क्रिकेट बद्दल माहिती मराठीत – Cricket Information in Marathi
हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला Cricket Information in Marathi – क्रिकेट बद्दल माहिती मराठीत देणार आहे, तर चला बघुयात. आणखी वाचा – खो खो बद्दल माहिती
Contents
माहिती – Cricket Information in Marathi
अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्वांना परिचित असलेला असा खेळ म्हणजे क्रिकेट होय. या खेळाची सुरुवात सर्वांत प्रथम इंग्लंडमध्ये झाली. हा मैदानी खेळ आहे.
खेळाचे मैदान – क्रिकेट या खेळासाठी मैदान सपाट आणि साफ असावे लागते. मैदानात मध्यभागी मातीचे एक कडक पीच तयार करतात. त्यावर गवत नसते. उरलेल्या मैदानात थोडेसे गवत असले तरी चालते.
मैदानातील पीचवर दोन्ही बाजूला ३-३ स्टम्स लावतात.व त्यावर प्रत्येकी २ बेल्स ठेवतात. मैदानाच्या पीचची लांबी २२ मी. व रुंदी १० फूट असते. मैदानाला एक सीमारेषा असते. तिला बाउंड्री म्हणतात.
खेळाचे साहित्य – बॅट, चेंडू, ग्लोव्हज, पॅड, शिरस्त्राण, स्टम्प, बेल्स असे या खेळाचे साहित्य असते.
पोशाख – पॅण्ट, शर्ट, पांढरे बूट, स्वेटर, हॅण्डग्लोव्हज, शिरस्त्राण, पॅड असा क्रिकेट हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा पोशाख असतो. एका संघाचे खेळाडू एकाच विशिष्ट रंगाचा पोषाख घालतात.
खेळाडूंची संख्या – हा खेळ दोन संघांत खेळला जातो. या खेळात प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात. त्यात काही गोलंदाज, काही फलंदाज, एक कर्णधार, एक उपकर्णधार, एक विकेटकीपर असतो.
खेळाचे नियम – गोलंदाजाला ठरवून दिलेल्या रेषेवरून गोलंदाजी करावी लागते. गोलंदाजाने चेंडू बरोबर बॅटच्या रेषेतच टाकावा. दुसऱ्या दिशेने तो चेंडू गेला तर त्याला वाईड’ म्हणून घोषित करून, त्याचा एक बोनस रन फलंदाजी करणाऱ्या संघाला दिला जातो.
नो बॉल – गोलंदाजासाठी आखलेल्या रेषेच्या बाहेर पाय टाकून जर बॉल टाकला तर तो नो बॉल घोषित करून त्याचा एक रन आणि फलंदाजाच्या पायाला लागून बॉल गेला तर लेग बाय. अशा प्रकारचे रन फलंदाजाच्या व्यक्तिगत रनमध्ये जमा करत नाहीत. संघाच्या रनमध्ये ते रन जमा केले जातात.
इतर माहिती – Cricket Information in Marathi
या खेळात तीन पंच असतात. हे सामने तीन प्रकारे खेळले जातात. एक दिवसीय सामने, टेस्ट सामने व वीस-वीस षटकांचे सामने, एक दिवसांच्या सामन्यात पन्नास षटकांचाखेळ खेळला जातो.
एक दिवसीय सामन्यात प्रत्येक संघ एकदाच फलंदाजी करतो. टेस्ट सामना पाच दिवसांचा असतो. त्यात प्रत्येक संघ दोनदा फलंदाजी करतो. कधीकधी टेस्ट सामने अनिर्णित राहतात किंवा बरोबरीत राहतात.
टेस्ट सामने फक्त दिवसा खेळतात. मर्यादित षटकांचे सामने मात्र, दिवसा किंवा दिवस-रात्र असे खेळले जातात. या खेळात फलंदाज व गोलंदाजांना दुखापत होऊ नये म्हणून गरजेनुसार पोटाला कव्हर, हातात ग्लोव्हज, डोक्याला शिरस्त्राण, पायाला पॅड वापरतात.
या खेळात पांढरा व तांबडा असे दोन रंगांचे चेंडू असतात. या खेळात नाणेफेक केल्यानंतर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचा पूर्ण अधिकार असतो. या खेळात तीन पंच असतात, मैदानात दोन तर तिसरा पंच समालोचनाच्या ठिकाणी बसतो.
खेळात पंचाचा कोणताही निर्णय मग तो चुकीचा असला तरीही अंतिम निर्णय मानला जातो. कोणत्याही खेळाडूच्या गैरशिस्त, नियमबाह्य वर्तणुकीबद्दल त्याला दंडात्मक शासन केले जाते. चौकार, षटकार, एक रन, दुहेरी असे धावांचे प्रकार असतात. नो बॉल, वाईड बॉल, डेड बॉल असे चेंडू फेकण्याचे प्रकार असतात.
कॅच, स्टंप आऊट, क्लिन बोल्ड, एल. बी. डब्ल्यू व धावबाद/रनआऊट असे फलंदाज बाद होण्याचे प्रकार आहेत. या खेळामध्ये चहापान, विश्रांतीसाठी आणि जेवणासाठी वेळ देतात.
दोन्ही संघांतील ज्या संघाच्या धावा जास्त होतील तो संघ विजयी म्हणून घोषित करतात. संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला सामन्याचा मानकरी’ म्हणून किताब दिला जातो. अशा प्रकारे क्रिकेट हा खेळ खेळला जातो.
Indian Cricket Player Information in Marathi
सचिन तेंडुलकर – जन्म २४ एप्रिल १९७३. हा भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा माजी कर्णधार होता. सचिन तेंडुलकर बद्दल चे तथ्य खालील प्रमाणे.
- १९व्या वर्षी सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण भारतीय झाला.
- सचिनची पहिली कार मारुती – ८०० होती.
- सचिन तेंडुलकरला सेन्ट आणि घड्याळाचे संच करायला खूप आवडते.
- त्याचा आवडता स्नॅक वडा-पाओ आहे.
- सचिनची पहिली जाहिरात हि हेल्थ ड्रिंक बूस्ट होती.
महेंद्र सिंग धोनी – जन्म ७ जुलै १९८१. भारतीय राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणारा माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. महेंद्र सिंग धोनी बद्दल चे तथ्य खालील प्रमाणे.
- धोनीकडे यामाहा आरडी ३५०, हार्ले डेव्हिडसन फॅटबॉय, डुकाटी १०९८, कावासाकी निन्जा एच २ आणि सुपर एक्सक्लुझिव्ह कॉन्फेडरेट हिलकॅट एक्स १३२ अशा बाइक आहेत. दक्षिण पूर्व आशियामध्ये या बाईकचा मालक एकमेव भारतीय कर्णधार आहे.
- धोनीसाठी प्रसिद्ध असलेला ‘हेलिकॉप्टर शॉट’ त्याला त्याचा मित्र संतोष लाल यांनी रांची येथे टेनिस-बॉल स्पर्धेदरम्यान शिकवला होता.
- २००७ वर्ल्ड टी -२०, २०११ वर्ल्ड कप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी या तीनही आयसीसी ट्रॉफीमध्ये विश्वचषकात धोनी एकमेव कर्णधार आहे.
- धोनीला सामन्यात सर्वोत्कृष्ट आणि वेगवान स्टम्पिंग्ज म्हणून ओळखले जाते.
- सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कर्णधार विक्रमही धोनीच्या नावावर आहे.
विराट कोहली – यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ मध्ये झाला. विराट कोहली हा एक क्रिकेटर आणि भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार सुद्धा आहे. विराट कोहली बद्दलचे काही मजेशीर तथ्य खालीलप्रमाणे.
- विराट कोहली १०,००० वनडे धावांचा टप्पा गाठणारा आतापर्यंतचा वेगवान फलंदाज आहे.
- आयपीएलमधील विराट हा एकमेव खेळाडू आहे ज्याचा कधीही लिलाव होऊ शकला नाही.
- विराट कोहलीने ऑस्ट्रोलीय विरुद्ध ५२ चेंडूत सर्वात जास्त ODI शतक ठोकले होते.
- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका येथे कसोटी जिंकणारा विराट कोहली हा एकमेव आशियाई कर्णधार आहे.
- द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत विराट कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने ५०० हुन अधिक धाव केल्या.
रोहित शर्मा – यांचा जन्म ३० एप्रिल १९८७ मध्ये झाला हे एक भारतीय क्रिकेटर आहे. रोहित शर्मा बद्दल चे तथ्य खालील प्रमाणे.
- रोहित शर्माला इंग्रजी, हिंदी, मराठी आणि तेलगू या चार भाषा चांगल्या बोलता येतात. त्यांचे मातृत्व विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश आहे.
- रोहित शर्माने ऑफ स्पिनर म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.
- वीरेंद्र सेहवाग हे रोहित शर्मा आयडॉल आहेत.
- रोहित शर्मा मँचेस्टर युनायटेडचा उत्कट चाहता आहे.
- रोहित खूप गरीब कुटुंबातला आहे. त्याचे वडील ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करत होते आणि आई गृहिणी होती.
काय शिकलात?
आज आपण Cricket Information in Marathi – क्रिकेट बद्दल माहिती मराठीत पहिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.