हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला श्री गणपतीची आरती – Ganpati Aarti in Marathi Lyrics देणार आहे. तुम्ही शोधात असाल कि श्री गणपतीची आरती मराठीत – Ganpati Aarti in Marathi Lyrics कुठे मिळेल तर हे आर्टिकल तुमच्यासाठी आहे. तर चला बघुयात.
Contents
श्री गणपतीची आरती – Ganpati Aarti in Marathi
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची
जय देव जय देव जय जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पूर्ती ॥धृ॥
रत्नखचित फरा तुज गौरिकुमरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरेजडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नूपुरेंचरणी घागरिया
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शमात्रे मनकामना पूर्ती ॥१॥
लंबोदर पितांबर फणिवरबंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पूर्ती ॥२॥
श्री देवीची आरती – । Ganpati Aarti in Marathi Lyrics
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म-मरणातें वारी
हारी पडलों आता संकट निवारी ॥१॥
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी
सुरवईश्वरवरदे तारक संजीवनी ।।६।।
त्रिभुवनभुवनी पहाता तुजऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।।
साही विवाद करितां पडले प्रवाही।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी
सुरवईश्वरवरदे तारक संजीवनी ।।६।।
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा
क्लेशापासुनि सोडी तोडी भवपाशा
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा
नरहरि तल्लिन झाला पदपंकज लेशा
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ॥ ३ ॥
गणपती प्रार्थना – Ganpati Aarti in Marathi
घालीन लोटांगण वंदीन चरण,
डोळ्यांनी पाहिन रूप तुझें।
प्रेमे आलिंगिन, आनंदें पुजिन,
भावें ओवाळिन म्हणे नामा ॥
त्वमेव माता च पिता त्वमेव,
त्वमेव बधुश्च सखा त्वमेव।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव,
त्वमेव सर्व मम देव देव ॥
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा,
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यद्यत सकलं परस्मै,
नारायणयेति समर्पयामि ॥
अच्युतं केशवं रामनारायणं,
कृष्णदामोदरं वासुदेव हरिम ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं,
जानकीनायकं रामचंद्र भजे ॥
हरे राम हरे राम राम राम हरे हरे।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
काय शिकलात?
आज आपण श्री गणपतीची आरती मराठीत – Ganpati Aarti in Marathi Lyrics बघितली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.