Bhartiya Swatantrata Ladha in Marathi Nibandh – मित्रांनो आज “भारतीय स्वातंत्र्य लढा निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
Contents
Bhartiya Swatantrata Ladha in Marathi Nibandh
भारतीय स्वातंत्र्याबद्दल लिहितांना अंगावर शहारे, विचारांना धार आणि लेखणीला वेग आपोआपच येतो. एके काळी भारताला सोनेकी चिडिया म्हटले जायचे, भारत देश ध्रुवाच्या ताऱ्याप्रमाणे चमकायला. एक कवीने एका ठिकाणी म्हटले आहे.
प्यारा रे प्यारा देश माझा प्यारा
चमके हा ध्रुवाचा तारा……
ऋषी मुनी वाणी जन्मली येथे गंगा
गोदा कृष्णा वाहाती येथे
अति पवित्र पावन ही भूमी
वाहाते ममता तुषार रे….
या ओळी खुप बोलक्या आहेत.. अशा या पवित्र भारत भूमीला ब्रिटिशांनी बेचिराख करून टाकले होते. सामान्य माणसांचा हक्क हिरावून घेऊन गुलामगिरी लादली होती.
इथला माणूस ब्रिटिशांच्या गुलामगिरीत गुदमरून गेला होता. येथील उद्योग डबघाईस आले होते येथील कच्चामाल कवडीमोल विकला जात होता. आणि कामगारांना कामाची सक्ती केली जात होती. यामुळेच भारतीय माणूस कधी आपण या ब्रिटिशांच्या साखळदंडातुन मुक्त होऊ याची चातकासारखी वाट पाहत होता.
भारतीय स्वातंत्र्य लढा निबंध मराठी
आणि यातूनच भारत मातेच्या कुशीतून एक एक रत्न जन्माला येऊ लागले. ब्रिटिशांच्या विरुद्ध सामान्य माणसाच्या मनात आग धगधगत होती. याचीच प्रचिती म्हणून अधूनमधून ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा तसा ब्रिटिशांविरुद्ध उद्रेक होत होता.
याची पहिली ठिणगी पडली ती बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या झाडून ठार केले आणि तेथूनच 1857 च्या उठावाला सुरुवात झाली… इथून जी स्वातंत्र्य लढ्यासाठी क्रांतिकारकांनी मशाल पेटवली ती 1947 पर्यंत कधीच विझली नाही शेवटी याच मशालीच्या तेजा 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. Bhartiya Swatantrata Ladha in Marathi Nibandh
भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून येथील महात्म्यांनी, त्यांनी क्रांतिकारकांनी आपले आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवले. त्यामध्ये बिपिन चंद्र पाल, लाला लचपतराय, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, गो. ग. आगरकर, रासबिहारी बोस, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू असे कितीतरी नेते भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ब्रिटिशांविरुद्ध लढले.
Bhartiya Swatantrata Ladha in Marathi Nibandh
कित्येक क्रांतिकारक फासावर चढले.. त्यामध्ये शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, असे कितीतरी सांगता येतील ज्या विरांनी भारतमातेच्या यज्ञकुंडात प्राणांची आहुती दिली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला.
भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. यासाठी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असे ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा असे गर्जून सांगणारे सुभाष चंद्र बोस करा किंवा मरा असा टोकाचा संदेश देणारे महात्मा गांधी अशा अनेक महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देऊन भारत मातेसाठी फासावर जाणारे भगतसिंग राजगुरू सुखदेव अशा कितीतरी क्रांतिकारकाचे योगदान स्वातंत्र लढ्यात अमूल्य आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढा निबंध मराठी
मित्रांनो अनेक क्रांतिकारकांनी तुरुंगवास भोगला कितीतरी क्रांतिकारक ब्रिटिशांच्या बंदुकीच्या गोळीचे बळी ठरले तेव्हा आपली भारतमाता स्वतंत्र झाली. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रभाव निर्माण करण्याचे कार्य टिळकां हाती घेतले. [Bhartiya Swatantrata Ladha in Marathi Nibandh]
स्वराज्याचे बीज सामान्य माणसापर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा वृत्तपत्रे सुरु केली. याच वृत्तपत्रातून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध जळजळीत लेख लिहिले त्यामध्ये “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?”
“सत्ता करणे म्हणजे सूड घेणे नव्हे” “असे खून का होतात?” “पुनश्च हरि ओम” हे लेख विशेष गाजले. टिळकांनी आपल्या लेखणीला शस्त्र बनवले. आणि याच लेखणीने भारतीय तरुणात जाज्वल्य देशभक्ती निर्माण केली.
Bhartiya Swatantrata Ladha in Marathi Nibandh
त्याचप्रमाणे गांधीजींचे देशांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान महत्वपूर्ण आहे नव्हे नव्हे तर त्यांच्याशिवाय भारतीय स्वातंत्र्यलढा पूर्ण होऊच शकत नाही. त्यांनी स्वातंत्र्याचा लढा जनसामान्यापर्यंत नेऊन पोहोचविला आणि जनआंदोलन उभे केले. Bhartiya Swatantrata Ladha in Marathi Nibandh
म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील व्यापक अशा जनआंदोलनाचे जनक गांधींना म्हणायला हरकत नाही. गांधीजींनी आपल्या वागण्यातून बोलण्यातून सामान्य माणसात आपली प्रतिमा तयार केली.
गांधीजींनी 1960 मध्ये गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह करून आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यास सुरुवात केली.
भारतीय स्वातंत्र्य लढा निबंध मराठी
बिहारमध्ये नील पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर तेथील इंग्रज मळेवाले निळ लावण्याची सक्ती करत होते. चंपारण्यातील शेतमुजरावर इंग्रज मळेवाले अन्याय करत होते. या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम गांधीजींनी सत्याग्रह करून केले.
1918 मध्ये अहमदाबाद येथे गिरणी कामगारांचा संप केला. इंग्रज सरकारने 1919 मध्ये माँटेग्यू चेम्सफोर्ड अन्यायकारक कायदा भारतीय लोकांवर लादला.
‘भारतीय जनतेची गळचेपी करणारा हा अन्यायकारक कायदा रद्द केला पाहिजे. नव्हे नव्हे तर रद्द करणारच अशी शप्पथ गांधीजींनी घेतली व या कायद्याच्या विरुद्ध सत्याग्रह केला. महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली.
Bhartiya Swatantrata Ladha in Marathi Nibandh
कायदा मोडून इंग्रजांना विरोध करणे. यासाठी कायदेभंग ही चळवळ सुरू केली 14 फेब्रुवारी 1930 रोजी राष्ट्रीय सभेने जनतेला सविनय कायदेभंग करण्यासाठी आदेश दिला.
यात गांधीजीनी पुढाकार घेऊन 12 मार्च 1930 या दिवशी साबरमती आश्रमातून आपल्या 78 निष्ठावंत कार्यकर्त्या सोबत दांडी यात्रा काढली 5 एप्रिल रोजी दांडी येथे पोहोचले व त्याठिकाणी जाऊन मिठाचा कायदेभंग केला. अशा अनेक चळवळीतून महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्याचा पाया भक्कम तयार केला. {Bhartiya Swatantrata Ladha in Marathi Nibandh}
गांधीजी घराघरात जाऊन पोहोचले. गांधीजींनी 1942 रोजी ब्रिटिशांना हाकलून देण्यासाठी चले जाव हे आंदोलन सुरू केले.
भारतीय स्वातंत्र्य लढा निबंध मराठी
भारतीय जनतेला संदेश दिला की “करा किंवा मरा.” हा संदेश ऐकून संपूर्ण भारत देश पेटून उठला. अशा अनेक भारतमातेच्या थोर क्रांतिकारकाच्या कार्यामुळेच भारतीय स्वातंत्र्य लढा हा इतिहासामध्ये अविस्मरणीय असे स्वातंत्र्य समर झाला.
शेवटी एवढ्याच ओळी सुचतात… धुमसतात अजूनी विझल्या चितांचे निखारे. अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे. आंसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.
तर मित्रांना “Bhartiya Swatantrata Ladha in Marathi Nibandh” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “भारतीय स्वातंत्र्य लढा निबंध मराठी” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.