Site icon My Marathi Status

गौतम बुद्ध बद्दल माहिती मराठीत – Gautam Buddha Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला गौतम बुद्ध बद्दल माहिती मराठीत – Gautam Buddha Information in Marathi त्याचबरोबर गौतम बुद्ध यांचे विचार – Gautam Buddha Thoughts in Marathi देणार आहे, तर चला बघुयात. आणखी वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

१] नाव – गौतम बुद्ध
२] जन्म – इ.स.पू. ५६३ लुंबिनी, नेपाळ
३] मृत्यू – इ.स.पू. ४८३ कुशीनगर, उत्तर प्रदेश, भारत
४] वडील – शुद्धोधन
५] आई – महामाया

गौतम बुद्ध यांचा परिचय – Gautam Buddha Information in Marathi

इ.स. पूर्व सहाव्या शतकात मानवाचे दुःख, त्याच्या दुःखाची कारणे व ते सोडविण्याचा मार्ग सांगणारे भगवान बुध्द होऊन गेले. मानव संस्कृतीचा इतिहासात त्यांचे स्थान अव्दितीय व अनन्यसाधारण आहे. आज अडीच हजार वर्षे होऊन गेली तरी त्यांची शिकवण चिरंतन स्वरुपाची राहिली आहे.

इ.स. पूर्व ५३६ या वर्षी वैशाख पौर्णिमेला लुम्बिनीजवळील शालवृक्षाखाली मायादेवीच्या उदरी यांचा जन्म झाला. जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशी मायादेवीचे निधन झाले. त्यानंतर गौतमांचा संभाळ त्याची मावशी प्रजापती गौतमी हिने केला. त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होते.

शाक्यकुळात जन्मल्यामुळे शाक्यमुनी, सिध्दार्थ, गौतम, शौद्धेदन, अर्कबुद्ध, मायादेवीसतुत, बोधिसत्व अशी त्यांची वेगवेगळी नावे होती. सिध्दार्थाच्या जन्मानंतर राजपुरोहिताने असे भविष्य वर्तविले की, एकतर हा मुलगा चक्रवर्ती व पराक्रमी सम्राट होईल किंवा महाज्ञानी व विरक्त होईल.

बालसिध्दार्थाजवळ अलौलिक बुद्धिमत्ता होती. तो लहानपणापासूनच गंभीर व चिंतनशील वृत्तीचा होता. बालपणीच सिध्दार्थाला ध्यानधारणेची आवड होती. जीवनात त्याला कोणतेही दुःख दिसू नये, अशी काळजी शुद्धोदन राजाने घेतली होती.

सिद्धार्थाचा विवाह करण्याचे शुद्धोदन राजाने ठरविले, मात्र विचारासाठी त्याने एक अट घातली म्हणजे पत्नी म्हणून जिची मी निवड करीन, ती स्त्री मला गुणांनी अनुरुप हवी, मग ती ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य व शूद्र यांपैकी कोणत्याही वर्णातील असली तरी चालेल, शेवटी यशोधरा नावाच्या मुलीशी सिध्दाथाचा विवाह झाला.

त्याला एक मुलगा झाला. याचे नाव राहूल, एक दिवस रथातून बाहेर जात असताना मनाला विषण्ण करणाऱ्या चार दृश्ये त्याला दिसली वार्धक्याने वाकलेला एक जख्ख म्हातारा, रोगाने पछाडलेला भिकारी, तिसरे दृश्य एक प्रेतयात्रा आणि चौथे दृश्य शांतपणे चालणारा एक संन्यासी.

त्या यतीकडे पाहून सिद्धार्थाला वाटले की, हेच जीवन चांगले ! ह्याच मार्गाने मानवाची रोग, वार्धक्य, दुःख व मृत्यू यांपासून सुटका होऊ शकेल. सिद्धार्थाचे वय त्यावेळी ऐन तारुण्यात होते.

आपण घर सोडून जाणार असल्याचा विचार त्याने यशोधरेजवळ बोलून दाखविला होता. शेवटी वयाच्या २९ व्या वर्षी सिध्दार्थाने पत्नी, मुलगा, राजवाडा व राज्य सोडले आणि मानवतेच्या चिकल्याणाच्या शोधासाठी ते निघाले.

तत्वज्ञान व कार्य – Gautam Buddha Information in Marathi

अनेक वर्षे त्यांनी तपश्चर्या केली. शरीराला क्लेश दिले. एक दिवशी झाडाखाली ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना एकदम ज्ञान दिले व प्रकाश दिसला. ह्या वृक्षाला बोधिवृक्ष म्हणतात. ते पिंपळाचे झाड होते.

उरुवेला हे स्थान बिहारमध्ये बुद्धगयेजवळ आहे. या जगात जे जे काही आहे, ते ते नाशिवंत आहे. मानवाचे सर्व विचार, भावना, इच्छा व आसक्ती ही त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरतात व त्यापासून मानवला मुक्त होता येते. निर्वाण स्थिती म्हणजेच अखंड शांतीची अवस्था प्राप्त करून घेता येते.

