बंगालमधील दुर्गापूजा माहिती, इतिहास मराठी | Durga Puja Information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला बंगालमधील दुर्गापूजा माहिती, इतिहास मराठी | Durga Puja Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

आणखी वाचा – नवरात्र उत्सव

Contents

दुर्गापूजा मराठी | Durga Puja Information in Marathi

दुर्गापूजा हा बंगाली लोकांचा सर्वात आवडता व मोठा सण. दिवाळीप्रमाणेच हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दहा दिवस हा उत्सव चालतो. महाराष्ट्रात पुणे, मुंबई इत्यादी मोठ्या शहरांत भव्य स्वरूपात सार्वजनिक गणेशोत्सव असतो. त्याप्रमाणे बंगालमध्ये आश्विनातील नवरात्रात ठिकठिकाणी सार्वजनिक स्वरूपात दशभुजा दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते.

या मूर्ती वेगवेगळ्या आकारांत बाजारात विकावयास येतात. काही मूर्ती अतिभव्य असतात. दुर्गादेवीबरोबर लक्ष्मी, सरस्वती, गणेश व कार्तिकेय यांच्याही मूर्ती असतात. महिषासुर मर्दिनी दुर्गादेवी सिंहासह असते. दुर्गादेवीने महिषासुराच्या छातीवर पाय दिला व त्याला ठार मारले म्हणून तिचे महिषासुरमर्दिनी असे नाव रुढ झाले. महिषासुरमर्दिनी ही साक्षात रणचंडी! तिचे रूप भयंकर असते. तिने जीभ बाहेर काढलेली असते.

डोळे रागाने लाललाल झालेले, हातांत वेगवेगळी शस्त्रे, एका हातात उपसलेली तलवार असते. एका हातात राक्षसाचे मुंडके धरलेले असते आणि राक्षसाच्या अंगावर पाय देऊन ती नाचते आहे, अशी दुर्गादेवीची मूर्ती असते. कलकत्त्यात हा दुर्गादेवीचा नवरात्रोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करतात. हा उत्सव बंगालचा राष्ट्रीय उत्सव मानलेला आहे. पहिले चार दिवस देवीची सजावट केली जाते. पाचव्या व सहाव्या दिवशी देवीला आवाहन करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते. सातवा, आठवा व नववा हे दिवस या उत्सवाचे महत्त्वाचे दिवस असतात.

या काळात देवीच्या मंडपात गायन, वाद्यसंगीत, नाटके इत्यादी कार्यक्रम होतात. नऊ दिवस दुर्गादेवीपुढे चंडीपाठ चालतो. नवरात्रकाळात स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, लहान-मोठे अशी सर्व माणसे देवीची मूती व आरास पाहण्यासाठी रस्त्यारस्त्यातून हिंडत असतात. कालिमातेचा विजय असो. दुर्गादेवी की जय, अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमत असतो. या काळात शाळांना सुट्टी असते. नोकरीधंद्यानिमित्त बाहेरगावी असलेले बंगाली लोक दुर्गापूजेसाठी आपल्या घरी आलेले असतात. हे दिवस सुगीचे असतात. घरे धनधान्याने भरलेली असतात. बाजारात तेजी असते.

‘पूजा बाजार’ हे या काळात बंगालमध्ये मोठे आकर्षण असते. आपल्याकडील गणपती, दिवाळीप्रमाणे खरेदी-विक्री जोरात चालते. बंगाली लोकांच्या उत्साहाला, आनंदाला उधाण आलेले असते. नवरात्रात दुर्गादेवी माहेरी आली आहे, अशी समजूत असते. त्यामुळे या काळात स्त्रियासुद्धा आपल्या माहेरी जातात व दुर्गादेवीचा उत्सव करतात. दहाव्या दिवशी या उत्सवाची समाप्ती होते. दुर्गादेवीची भव्य मिरवणूक काढतात. देवीची मूर्ती वाजतगाजत नेऊन तिचे समुद्रात विसर्जन करतात. असा आहे हा बंगालमधील दुर्गादेवीचा उत्सव- आपल्याकडील गणेशोत्सवासारखा.

काय शिकलात?

आज आपण बंगालमधील दुर्गापूजा माहिती, इतिहास मराठी | Durga Puja Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: