच्या दिवसात माझ्यामुळे मस्त झोप येते, आणि थंडी संपली की माझे काम झाले की तू मला दूर सारतो. तुला माहिती आहे का ? माझ्या जन्म गरिबीतूनच झाला आहे. गरिबांकडे गाद्या, चादरी, ब्लॅकेटे कुठून असणार?

मग त्यांनी त्यातून मार्ग काढला. त्यांनी आपल्या जवळच्या जुन्या साड्या, जुने कपडे, कापडे जमा केले. सगळे धुऊन स्वच्छ केले. त्यांचे व्यवस्थित तुकडे केले. सगळे तुकडे नीट जुळवून शिवून काढले आणि माझा जन्म झाला. तीच मी गोधडी ! मी स्वतः जमिनीवर पसरते. “Godhadiche Atmakathan Nibandh in Marathi”

गोधडीचे आत्मकथन

जमिनीवरील बारीक बारीक दगड, खड्डे, जमिनीचा खरखरीतपणा हे सर्व मी माझ्या अंगाखाली घेते आणि सर्वांसाठी मऊमऊ अंथरुण तयार करते. कधी कधी मी पांघरुण बनते. त्यांचे थंडीवाऱ्यापासून रक्षण करते. माझ्या उबदार स्पर्शाने ते निवांतपणे झोपी जातात. असे निवांत झोपण्यासारखे दुसरे सुख नाही. ते सुख मी त्यांना देते. आता जग बदलत चालले आहे. माझी काही भावंडे मॉलमध्ये दिसू लागली आहेत. त्यांच्या किमती भारी असतात. {Godhadiche Atmakathan Nibandh in Marathi}

गरिबांना त्या थोड्याच परवडणार? पण करणार काय? आता आमची सुद्धा संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. मात्र काही जण अजूनही आम्हाला प्रेमाने सांभाळत आहेत. तेव्हा, जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत सगळ्यांना निवांत झोप मिळवून देऊ. हेच आमचे जीवनकार्य आहे. तेवढ्यात आईने मला आवाज दिला आणि गोधडी चा आवाज शांत झाला. व मी लगेच आईला म्हणालो, आई आपण ना उन्हाळ्यात दरवर्षी एक गोधडी शिवायची आणि आणि आपण आजी-आजोबांना पण शिवून देवू……

हा देखील निबंध वाचा »  चला खेड्याकडे निबंध मराठी | Chala Khedyakade Nibandh Marathi

तर मित्रांना “Godhadiche Atmakathan Nibandh in Marathi”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

गोधडीला कोण कोणत्या नावाने ओळखले जाते?

गोधडीला वाकळ व लेपाटी असेही म्हणतात.

गोधडी कशापासून बनवली जाते?

गोधडी हे कापडाचे तयार केलेले अंथरूण किंवा पांघरूण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: