दत्तजयंती माहिती, इतिहास मराठी । Datta Jayanti Information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला दत्तजयंती माहिती, इतिहास मराठी । Datta Jayanti Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

आणखी वाचा – दिवाळी

Contents

दत्तजयंती मराठी । Datta Jayanti Information in Marathi

मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला बुधवारी मृग नक्षत्र असताना संध्याकाळी श्री दत्तात्रेयांचा अवतार झाला. म्हणून या दिवशी दत्तजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी श्री दत्ताचे उपासक उपवास करतात. श्री गुरुचरित्राचे पारायण करतात. संध्याकाळी श्री दत्तात्रेयाची षोडशोपचारे पूजा, आरती, स्तोत्रपाठ इत्यादी कार्यक्रम केले जातात. गावातील श्री दत्तमंदिरात हा दत्तजयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. त्या वेळी दत्तजन्माचे कीर्तन, भजन, पूजन, पालखी सोहळा इत्यादी कार्यक्रम केले जातात.

गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर, माहूर या दत्तक्षेत्री फार मोठी यात्रा भरते. श्री गुरुदेव दत्त या नामघोषाने सगळे वातावरण भरून गेलेले असते. यावेळचा पालखी सोहळा पाहण्यासारखा असतो. श्री दत्तात्रेयांचा अवतार का झाला, कसा झाला, याची कथा ऐकण्यासारखी आहे. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्री एक थोर ऋषी होते. त्यांच्या पत्नीचे नाव अनसूया. अत्री ज्ञानी होते. त्यांचा सगळा वेळ ईश्वराच्या चिंतनात जात असे. एकदा राहूने सूर्याला ग्रासले तेव्हा अत्री ऋषींनी आपल्या तपःसामर्थ्याने सूर्याला राहूपासून सोडविले होते. त्यामुळे सगळे देव अत्रींवर प्रसन्न झाले. त्यांची पत्नी अनसूया आपल्या नावासारखीच कुणाचाही मत्सर न करणारी, महापतिव्रता होती. ती आपल्या पतीची अगदी मनोभावे सेवा करीत असे.

आपल्याला अगदी देवतुल्य पुत्र व्हावा असे त्या दोघांना वाटत होते. अत्री ऋषी पुत्रप्राप्तीसाठी त्र्यक्ष पर्वतावर गेले. तेथे अत्री आणि अनसूया यांनी भगवान विष्णूची आराधना सुरू केली. भगवान विष्णूच आपला पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती. अनसूयेची तपश्चर्या, तिचे पातिव्रत्य पाहून घाबरलेल्या सूर्याने आपले प्रखर तेज सौम्य केले. मांडव्य ऋषीच्या शापाने मरण पावलेल्या कौशिक ब्राह्मणाला तिने जिवंत केले होते. अशा ती श्रेष्ठ पतिव्रता पुत्रप्राप्तीसाठी आपल्या पतीसह ईश्वराची आराधना करीत होती. एकदा काय झाले, अत्री स्नानसंध्या, अनुष्ठान करण्यासाठी नदीवर गेले होते.

आश्रमात ॐ सूया एकटीच होती. ती आपल्या पतीची वाट पाहत होती. याच वेळी तीन गोसावी मन्त्रीच्या आश्रमात आले व ‘ॐ भवति भिक्षां देहि – माई, आम्हाला भिक्षा वाढ’ असे ते अनसूयेला म्हणाले. दारात भिक्षेकरी आलेले पाहून अनसूयेला आनंद झाला. तिने त्यांचे पाय धुतले, बसायला आसने दिली. ती हात जोडून त्यांना म्हणाली – माझे पतिदेव अनुष्ठानासाठी गेले आहेत. आत्ता येतीलच इतक्यात.

आपण थोडावेळ थांबा. ते गोसावी म्हणाले – आम्हाला खूप भूक लागली आहे. तुमची कीर्ती ऐकून आम्ही येथे आलो आहोत. मग अनसूयेने मनात पतीचे स्मरण केले व पाने वाढली. तेव्हा ते गोसावी म्हणाले – माई, आम्हाला असे भोजन नको. इच्छाभोजन हवे. अंगावर वस्त्र न घालता आम्हाला भोजन वाढ. गोसाव्यांचे हे शब्द ऐकताच अनसूयेने ओळखले. हे कोणी साधे गोसावी, भिक्षेकरी नाहीत. प्रत्यक्ष त्रैमूर्तीच आपली परीक्षा पाहण्यासाठी आले आहेत. तथास्तु, असे म्हणून अनसूया आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण करून मनात पूजा केली. हातात तीर्थाचे भांडे घेऊन ती बाहेर आली. तिने ते तीर्थ त्या गोसाव्यांच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य! त्याच क्षणी त्या तीन गोसाव्यांची तीन सुंदर तेजस्वी बाळे बनली. ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली.

अंगाई गीते गाऊ लागली. दुपारनंतर अत्री परत आले. अनसूयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही तीन बाळे म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू व महेश हे त्रिमूर्ती आहेत हे ज्ञानी अत्रींनी ओळखले. अत्रींनी त्या बाळांना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा ब्रह्मा, विष्णू व महेश अत्रींपुढे प्रकट झाले. ‘वर माग,’ असे ते म्हणाले असता अत्री अनसूयेला म्हणाले, “त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे.” अनसूया हात जोडून म्हणाली, “ही तिन्ही बाळे आपल्या आश्रमात पुत्ररूपाने राहावीत.” त्रिमूर्तीनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला व ते तिघे निघून गेले.

मग ब्रह्मदेव चंद्र झाला. श्रीविष्णू दत्त झाला व महेश दुर्वास झाला. मग चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा हा दत्त येथेच राहील. तोच त्रिमूर्ती आहे असे समज. चंद्र व दुर्वास तप करण्यास निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आईवडिलांची सेवा करीत तेथेच राहिले. अशाप्रकारे त्रिमूर्ती दत्तांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला. अत्री म्हणून अत्रेय व अत्रीऋषींना तो देवांनी दिला म्हणून दत्त यावरून दत्तात्रेय असे नाव मिळाले, दत्ताच्या ठिकाणी बह्मा, विष्णू, महेश यांचे स्वरूप आहे. म्हणून दत्त तीन शिरे, सहा हात असलेला असा आहे.

काय शिकलात?

आज आपण दत्तजयंती माहिती, इतिहास मराठी । Datta Jayanti Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: