रोहिडखोऱ्याच्या शेजारी पुण्याच्या पश्चिमेला बारा मावळं होती. मावळचे हिवासी ते मावळे, त्यांच्यावर सत्ता चालविणारी प्राचीन देशमुख घराणी होती. जेधे, बांदल, शिळमकर, खोपडे ही त्यांपैकी काही घराणी. रोहिडखोऱ्याचे देशमुख कान्होजी जेधे हे भोरजवळ ‘कारी’ या गावी राहत होते. हे कान्होजी जेधे शिवाजी महाराजांपेक्षा वयाने बरेच मोठे होते. त्यांनी शहाजीराजांबरोबर विजापूरबंगलूर पर्यंतचा मुलूख पाहिला होता.
शिपाईगिरी इतकेच त्यांचे इमान मोठे होते; म्हणूनच शहाजीराजांनी त्यांच्याकडे शिवबाच्या पाठराखणीचे काम सोपविले होते. कान्होजींनी बेलभंडार उचलून ही जबाबदारी स्वीकारली. मावळातील सर्व देशमुख स्वत:ला बादशाही चाकर समजत; परंतु कान्होजींनी या रुढ कल्पनेला धक्का दिला. ते म्हणाले, “आपण बादशहाची सेवा का म्हणून करायची? तो काय देतो आपल्याला? आता सेवा, करायची ती शिवाजीची व देवधर्माची.” कान्होजीचे हे विचार इतर देशमुखांना पटले व ते शिवबाच्या पाठीशी उभे राहिले.
१६५९ मध्ये शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजलखान विजापुरातून पैजेचा विडा उचलून निघाला. तो निघण्यापूर्वीच विजापूरची बादशाही फर्माने मावळातील तमाम देशमुखांना आली. फर्मान असे – ‘शिवाजीने अविचाराने निजामशाही कोकणातील मुसलमानांचा म उच्छेद व लूट करून किल्ले हस्तगत केले. त्याचे पारिपत्य करण्यासाठी अफजलखान निघाला आहे, तरी तुम्ही त्याला सामील होऊन शिवाजीचा पराभव करून त्याचा निकाल लावावा. त्याच्या लोकांना आश्रय न देता त्याला ठार मारून दौलतीचे कल्याण करावे. तुम्ही हुकमाप्रमाणे न वागल्यास परिणाम चांगला होणार नाही.’
फर्मान हाती पडताच देशमुख गडबडून गेले. भोर जवळील अबाड्याचे देशमुख केदारजी खोपडे आणि खंडोजी खोपोमांच्यात बंदकीचे भांडण होते, त्यात खंडोजीचा पक्ष उणा असतानाही शहाजीराजे आणि शिवाजीराज्यांच्या आश्रयाने तो केदारजी खोपडेशी भांडत होता. हा उपकाराची जाणीव ठवून अशा आणीबाणीच्या प्रसंगी खंडोजीने शिवरायांना सोडन अफजलखानाकडे जायला नको होते, पण तो उपकार विसरला. हा संधिसाधू आणि स्वार्थी माणस फर्मान येताच अफजलखानाकडे गेला. केदारजी खोपडे यानेही तोच मार्ग स्वीकारला. अफजलखानाने खंडोजीला आपल्या बिनीवर नेमले.
अफजलखान आणि शिवाजीराजे यांची प्रतापगडावर भेट ठरली. खानाशी भेट म्हणजे साक्षात मृत्यूशीच भेट! प्रत्यक्ष भेटीत शिवरायांनी कपटी अफजलखानाला ठार मारले. शिवरायांचे सैन्य अफजलखानाच्या सैन्यावर सिंहाप्रमाणे तुटून पडले. ऊस तोडणी व्हावी त्या प्रमाणे शत्रच्या सैनिकांच्या मुंडक्याची तोड झाली. मराठ्यांना खूप मोठी लूट मिळाली. अफजलखानाच्या सैन्यातील खराटे, पांढरे, सिद्दी हिलाल, यादव इत्यादी सरदार शिवाजी महाराजांना शरण गेले. त्यांनी महाराजांच्या पदरी चाकरी करण्याचे ठरविले. ते मराठी फौजेत सामील झाले.
खानाकडची शूर माणसेही स्वराज्यात दाखल झाली, पण एक गोष्ट वाईट झाली. खंडोजी खोपडे द्रव्याच्या लालचीने जावळीच्या जंगलातून सफाईने पसार झाला. त्याने खानाचा मुलगा फाजलखान व खानाची बायकामाणसे यांना आडवाटेने लपत छपत पळवून नेले व क-हाड येथे सुरक्षितपणे पोहोचविले. खंड्या कुठेतरी लपून बसला होता. हाती लागला असता, तर त्या दगलबाजाचे मुंडकेच उडाले असते आणि स्वराज्यातली ही कीड नाहीशी झाली असती, पण तो पळाला. फत पळून पळून जातो कुठे? एक ना एक दिवस सापडेलच. त्या स्वार्थी, दगलबाज, भेकड, फितूर खंड्याला महाराजांच्या प्राणांची, देवधर्माची, स्वातंत्र्याचीही पर्वा वाटली नाही.
अफजलखानाला सामील झाला. खान मेला आणि हा हरामखोर लपत छपत जगण्याची इच्छा करत होता. एक ना एक दिवस आपण सापडणार आणि महाराज आपल्याला ठार मारणार या भीतीने खंडोजी खोपडा जावळीच्या जाळीतून पळाला आणि जंगलात लपून बसला. आता जगायचे कसे याचा तो विचार करीत होता. काही दिवसांनी प्रतापगडचा वणवा शमला. शिवाजी महाराज विशाळगडावरून राजगडावर आले. मावळात नवचैतन्य खेळू लागले. एक दिवस खंडोजी खोपड्याने आपल्या एका नोकराला हैबतराव शिळमकराकडे पाठविले.
हे हैबतराव महाराजांचे सरदार होते. ते महाराजांशी एकनिष्ठ होते. महाराजांच्या संगतीत त्यांनी मोठी समशेर गाजविली होती. हे हैबतराव खंडोजी खोपड्याचे जावई होते. जावई इमानाला जागून महाराजांची पाठराखण करीत होते आणि सासरे लाज सोडून शत्रूच्या उष्ट्या पत्रावळी चाटत होते. खाजा खोपड्याला धीर निघेना. तो नोकराच्या मागोमाग हैबतराव शिळमकराकडे गेला आणि म्हणाला, याताल माग ज झाले त्याचा मला पश्चाताप होतो आहे. आता स्वराज्यासाठीच खपायचे मनात , -हणून तुम्ही महाराजांकडे माझी रदबदली करा. मला महाराजांकडून अभय मिळवून द्या.”
हैबतरावांच्या डोळ्यांपुढे काजवे चमकले. त्यांना महाराजांचा स्वभाव माहीत होता. महाराजांच्या पुढे हा विषय काढायचा तरी कसा? महाराज संतापतीलच. फितुरीला महाराजाकड क्षमा माहाच ह हबतरावाना चांगले माहीत होते. ते काहीच बोलले नाहीत. त्यांना आठवण झाली कान्होजी जय याची. कान्होजी जेधे हे वयाने, मानाने, पराक्रमाने सर्वच बाबतीत वडील होते. महाराजांना ते वडिलांसारखे. कदाचित महाराज त्यांचे ऐकतील.ला हैबतराव काही एक न बोलता उठले व प्रतापगडाखाली जावळीत कान्होजी जेध्यांकडे आले. हैबतराव अचानक आले त्या अर्थी त्यांच्या मनात काहीतरी आहे हे कान्होजींनी ओळखले.
विषय कसा काढावा हे हैबतरावांना समजेना. शेवटी हिंमत धरून ते कान्होजींना म्हणाले, “कान्होजी बाबा, आमच्या सासऱ्यांचे अवतार कार्य आपल्याला माहीतच आहे. खोपडे लढाईतून जिवंत सुटले, पण आता ते जगायचं बघतात, पण ते कठीण दिसते. तुमची भीड महाराजांपाशी आहे. आता तुम्हीच खंडोर्जीचा जीव, वतन वाचवू शकता; नाहीतर त्यांचा शेवट अटळ आहे.’ कान्होजी मोठ्या पेचात पडले. हा गळून पडलेला रोगट आंबा पुन्हा झाडाला कसा चिकटवायचा? कान्होजींना हे मोठे जड वाटत होते.
शत्रूला फितूर व्हायचं आणि शत्रूचा पराभव झाला की, पुन्हा परत येऊन जीव व इमान वाचवायचं! हे कसं जमणार? शिवाजी महाराजाच्या राज्यात तर अशक्यच! साफ नाही म्हणावे, तर तसे म्हणवेना: कारण खोपडे पडला हैबतरावाचा सासरा. शिवाय रोहिडखोऱ्यांतला शेजारी. कान्होजींना हैबतरावासारख्या वीराची भीड पडली. ते उठले आणि गडावर महाराजांना भेटावयास गेले. महाराज एकटेच आहेत असे पाहून कान्होजींनी शब्द टाकण्याचे मनात आणले. पण तोडातून शब्द फुटेना. छाती धडधडू लागली. शेवटी धाडस करून म्हणाले “महाराज, मागे अफजलखान प्रसगात खडोजी खोपडे खानाकडे गेले. तो प्रसंग संपला आता त्यांना पश्चाताप झाला आहे.
