ईद-ए-मिलाद बद्दल माहिती मराठीत – Eid e Milad Information in Marathi
हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला Eid e Milad Information in Marathi – ईद-ए-मिलाद बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – महाशिवरात्री
माहिती – Eid e Milad Information in Marathi
ईद-ए-मिलाद धार्मिक महत्त्व ईद-ए-मिलाद हा सण इस्लाम धर्मीयांमध्ये साजरा केला जातो. दिवसाचे महत्त्व : इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून या सणाला फार महत्त्व प्राप्त झाले.
धर्मीयांमध्ये बासी ईद साजरी केली जाते. या दिवशी आपल्या इतर धर्मांमध्ये ज्या पद्धतीने विविध सण साजरे केले जातात, त्याप्रमाणेच इस्लाम धर्मामध्ये ईद, बकरी-ईद, मोहरम हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक होत. या दिवशी मुस्लीम लोक नवीन कपडे घालतात व मशिदीमध्ये जाऊन नमाज पढतात. नंतर मित्रमंडळी व नातेवाईकांना भेटून शुभेच्छा देतात.
मुस्लीम धर्मगुरू मशिदीत प्रवचन देतात. इतर महत्त्व : या दिवशी मुस्लिम बांधव घरी वेगवेगळे गोड पदार्थ तयार करतात. त्या पदार्थांत “शिर खुर्मा” हा महत्त्वाचा पदार्थ असतो. इतर धर्मातील लोकांना घरी बोलावून त्यांना गोड पदार्थ खाण्यास देतात.
इतर धर्मीय लोक ‘ईद मुबारक’ असे म्हणून त्यांना या सणाच्या शुभेच्छा देतात. ईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम नातेवाईकांना व घरातील सर्वांना घेऊन बागबगीचामध्ये जातात व तेथे एकत्र जेवण करतात.
या सणानिमित्त समाजातील इतर लोकही सहभागी होतात; त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता दृढ होण्यास मदत होते. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर’ यांचा मृत्यूही याच दिवशी झाला, हा एक योगायोगच म्हणावा लागेल; इस्लाम धर्मीय लोक ईद- ए-मिलाद हा सण आनंदाने साजरा करतात.
काय शिकलात?
आज आपण Eid e Milad Information in Marathi – ईद-ए-मिलाद बद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.