covid yodha nibandh in marathi – मित्रांनो आज आपण “कोविड योद्धा मराठी निबंध” पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.
Contents
Covid Yodha Nibandh in Marathi
कोरोना विषाणू विरोधात अनेक कोविड योद्धे लढत आहेत. प्रत्येकालाच स्वतःची व कुटुंबाची काळजी सुद्धा काळजी वाटत आहे. परंतु त्यातही आरोग्य सेवा, पोलिस विभाग, मनपा विभाग, ग्रामपंचायत विभाग व काही कर्मचारी. हे सर्व आपले कोरोना योद्धे निस्वार्थपणे लढा देत आहेत. या योद्ध्यांची काळजी घेणारे योद्धेही पडद्या मागून सेवा देत आहेत.
संपूर्ण जगामध्ये कोव्हिड-19 शी लढत असताना सर्व आरोग्य सेवकांना योद्धा म्हणून गौरवलं जातंय. त्यांचं कामहि तस आहेच मोठं. जागतिक साथीचा रोग (कोविड 19) कोरोना विषाणूने संपूर्ण जग व्यापून टाकले आहे. जगभरात, या विषाणूची लागण झालेल्या लोकांनी आपला जीव गमावला आहे.
त्यांची संख्या वेगाने वाढत आहे. लॉकडाऊन दरम्यान भारतासह अनेक देशांतील लोक घरी सुरक्षित आहेत. त्याच वेळी, कोरोनामधील फ्रंट लाइन कोविड योद्धा रोज आपल्या तळहातावर जीव ठेवून या विषाणू विरूद्ध लढत आहेत. काहींनी कर्तव्य बजावून या युद्धात आपले प्राण अर्पण केले आहेत. वाचा – अशाच एका कोरोना योद्ध्यांची कहाणी.
कोविड योद्धा मराठी निबंध
अकोल्यातील जुने शहरातील किरणा व्यावसायिक डिम्पल कव्हळे यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागले. कोरोना महामारी मध्ये जुने शहरातील शिवनगर येथील डिम्पल कव्हळे (आर. के. टेलर) नावाने ओळखले जातात. हे कोरोनाशी लढा देणाऱ्या योद्ध्यांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देत आहेत. त्यांचे एक छोटेसे घरगुती किराणा दुकान आहे.
त्यावरच त्याच्या परिवाराचा संपूर्ण उदर निर्वाह चालतो. ते दुकानाचे काम सांभाळून सध्या कोरोना योद्ध्यांच्या सेवेत गुंतले आहेत. शिवनकलेचे कौशल्य असल्यामुळे त्यांनी व त्यांच्या संपूर्ण परिवाराने तोंडाला लावण्याचे विविध प्रकारचे कापडी मास्क तयार करण्यास सुरुवात केली.
आतापर्यंत त्यांनी जवळपास दोन हजार माक्स तयार केले आहेत. ते अगदी मोफत वाटली. त्यांनी डॉक्टर, पोलिस कर्मचारी, सफाई कामगार, वयोवृद्धांना हा मास्कचे वाटप केले. जुने शहरात जो मागेल त्याला त्यांनी अगदी मोफत मास्क उपलब्ध करून दिले आहे. कोरोना या जागतिक महामारी मध्ये माझा व माझ्या परिवाराचा थोडासा का होईना खारीचा वाटा म्हणून हा अल्पसा प्रयत्न करीत असल्याचे डिम्पल कव्हळे यांनी सांगितले. “covid yodha nibandh in marathi”
Covid Yodha Nibandh
कुणाला मास्क पाहिजे असल्यास त्यांनी शिवनगर, समाज मंदिर जवळ, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवानही कव्हळे यांनी केले आहे. अश्या या कोविड योद्ध्याला माझे प्रणाम खरच जर प्रत्येक वैक्तीने काही न काही खारी चा वाट उचलून आपल्या जगाला यातून मुक्त करा व गरिबांना मदत करा.
तर मित्रांना “covid yodha nibandh in marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “कोविड योद्धा मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
COVID-19 चे अधिकृत नाव कोणी जारी केले?
11 फेब्रुवारी 2020 रोजी WHO द्वारे COVID-19 आणि SARS-CoV-2 ही अधिकृत नावे जारी करण्यात आली.
COVID-19 चे भारतात कोणत्या लशी उपलब्ध आहेत?
कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक, कोव्होव्हॅक्स