आपण त्यांना अभय द्यावे व स्वराज पाला आहे. आपण त्यांना अभय द्यावे व स्वराज्याची काही कामगिरी सांगावी. कान्होजी एवढे म्हणायचा अवकाश… महाराज एकदम भडकले. वीजच कडकडा “कोण? तो हरामखोर खंडोजी खोपडे? फितूर? त्याची वतनदारीवर स्थापना कला, वतन, सिक्का आम्हा दिला. असे असताना बेइमान होऊन तो अफजलखानाकडे गेला. आमच्या विरुद्ध हत्यार धरले. तो हरामखोर! आणि त्याच्यासाठी तुम्ही शब्द टाकता? खरे तर तो दिसताच त्याचे चार तुकडे करून चारी दिशांना फेकून द्यावे, म्हणजे इतरांना धडा मिळल.
विश्वासघातकी स्वराज्यद्रोह्याबद्दल महाराजांना काय वाटते ते स्वच्छ कळून चुकल. कान्होजाचा अदाज बरोबर ठरला, पण पुन्हा एकदा प्रयत्न करावा म्हणून कान्होजी म्हणाल, “पण महाराज, तो आपल्या हैबतराव शिळमकरांचा सासरा……” “फितुरांना नाती नसतात. ती आपण कधीच तोडून टाकायची असतात.” पण महाराज, खंडोजीची शिक्षा आम्हाला द्या आणि त्याचा जीव वाचवा…” कान्होजीनी अशी विनंती केली असता शिवाजी महाराजांनी विचार केला. कान्होजी हे जुने जाणते एकनिष्ठ आहेत. आपणास विनंती करत आहेत. नाही म्हणावे तर ते दुखावतील. मान्य केले तर फितूर सुखावेल. काय करावे? महाराज मोठे चतुर, बुद्धिवान. ते म्हणाले, “कान्होजी बाबा, तुम्ही शब्द टाकता म्हणूनच मी त्याला जिवे मारणार नाही.”
महाराजांचे हे शब्द ऐकताच कान्होजींना आनंद झाला. खंडोजी वाचला म्हणून नव्हे; तर महाराजांनी आपला शब्द मानला म्हणून. कान्होजी उठले व गडाखाली आले. त्यांनी खंडोजीला निरोप पाठविला की, महाराजांनी तुला जीवदान दिले आहे. मुजऱ्याला जा. खंडोजीचा जीव भांड्यात पडला, तो कान्होजींना भेटला. कान्होजी त्याला घेऊन गडावर महाराजांकड़े मुजऱ्यास गेले. कान्होजींनी मुजरा घातला. खंडोजीनेही खालच्या मानेने मुजरा केला. वर मान करून महाराजांकडे बघण्याची त्याला हिंमतच झाली नाही. महाराजही काही बोलले नाहीत. आता खंडोजी दररोज गडावर मुजऱ्याला जाऊ लागला.
नाना एके दिवशी खंडोजी नेहमीप्रमाणे गडावर मुजऱ्यासाठी आला. त्याला पाहताच महाराजांचे डोळे भडकले. दबलेली आग एकदम उसळली. ते एकदम ओरडले, “पकडा या हारामखोराला! या दगलबाज हरामखोराचा उजवा हात आणि डावा पाय कलम करा! तोडा.” – गड हादरला. सैनिकांनी खंडोजीला धरले. त्याचा एक पाय आणि एक हात तोडला. खंडोजी ओरडत होता, “महाराज महाराज आपण मला क्षमा केली आहे. आपण मला जिवे मारणार नाहा अस कान्होजींना आपण वचन दिले आहे!” गडाखाली कान्होजींना ही बातमी समजली कान्होजी संतापले.
काय केले हे महाराजांनी? हातपाय तोडले? कान्होजी रागावले. ते घाईघाईने गडावर गेले. महाराजांना भेटले. त्यांना म्हणाले. “महाराज, आपण मला शब्द दिलात आणि तो बदललात? आम्ही रदबदली केली त्याची काय किंमत राहिली?” कान्होजी रागावले हे पाहन महाराज अतिशय समजुतीच्या, गोड, आर्जवी शब्दांत म्हणाले, “कान्होजी बाबा, मी शब्द बदलला नाही.
खंडोजी खोपड्याला मी जिवे मारणार नाही असे म्हटले होते. तसे मी त्याला जिवे मारले नाही, पण जो डावा पाय पुढे टाकून तो शत्रूकडे गेला, तो त्याचा डावा पाय तोडला आणि ज्या उजव्या हाताने त्याने शत्रूच्या बाजूने आमच्यावर तलवार चालविली तो त्याचा उजवा हात फक्त छाटून टाकला. फितुरीचे फळ काय मिळते हे आपल्या रयतेला कळायला हवे ना? हरामखोरी करून कोणीही सुखरूप सुटू लागला, तर लोक म्हणतील की, या राज्यात कसेही वागले तरी चालते! लोकांचा असा समज होणे योग्य नाही.” कान्होजींना महाराजांचे बोलणे पटले. त्यांनी हसून महाराजांना मुजरा करत त्यांचा निरोप घेतला