Drone Information in Marathi|ड्रोन म्हणजे काय?
मराठी ऑनलाइनच्या सर्व वाचकांचे स्वागत मित्रांनो ड्रोन कॅमेरा Drone Camera चे आकर्षण प्रत्येकालाच आहे हल्ली लग्नात फोटोग्राफी साठी वापरला जाणाऱ्या ड्रोन कॅमेरा चे सर्वात पहिलं दर्शन तुम्हा आम्हाला आमिर खानचा थ्री इडियट्स 3 idiots या चित्रपटात झालं तेव्हा प्रत्येकाच्या आकर्षणाचा विषय ठरलेला हा ड्रोन कॅमेरा Drone Camera आज-काल व्यवसायिक वापरासाठी सहजतेने वापरला जातो
ड्रोन कॅमेरा हे मानवरहित फोटोग्राफी आणि व्हिडिओ ग्राफी साठी प्रामुख्याने वापरले जाते त्याचबरोबर लष्करा द्वारे हेरगिरी साठी देखील याचा वापर बऱ्याचदा केला जातो
आपल्याला माहीत असलेले ड्रोन कॅमेरा ही रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने Remote controlled drone camera उडविले जाणारे आहेत पण काय आपल्याला माहित आहे की विना रिमोट Remoteless self driven drone camera सुद्धा ड्रोन कॅमेरा त्याचे काम उत्कृष्टरित्या पार पाडू शकतो आज-काल सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग आणि जीपीएस च्या माध्यमातून हे अगदीच शक्य आहे सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग च्या माध्यमातून ड्रोन कॅमेरा ला योग्य ठीकानाचा अचूक वेध दिला जातो तसेच दिशा कोन इत्यादींची अगदी योग्य समतोल साधत या प्रकारच्या ड्रोन कॅमेरा द्वारे टिपलेल्या फोटो व व्हिडिओना एक फोटोग्राफीचा photography उत्तम नमुना म्हणून समजलं जातो
आज-काल रोबोटिक ड्रोन कॅमेऱ्यांनी व्यवसायिक Professional Drone Camera तसेच वैयक्तिक Personal Drone Camera यांच्या निर्मिती क्षेत्रात एक नवीन उंची गाठली आहे
साधारणपणे 250 ग्रॅम पेक्षा कमी वजनी ड्रोन कॅमेरा Drone camera साठी परवानगीची आवशक्यता नसते मात्र त्यापुढील व्यवसायिक ड्रोन कॅमेरा यांना विशेष फ्लाईट ऑपरेशन प्रमाणपत्र flight operation certificateअसणे बंधनकारक असते
Contents
ड्रोन फोटोग्राफी म्हणजे काय? What is drone photography?
ड्रोन फोटोग्राफी म्हणजे दुरून चालणाऱ्या मानवरहित स्वायत्त self driven यंत्राद्वारे स्थिर फोटो किंवा व्हिडिओ बनविणे ज्याला तंत्रज्ञानाच्या भाषेत यु ए एस म्हणून ओळखले जाते
सर्वसाधारणपणे ड्रोन फोटोग्राफीमध्ये मानवी छायाचित्रकारांना शक्य नसलेल्या विविध कोनामधून व उंचीवरून फोटो व व्हिडिओ घेतले जातात
ड्रोन कॅमेराचे उपयोग Uses of drone camera
१. बर्ड आय व्हीव फोटोग्राफी Bird eye view photography
साधारणपणे एखादी गोष्ट आकाशातून कशा प्रकारे दिसेल याला बर्ड आय व्हीव असे म्हटले जाते यालाच एरियल व्हीव Airial view देखील म्हटले जाते
ड्रोन कॅमेरा च्या आगमनानंतर चित्रपटांमध्ये एरियल शॉट ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे हे एक चित्रपटांचा लोकप्रियतेची कारणच म्हणावे लागेल
ड्रोन कॅमेरा मुळे पक्षी उडणाऱ्या उंचीवरून व्हिडिओ ग्राफी करणे आता लीलया शक्य आहे लग्नसमारंभात व्यवसायिक छायाचित्रकार सर्रास या कोनातून फोटोग्राफी करताना दिसतात
२. क्रेनच्या वापराला पर्यायी वापर
मध्यंतरीच्या काळात चित्रपट दिग्दर्शकांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे क्रेनचा वापर मात्र एकाच शॉट मध्ये बऱ्याचदा क्रेनची जागा बदलावी लागे त्यामुळे वेळही खर्ची पडत असे व मानसिक त्रास देखील बराच होईल परंतु ड्रोन कॅमेराच्या आगमनानंतर या समस्येला रामबाण उपाय मिळाला आहे
एका सरळ रेषेत शॉट घेणे, गिरकी घेणे, विशिष्ट लयीमध्ये उंची कमी-जास्त करणे हे ड्रोन कॅमेरा साठी डाव्या हाताचा खेळ आहे
ड्रोनच्या वापरानंतर बरेच चित्रपट दिग्दर्शक क्रेनच्या वापराला नाकारून ड्रोन कॅमेरा वापराला अधिक प्राधान्य देत आहेत
३.फ्लाय थ्रू शॉट Fly through Shot
फ्लाय थ्रू शॉट हे व्हिडिओ ग्राफी क्षेत्रातल्या मैलाचा दगड मानावा लागेल या प्रकारात खिडकी किंवा तत्सम जागेवरून घरातील चित्रीकरण सुरू केलं जातं त्यानंतर ड्रोन कॅमेरा जसजसा मागे जाईल त्याप्रमाणे संपूर्ण घर व परिसर स्क्रीन मध्ये येतो व एक वेगळाच प्रभाव तयार होतो
ड्रोन कॅमेरा उत्पादक Drone camera Manufacturers
1. MGM Industries & co.
2.Firstsing co Ltd.
3. Guoan toys industrial co. Ltd.
4. J. Y. Enterprises Ltd.
5. Leconcepts holdings co. Ltd.
6. Mountainking International Trading Co. Ltd.
7. Creative double star (HK) co. Ltd.
ड्रोन कॅमेरा किंमत price of drone camera
1. R. C. Helicopter drone with camera HD 1080p wifi FPV selfie drone professional foldable quadcopter 40 minutes battery life ky601s =₹ 3,298/_
2. Dji Tello boost combo camera drone 5mp with 3 batteries charging hub DJI authentic combo =₹ 17,090/-
3. Professional GPS follow me remote control RC drone X25GWF 720p Adjustable HD camera =₹ 1,11,675/-
आशा करतो की आपणा सर्वांनाच हा लेख आवडला असेल आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील हा लेख वाचण्यासाठी शेअर करा