सारनाथ येथे बुद्धाने पहिले प्रवचन दिले. तेथे त्यांना चार आर्यसत्यांचा शोध लागला. दुःख , दुःखसमुदाय, दुःखनिरोध आणि दुःखनिरोधमार्ग, ह्यालाच मध्यममार्ग म्हणतात. गौतम बुद्धांनी सांगितलेला हा मध्यममार्ग म्हणजे आत्यंतिक भोगवाद आणि आत्यांतिक त्यागवाद यांच्यामधला मार्ग आहे.

गौतम बुद्धांनी आपल्या जीवनात आम्रपाली वेश्या, अंगुलीमाल डाकू या पतितजनांचा उद्धार केला. त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान व विचार हे अमूर्त चिंतनात विहार करणारे नव्हते, तर ते व्यावहारिक होते. मानवी जीवनाचे मूलभूत प्रश्न त्यांनी महत्वाचे मानले. शुद्ध सदाचरणाला त्यांनी महत्व दिले.

जातिभेद, राष्ट्रभेद दूर करुन आपला बौध्द धर्म दुसऱ्या देशांतही नेला. त्यांनी धर्मचक्र प्रवर्तनाचे कार्य केले. बिहारमधील नालांदा हे स्थळ प्रचंड विद्यापीठासाठी प्रसिध्द होते.

गौतम बुध्द तेथे जाऊन राहिले होते. तेथील राजा बिंबिसार गौतम बुध्दाचे शिष्यबनले. स्वतः शुद्धोदन राजाने व राजघराण्यातील इतर सर्वांनी त्यांची शिकवण मान्य करुन बौद्धधर्माची दीक्षा घेतली व बौद्ध धर्माचा प्रसार केला. आनंद हा गौतम बुद्धांचा चुलतभाऊ होता. पुढे तो बुद्धांचा पट्टशिष्य बनला.

शेवटी वयाच्या ८० व्या वर्षी कुशीनगर येथे शालवृक्षाखाली त्यांना निर्वाणस्थिती प्राप्त झाली. गौतम बुद्धाचे क्रांतिकारकत्व ह्यात आहे की, त्यांनी प्रवर्तित केलेला धर्म हा ईश्वरकेंद्रित न राहता, तो मानवकेंद्री बनविला. त्यांनी आपल्या तत्वज्ञानात नैतिक सदाचरणाला व चित्तशुद्धीला महत्व दिले.

विश्वव्यापी करुणेची स्थिती आणि मैत्रीची प्रेरणा त्यांच्या नीतिशास्त्रात दिसून येते. तृष्णात्यागाला त्यांनी महत्व दिले. स्वतःची उन्नती ही कोणत्याही बाहय व पारलौकिक शक्तींनी न करता, आत्मोन्नतीवर त्यांनी भर दिला. हे बौद्ध धर्माचे खास वैशिष्टय आहे.

गौतम बुद्ध यांचे विचार – Gautam Buddha Thoughts in Marathi

०१] प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री असेल तरच विद्येचा उपयोग आहे.
प्रज्ञा म्हणजे शहाणपण. शील म्हणजे चांगलं आचरण, करुणा म्हणजे सर्व माणसांविषयी प्रेमभाव , मैत्री म्हणजे सर्वांबद्दल आत्मीयता . या चार गुणांनी ज्ञान युक्त असेल तरच त्याचा उपयोग होतो. म्हणून त्यांच्यानुसार आपण आपलं चारित्र्य घडवलं पाहिजे. मार्ग खडतर असला तरी तो हिताचा आहे.

०२] विनम्र वृत्ती ही सर्व दैवी गुणांचे मूळ आहे.
विनम्र वृत्तीमुळे माणूस सदैव स्वागतशील राहू शकतो. त्यामुळे सतत नवीन काही तरी शिकण्याची क्षमता त्यांच्या अंगी शिल्लक राहते . असा माणूस आपलं व्यक्तिमत्त्व विविधांगाने फुलवू शकतो आणि असा माणूसच सुसंवादी जीवन जगू शकतो.

०३] मी तुम्हाला एक शस्त्र दिले आहे, ते म्हणजे विवेकशक्ती
विवेक म्हणजे एक कुशल धारदार शस्त्रच आहे . माणसाच्या जगण्यात अनेक जटिल समस्यांचा गुंता सोडविण्यासाठी विवेकरूपी शस्त्राचाच उपयोग होतो. विवेकशून्य माणसांचे जगणे म्हणजे शस्त्रहीन सैनिकाचे लढणे होय . विवेक हे सर्व शस्त्रांचे शस्त्र व शास्त्रांचे शास्त्र आहे.

०४] स्वानुभूति हेच माझे मत
स्वतःच्या अनुभवांच्या आधारावर आपले मत बनवावे, असे भगवान बुद्ध म्हणतात ते योग्यच आहे. ऐकिव वा अप्रत्यक्ष माहिती हे दुय्यम स्वरूपाचेच ज्ञान होय. त्यावर विसंबण्यापेक्षा स्वतःच अनुभव जे सांगतो त्यावर विश्वास ठेवणेच श्रेयस्कर होय.

गौतम बुद्ध यांचे काही तथ्य – Facts About Gautam Buddha in Marathi

काय शिकलात?

आज आपण गौतम बुद्ध बद्दल माहिती मराठीत – Gautam Buddha Information in Marathi पहिली आहे, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version