Bhartiy Rajya Ghataneche Shilpkar Nibandh :- मित्रांनो आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्यप्तदेशातील महू या गावी पि. १० एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ असे होते.
लहानपणापासूनच बाबासाहेब कुशागत बुद्धीचे होते. शाळेत असल्यापासूनच ते वर्गात सर्वात हुशार ठरले. सर्वच परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत ते पुढे शिकत गेले.
“भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हणून आज प्रत्येक भारतवासी ज्यांना ओळखतो, ते एक महान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ! ज्ञानाची कास धरलेल्या बाबासाहेबांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले. त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम्.ए. व पीएच्.डी. ह्या पदव्या मिळवल्या.
Contents
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार निबंध मराठी
वाचनाची विलक्षण आवड असलेल्या बाबासाहेबांकडे प्रचंड ग्रंथसंपदा होती. त्यांच्या वाचनालयात पंचवीस हजाराहून अधिक ग्रंथ होते. ते स्वत: उच्च शिक्षित होतेच होते, पण समाजानेही शिक्षित झाले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. ‘सिद्धार्थ व ‘मिलिंद’ महाविद्यालये सुरू केली.
परदेशातील उच्च शिक्षणानंतर भारतात परतल्यावर येथील समाजाचे विदारक चित्र पाहून । ते अतिशय व्यथित झाले. समाजात जागृती घडवून आणण्याच्या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतले.
समाजातील अन्याय दूर व्हावा यासाठी त्यांनी मूकनायक नावाने पाक्षिक काढले. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हे ब्रीद वाक्य असलेली “बहिष्कृत हितकारिणी” ही संस्था स्थापन केली.
Bhartiy Rajya Ghataneche Shilpkar Nibandh
“वाचाल तर वाचाल” असा संदेश त्यांनी दिला. आपलं अवघं जीवन त्यांनी दलितोद्धारासाठी खर्च केलं. दलितांना मिळणारी हीन वागणूक पाहून ते फार दुःखी झाले. महाड येथे चवदार तळ्यावर त्यांनी सत्याग्रह केला. धर्मातल्या जाचक रूढी, परंपरांमुळे आपल्या बांधवांवर अन्याय होतो असे त्यांच्या निदर्शनास आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व विचार करून धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सर्व धर्माचा बारकाईने अभ्यास करून बौद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेबांच्या अनुयायांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घटना समितीत समावेश झाला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार निबंध मराठी
तुझं न माझं, भारतीय संविधान देशाचे!
यात तुझे हित आहे, यात माझे हित आहे
अरे नादान माणसा, भारतीय संविधान
मानवतेचे गीत आहे ||१||
ना तुझा धर्म श्रेष्ठ, ना माझा धर्म कनिष्ठ आहे
भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे
ना जगण्या तिला बंदी आहे ना
शिकण्या त्याला बंदी आहे
ना तू शेठ आहे, ना मी ग्रेट आहे
भारतीय संविधान समतेची भेट आहे ।।२।।
ही न्यायाची मिसाल आहे
यात बंधुता खुशाल आहे
भारतीय संविधान स्वातंत्र्याची मशाल आहे
तू एक टोक आहे, मी एक टोक आहे
भारतीय संविधान तुला मला
समाजाला जोडण्याचा रस्ता नेक आहे ।।३।।
हे तुझं संविधान आहे, हे माझं संविधान आहे
अरे नादान माणसा, भारतीय संविधान
माणसाने फक्त माणसाच्या हितासाठी
लोकशाहीसाठी तयार केले आहे
त्याचा आपल्याला अभिमान आहे ||४||
आपले जीवन फाईन आहे, जीवनात शाईन आहे
कारण संविधानामध्ये बाबासाहेबांची साईन आहे ।।५।।
Bhartiy Rajya Ghataneche Shilpkar Nibandh
गोरगरिब, पपपलितांच्या डोळ्यांतील अमु पुसत, त्यांना जगण्याची नवी उमेद देणारा, त्यांच्या अंधाज्या जीवनात तेजस्वी सकाबा आणणारा क्रांतिकारी सूर्य हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरवाबासाहेबांनी अज्ञान, अन्यायाने पिडीत समाजाच्या जगण्याच्या वाटेवरचे काटे
वेिचून तिथे सुगंधी फुले पसरवली.
मानवाच्या विकासात अज्ञान हाच सगळ्यात मोठा अडथळा आहे, हे बाबासाहेबांनी अचूक ओळखले, शिक्षणाचा प्रचार-प्रसार करून त्यांनी
समाजाला ताठ मानेने जगण्याची प्रेरणा दिली.
तर मित्रांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार निबंध मराठी हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार निबंध मराठी मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी आणि कुठे झाला ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्यप्तदेशातील महू या गावी पि. १० एप्रिल १८९१ रोजी झाला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण?
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.