कॅरम बद्दल माहिती मराठीत – Carrom Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला Carrom Information in Marathi – कॅरम बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात.

माहिती – Carrom Information in Marathi

कॅरम हा खेळ सर्वजण अगदी आवडीने खेळतात. हा खेळ घरात किंवा कोणत्याही ठिकाणी खेळला जातो. हा खेळ खेळताना ताकदीची गरज नसते; परंतु थोडासा सराव व बुद्धीची गरज असते.

खेळाचे मैदान – हा खेळ खेळताना मैदानाची आवश्यकता नसते. कॅरमच्या स्पर्धा खेळण्यासाठी एक खोली असते. हा एक बैठा खेळ प्रकार आहे.

पोशाख – कॅरम खेळण्यासाठी खास असा पोशाख नसतो.

खेळाडूंची संख्या – या खेळात चार खेळाडू असतात. दोन-दोन खेळाडूंचे संघ असतात.

खेळाचे नियम – हा खेळ २९ गुणांचा असतो. २९ गुणांचे तीन डाव खेळले जातात. त्यांपैकी दोन डावांत ज्याला जास्त गुण तो खेळाडूंचा संघ जिंकतो.

स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी कॅरम बोर्डाच्या पृष्ठभागावर पावडर टाकून तो गुळगुळीत करून घेतात. त्यामुळे सोंगट्या भरभर पुढे सरकतात.

इतर माहिती – कॅरम खेळण्यासाठी प्लायवुडपासून बनविलेला बोर्ड वापरतात. हा बोर्ड चौकोनी आकाराचा असतो. याचा पृष्ठभाग सपाट व गुळगुळीत असतो.

या बोर्डाच्या चार कोपऱ्यात गोल छिद्रे असतात. कॅरम बोर्डच्या चारी बाजूंना अर्धा इंच उंचीची लाकडी बॉर्डर असते. त्यामुळे त्यातील स्ट्रायकर व सोंगट्या बोर्डाच्या बाहेर जात नाहीत.

या बोर्डावर मध्यभागी एक वर्तुळ असते. त्यावर सोंगट्या मांडतात. यात दोन रंगांच्या सोंगट्या वापरतात. पिवळ्या व काळ्या रंगाच्या सोंगट्या असतात. त्यांचा आकार गोल व चपटा असतो.

कॅरमच्या खेळात एकूण १९ सोंगट्या असतात. ९ सोंगट्या काळ्या रंगाच्या व ९ सोंगट्या पिवळ्या रंगाच्या असतात. त्यात एक सोंगटी लाल रंगाची असते.

तिला ‘राणी’ म्हणतात. एक सोंगटी मिळाल्यावर एक गुण मिळतो व राणी सोंगटीला पाच गुण असतात. या खेळात सोंगट्यांना मारण्यासाठी स्ट्रायकरचा उपयोग करतात.

हा स्ट्रायकर रबिनाइट किंवा प्लॅस्टिकचा बनविलेला असतो. हा इतर सोंगट्यांपेक्षा वजनदार असतो. कॅरम या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा असतात. अशा प्रकारे कॅरम हा खेळ खेळला जातो.

काय शिकलात?

आज आपण Carrom Information in Marathi – कॅरम बद्दल माहिती मराठीत पहिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: