Top 10 business ideas in marathi
Top 10 business ideas in marathi – नौकरी तर सर्वच लोक करतात. पण काही असे लोक असतात ज्यांना की दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणे आवडत नाही , दुसऱ्याच्या मर्जीने काम करणे मुळीच पसंद नसते. अशा लोकांना नेहमीच एक स्वतंत्र जीवन जगणे आणि स्वतःचा मर्जीने काम करणे आवडते.
मग अशा वेळेस हे लोक नेहमीच एक स्वतःचा व्यवसाय (buisness) सुरू करायचा विचार करतात. कारण तिथे त्यांना कुणाच्या हाताखाली काम करण्याची आवश्यकता पण पडणार नाही आणि ते त्यांच्या मर्जीनुसार काम देखील करू शकतील. तुम्ही देखील यापैकीच एक आहत किंवा तुम्ही देखील एखादा व्यवसाय (buisness) सुरू करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला Top 10 buisness ideas in marathi बद्दल माहिती असायला हवे.
आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला अशा काही marathi buisness ideas सांगणार आहे की ज्यात तुम्हाला फार कमी गुंतवणूक करावी लागेल आणि त्यातून भविष्यात तुम्ही भविष्यात नक्कीच एक यशस्वी buisnessman होऊ शकता.
तर चला मग पाहूया top 10 buisness ideas in marathi कोण कोणत्या आहेत.
Contents
- 1 Top 10 best business ideas in marathi
- 1.1 #१ Blogging ( best profitable business idea )
- 1.2 #२ Social media manager
- 1.3 #३ Youtube channel
- 1.4 #४ Game parlour (best money making business idea in marathi )
- 1.5 #५ Health club (gym)
- 1.6 #६ Restaurant buisness
- 1.7 #७ Online store (best online business in marathi)
- 1.8 #८ Organic farming (best buisness ideas in marathi )
- 1.9 #९ Decorating egency
- 1.10 #१० Elecronic store
Top 10 best business ideas in marathi
#१ Blogging ( best profitable business idea )
होय, तुम्ही बरोबर वाचत आहात ! ब्लॉगींग देखील तुमच्यासाठी एक बेस्ट buisness होऊ शकतो जर तुम्हाला लेख लिहायला आवडत असतील तर. कारण आज प्रत्येक ब्लॉगर ब्लॉगींग एक buisness म्हणून करत आहे. आज प्रत्येक ब्लॉगर ब्लॉगींग ला पैसे कमावण्याचा एक साधन म्हणून पाहत आहे.
लेखनाचा छंद जोपासण्यासाठी ब्लॉगींग करणारे आज तुम्हाला फार कमी मिळतील. कारण आज प्रत्येक जण पैसे कमावण्यासाठी ब्लॉगिंग विश्वात प्रवेश करत आहे.
तुम्ही देखील ब्लॉगींग करून हजार पासून ते लाखों रुपयांपर्यंत पैसे कमावू शकता जसे काही आजचे bloggers कमावत आहेत. यासाठी तुम्हाला एक ब्लॉग तयार करावा लागेल आणि त्यात नियमित आर्टिकल लिहावे लागतील.
तुम्हाला यातून पैसे कमावण्यासाठी तुमच्या content वर खूप लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला seo friendly article लिहावा लागेल आणि त्यात व्यवस्थित seo करावा लागेल. नंतर तुम्हाला adsense कडून approval मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये जाहिराती लावून पैसे कमावू शकता.
Blogging बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. येथे तुम्हाला ब्लॉग कसा सुरु करावा पासून ते त्यातून पैसे कमवन्यापर्यंत सर्व माहिती मिळेल.
#२ Social media manager
हा buisness त्या लोकांसाठी खूपच महत्त्वाचा ठरू शकतो जे लोक सोशल मीडियावर खूप जास्त active असतात. या buisness मधून त्यांना नक्कीच पैसे तर मिळणार आहेत परंतु त्यांचे मनोरंजन देखील होणार आहे. कारण खूप लोकांना सोशल मीडियावर वेळ व्यथित करायला खूप आवडतं.
आजच्या काळात जवळपास सर्वच व्यवसाय हे social media based आहेत. अशा व्यवसायांना त्यांच्या कस्टमर पर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम ठरत आहे. अशीच एक best marathi buisness idea आहे ती म्हणजे social media manager.
या व्यवसायामध्ये तुम्हाला कंपनी किंवा मग एखाद्या विशेष व्यक्तीच्या सोशल मीडिया नेटवर्क ला manage करायचे असते. यासाठी तुम्हाला attractive आणि impressive आर्टिकल लिहिता यायला हवेत. येथून तुम्हाला कंपनीचा सर्व सोशल मीडिया वरील कारोभार सांभाळायचा असतो.
हा व्यवसाय पूर्ण तुमच्या interest वर अवलंबून आहे. तुम्हाला यात रुची असेल तर तुम्ही यातून नक्कीच महिण्याकाठी हजारों रुपये कमाऊ शकता.
#३ Youtube channel
Youtube देखील तुमच्यासाठी पैसे कमावण्याचा एक उत्तम पर्याय बनू शकतो. यात तुम्हाला कोणत्याही qualification ची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार youtube वर व्हिडिओ बनवून लाखों रुपये कमावू शकता.
यासाठी तुम्हाला यूट्यूब वर एक चॅनल तयार करावे लागेल आणि नंतर तुम्ही मग तुमच्या आवडीनुसार त्यात व्हिडिओ publish करू शकतो. तुम्ही ज्या विषयात एक्स्पर्ट आहात तुम्हाला त्या विषयाशी संबंधित व्हिडिओ तुमच्या चॅनल मध्ये publish करायचे आहेत. जसे की technology, music, motivation, education, इत्यादी.
तुम्हाला जर एखादी कला अवगत असेल तर त्याच्या विषयी यूट्यूब चॅनल तयार करून देखील तुम्ही पैसे कमावू शकता. जसे की music, dance, comedy, drama,इत्यादी. यापासून तुमची कला देखील जोपासली जाईल आणि तुम्हाला पैसे देखील मिळतील.
#४ Game parlour (best money making business idea in marathi )
Game parlour हा एक profitable buisness idea आहे. कारण आज जवळपास सर्वच तरुण pubg, gta, god of war, free fire सारख्या गमेचे दिवाणे आहेत. त्यामुळे हा व्यवसाय देखील खूप जास्त पैसे कमावून देणारा आहे.
यासाठी तुम्हाला काही computer आणि game cd player ची आवश्यकता भासेल. नंतर तुम्हाला यात कुठलीही गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला पैसा येत राहील. फक्त तुमच्या ग्राहकांना नवीन लाँच झालेले गेम लवकरात लवकर उपलब्ध करून द्या.
#५ Health club (gym)
Health club देखील तुमच्यासाठी best buisness ठरू शकतो. कारण आज प्रत्येक जण आपापल्या आरोग्य विषयी खूप जागरूक आहे. यासाठी तुम्हाला कस्टमर ची कमतरता भासणार नाही. कारण आज जवळपास सर्वच वयातील व्यक्ती health club जॉईन करण्यासाठी उत्सुक असतात.
आजच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याला खूप जास्त महत्व दिले जात आहे. त्यामुळे हा व्यवसाय तुमच्यासाठी खास ठरू शकतो. तसेच यामध्ये फक्त सुरूवातीला एकदाच गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते. त्यानंतर तुम्हाला गुंतवणूक करावी लागणार नाही.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही एक बेस्ट लोकेशन निवडा. एकदा तुमचा हा health club लोकांच्या नजरेत आला की तुम्हाला भरपूर ग्राहक मिळतील आणि तुम्ही यातून महिण्याकाठी खूप पैसे कमावू शकता.
#६ Restaurant buisness
हा buisness देखील पैसे कमावण्यासाठी अप्रतिम आहे. यातून तुम्ही जवळपास २५-३०% नफा सहज कमावू शकता. यामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्राहकांना बेस्ट क्वालिटी फूड द्यावे लागेल. तसेच यात चांगल्यात चांगली सर्व्हिस देण्याचा देखील प्रयत्न करावा लागेल.
Covid-१९ मुळे २०२० मध्ये या buisness ला उतरती कळा लागली होती. कारण याकाळात सर्वत्र lockdown होते आणि रेस्टॉरंट मध्ये जेवण्याची भीती देखील लोकांना वाटत होती.
पण आज हा व्यवसाय lockdown नंतर पुन्हा सुरू झाला आहे आणि Top 10 buisness ideas in marathi मध्ये समाविष्ट आहे.
#७ Online store (best online business in marathi)
Lockdown पासून या व्यवसायाला लोकांचा फार प्रतिसाद मिळत आहे आणि आज प्रत्येक जण घरी बसून ऑनलाईन वस्तू मागवण्यात समाधान मानत आहे.
या व्यवसायामुळे लोकांचे जीवन फारच सोपे झाले आहे कारण प्रत्येक हवी ती वस्तू घरपोच मिळत आहे. मग तो एखादा खाण्याचा पदार्थ असो की चैनीची वस्तू असो !
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सोशल मीडियावर किंवा मग गूगलवर एक online store ओपन करावे लागेल जसे की myntra, flipkart, आहे त्याप्रमाणे.
यातून तुम्ही तुमच्या जवळपास शहरातील व्यक्तींना घरपोच वस्तू सेवा देऊ शकता. यातून तुम्हाला नक्कीच भरपूर फायदा होईल.
#८ Organic farming (best buisness ideas in marathi )
मित्रांनो तुम्हाला जर शेती करायला आवडत असेल किंवा त्याबद्दल माहिती असेल तर तुमच्यासाठी ही best buisness idea in marathi खूपच खास ठरू शकते. कारण आज या व्यवसायाला लोकांची खूप जास्त मान्यता आहे.
तुम्हाला तर माहितीच असेल की आज प्रत्येक अन्न घटकामध्ये केमिकल वापरण्यात येत आहेत आणि हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच घातक आहेत. अशा वेळेस ऑरगॅनिक पद्धतीने उगवलेले फळे, भाज्या, अन्न पदार्थ यांना मार्केट मध्ये खुप जास्त मागणी आहे.
त्यामुळे अशा वेळेस जर तुम्ही organic farming केली तर ती तुमच्यासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी बनू शकते. कारण या व्यवसायात लोकांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच ऑरगॅनिक शेती करणारे लोक पण फार कमी आहेत आणि तुमच्या प्रॉडक्ट ला मार्केट मध्ये भाव देखील चांगला मिळेल.
यासाठी तुम्हाला थोड्या जागेची आवश्यकता भासेल. आज mushroom सारख्या भाजीची शेती घरात देखील करणे शक्य आहे.
#९ Decorating egency
मित्रांनो आपल्या घरी जेंव्हा एखादा कार्यक्रम असतो तेंव्हा आपल्याला घर सजवायचे असते. परंतु हे काम करायला आपल्याला खुप वेळ लागतो आणि सजावटीचे पूर्ण साहित्य देखील आपल्याकडे नसते. अशा वेळेस आपण decorating egency ला हे कार्य देऊ शकतो.
ते तुम्हाला सजावटीचे सर्व काम करून देतील व तुमच्या घराला सुंदर सजवतील. अशा वेळेस तुमचा वेळही वाचेल आणि कमी खर्चात कामही होऊन जाईल.
तर decorating egency देखील एक छान buisness आहे. यामध्ये तुम्हाला पार्टी, वाढदिवस, लग्न, समारंभ अशा कार्यक्रमाचे सजावटीचे कॉन्ट्रॅक्ट घ्यावे लागतात. या सुविधेची देखील लोकांना सध्या खुप गरज आहे. त्यामुळे हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
#१० Elecronic store
मित्रांनो आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे आपले जीवन हे या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी व्यापले आहे. आपण दिवसभरात वापरणारी जवळपास प्रत्येक वस्तू इलेक्ट्रॉनिक आहे. जसे की मोबाईल, लॅपटॉप, कंप्युटर, कॅल्क्युलेटर, टेलिव्हिजन, पंखा, फ्रीज, इत्यादी.
त्यामुळे या व्यवसायात देखील तुम्हाला भरपूर ग्राहक मिळतील आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू मागे तुम्हाला २५-३०% नफा देखील मिळेल. त्यामुळे हा व्यवसाय देखील तुम्ही करू शकता.
तसेच तुम्ही जुन्या आणि नव्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी विक्री देखील करू शकता.
निष्कर्ष :
मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला marathi buisness ideas बद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. यात सांगितलेल्या Top 10 buisness ideas in marathi या तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरतील.
मित्रांनो मी मला माहिती असणाऱ्या सर्व profitable business ideas in marathi यात समाविष्ट केल्या आहेत. तसेच यात तुम्हाला त्या प्रत्येक buisness बद्दल आवश्यक सर्व माहिती देखील पुरवली आहे.
टीप : जर तुम्हाला यातील एखाद्या marathi buisness idea बद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली कमेंट मध्ये लिहून कळवा. पुढच्या पोस्टमध्ये मी नक्कीच त्याबद्दल माहिती लिहिल, धन्यवाद…!!!