Site icon My Marathi Status

रामफळ बद्दल माहिती मराठीत – Bullock’s Heart / Custard Apple Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला रामफळ बद्दल माहिती मराठीत – Bullock’s Heart / Custard Apple Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात.

आणखी वाचा – बोर

रामफळ बद्दल माहिती | Bullock’s Heart / Custard Apple Information in Marathi

१] मराठी नाव :- रामफळ
२] इंग्रजी नाव :- Bullock’s Heart / Custard Apple
३] शास्त्रीय नाव :- Annona Reticulata

सीताफळ वर्गातील हे झाड आहे. सीताफळापेक्षा चांगल्या पावसाच्या प्रदेशात हे उत्तम वाढते. मध्यम आकाराची जमीन याला मानवते. हे झाड मूळत: आशिया खंडातील आहे.

कडक ऊन, धुके व अवर्षणास हे झाड तोंड देऊ शकत नाही. रामफळाची झाडे सीताफळापेक्षा मोठी असतात. साधारणपणे ६ ते ८ मीटर उंचीपर्यंत ही झाडे वाढतात. रामफळाच्या रोपाला साधारणपणे ५ ते ७ वर्षांनी फलधारणा होते.

पाने :- या झाडाची पाने लांबट आकाराची असतात. फुले :- रामफळाच्या झाडाला ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुले येतात. आकार :- रामफळाचा आकार हृदयासारखा लंबगोल असतो.

रंग:- रामफळाचारंग पिवळसर, लाल-हिरवट काळसर असतो. चव :- रामफळातील गर गोड असतो.

उत्पादन क्षेत्र :- महाराष्ट्रात वाशीम, भंडारा, चंद्रपूर, रामटेक, नागपूर, सातारा, पुणे, ठाणे तसेच रामगड, बेळगाव, धारवाड या भागात मोठ्या प्रमाणात रामफळाचे उत्पादन होते.

गुजरातेत सुरत, नवसारी, बलसाड या भागातही रामफळे दिसतात. मेक्सिको, अमेरिका, मदिना येथे फार मोठ्या प्रमाणात रामफळांची निर्यात होते.

उत्पादने :- रामफळाचा गर अतिशय गोड, मधुर व पोट भरण्यासारखा असतो. आईस्क्रीममध्ये रामफळाच्या गराचा उपयोग करतात. रामफळामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.

फायदे : रामफळ रुचकर, मधुर व वातुळ असते. रामफळाचा गर दाह, पित्त, तृष्णा, श्रमनाशक आहे. या फळात अजीवनसत्त्व व शर्करा असते.

साठवण :- ही फळे देठासकट तोडतात, फळे झाडावर पिकून देता मढून गवताच्या आच्छादनावर पिकवायला ठेवतात. रामफळाची विक्रीनगावर करतात.

रामफळ खाण्याचे फायदे – Benefits of Eating Ramphal Fruit in Marathi

काय शिकलात?

आज आपण रामफळ बद्दल माहिती मराठीत – Bullock’s Heart / Custard Apple Information in Marathi पाहिली आहे, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद

Exit mobile version