खेळाचे मैदानी खेळ आणि बैठे खेळ असे प्रकार आहेत. त्यांपैकी बुद्धिबळ हा बैठा खेळ प्रकार आहे. या खेळामुळे आपल्या बुद्धीला व मनाला चालना मिळते. आपली विचारशक्ती वाढते.
खेळाची जागा – बुद्धिबळ या खेळासाठी जागा शक्यतो बंदिस्त असावी.
खेळाचे साहित्य – बुद्धिबळाचा पट आणि सोंगट्या.
पोशाख – या खेळासाठी विशिष्ट असा पोशाख ठरलेला नाही.
खेळाडूंची संख्या – या खेळासाठी किमान २ खेळाडू आवश्यक असतात. सांघिक खेळ असेल तर खेळाडूंची संख्या जास्त असूशकते.
वेळ – या खेळासाठी वेळेचे विशिष्ट बंधन नाही.
इतर माहिती – या खेळामधील पांढऱ्या रंगाच्या सोंगट्या वापरणारा खेळाडू प्रथम चाल खेळतो. ज्या खेळाडूची चाल तीन वेळा चुकेल, तो खेळाडू बाद ठरतो.
बुद्धिबळाच्या पटावर चौरसाकृती ६४ घरे असतात. पांढऱ्या सोंगट्यांची संख्या १६ आणि काळ्या सोंगट्यांची संख्या १६ असते. एकूण ३२ सोंगट्या असतात.
यामध्ये उंट, हत्ती, घोडा, राजा, वजीर, प्यादे, इत्यादींचा समावेश असतो. उंटाची चाल तिरपी असते. हत्ती आडवा किंवा उभा चालतो. राजा एक घर चालतो, वजीर मात्र आडवा, उभा किंवा तिरपा चालतो, प्यादे एक घर चालते परंतु ते मारताना तिरपे चालते.
बुद्धिबळ हा जुना खेळ असून, त्याची सुरुवात भारतात झाली आहे असे मानतात. सध्या हा खेळ रशियाचा राष्ट्रीय खेळ’ आहे.
या खेळातील राजाला King, वजिराला Queen, उंटाला Bishop, घोड्याला Knight, प्याद्याला Pawn, हत्तीला Rook म्हणतात. भारतातील विश्वनाथ आनंद हा जागतिक कीर्तीचा बुद्धिबळपटू आहे. बुद्धिबळ या खेळाचा समावेश जगातील नामांकित खेळांमध्ये होतो.
Chess Players in India – भारतीय बुद्धिबळ खेळाडू
- विश्वनाथन आनंद
- कोनेरू हुम्पय
- अभिजित गुप्ता
- पेंटला हरिकृष्ण
- बसकण अधिबं
काय शिकलात?
आज आपण Chess Information in Marathi – बुद्धिबळ बद्दल माहिती मराठीत पहिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.