Sir Chandrashekhar Venkatraman Information in Marathi – सर चंद्रशेखर वेंकटरमण बद्दल माहिती मराठीत

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Sir Chandrashekhar Venkatraman Information in Marathi – सर चंद्रशेखर वेंकटरमण बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – जगदीशचंद्र बोस

माहिती – Sir Chandrashekhar Venkatraman Information in Marathi

चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्म ७ नोव्हेंबर, १८८८ रोजी तमीळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण विशाखापट्टणम येथे झाले. त्यांचे वडील गणित व भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते.

त्यामुळे त्यांच्या घरी शैक्षणिक वातावरण होते. प्रेसिडेन्सी कॉलेज चेन्नई येथून त्यांनी १९०४ मध्ये पदवी संपादन केली. भौतिकशास्त्रात त्यांना प्रथम क्रमांक व सुवर्णपदक मिळाले.

१९०७ मध्ये त्यांनी अतिशय उच्च श्रेणीत दुहेरी पदवी मिळवली. कोलकाता येथील इंडियन फायनान्स डिपार्टमेंट येथे त्यांनी नोकरी पत्करली.

१९१७ मध्ये त्यांनी या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोलकाता येथे ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले. त्याच वेळी त्यांनी आपल्या संशोधन कार्यालाही सुरुवात केली.

प्रकाशाच्या विकिरणाशी संबंधित असलेले त्यांचे संशोधन रमण इफेक्ट’ म्हणून जगप्रसिद्ध झाले. जेव्हा प्रकाशाचे एखाद्या अणू किंवा रेणूमुळे विकिरण होते,

तेव्हा विकिरण पावलेल्या बऱ्याचशा प्रकाशकणांची (फोटॉन)ऊर्जा व वारंवारता ही आपाती प्रकाशकणांच्या ऊर्जेइतकी व वारंवारतेइतकीच असते.

परंतु काही फारच थोड्या प्रकाशकणांची ऊर्जा आणि वारंवारता ही आपाती कणांच्या ऊर्जेहून व वारंवारतेहून कमी असते, हे त्यांनी दाखवून दिले. या संशोधनाबद्दल आपल्याला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळणार याची त्यांना खात्री होती.

परंतु १९२८ व १९२९ मध्ये त्यांना या पारितोषिकाने हुलकावणी दिली.१९३० मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. श्री चंद्रशेखर रमण हे नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिलेच भारतीय व आशियाई शास्त्रज्ञ होते.

त्यांनी पुढे संगीतातील वाद्यांवर संशोधन केले. तबला, मृदंग, यांसारख्या वाद्यांमधील स्वरसंगीताचा शोध सर्वप्रथम त्यांनी लावला. याव्यतिरिक्त स्फटिकांचे गुणधर्म, हिऱ्याची रचना, त्याचे गुणधर्म व मानवी दृष्टी यांसारख्या अनेक विषयांवरही त्यांनी संशोधन केले.

१९३४ मध्ये चंद्रशेखर रमण बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक झाले. तरीही त्यांनी प्राध्यापकाचा व्यवसाय सोडला नाही. त्यानंतर त्यांनी क्ष-किरणांचे गुणधर्म व श्राव्यातील ध्वनितरंग यांच्यावर संशोधन केले.

नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त रॉयल सोसायटीचे सदस्यत्व, ‘सर’ हा किताब, भारताचा सर्वोच्च किताब ‘भारतरत्न’ इत्यादी अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले.

२१ नोव्हेंबर, १९७० रोजी या महान संशोधकाचे निधन झाले. त्यांनी लावलेल्या रमण इफेक्ट या शोधामुळे २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळला जातो.

काय शिकलात?

आज आपण Sir Chandrashekhar Venkatraman Information in Marathi – सर चंद्रशेखर वेंकटरमण बद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: