भारताचा स्वातंत्र्य संग्राम निबंध मराठी | Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi

Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi – मित्रांनो आज “भारताचा स्वातंत्र्य संग्राम निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi

भारत इंग्रजी अंमलाखाली आल्यानंतर स्वातंत्र्य संपादनार्थ घडलेला इतिहास. बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा बंगालमधील प्लासी या गावाजवळ २३ जून १७५७ रोजी झालेल्या लढाईत [प्लासीची लढाई] ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पराभव केला आणि कलकत्ता शहर व २४ परगणा जिल्हा यांचे चिमुकले राज्य स्थापिले.

या राज्याचा विस्तार शीख सत्ता नष्ट होईपर्यंत (१८४९) चालू राहिला. अखेरीस भारताच्या इतिहासातील एक सर्वांत मोठे व बलाढ्य असे ब्रिटिश साम्राज्य उभे राहिले.

पाचही खंडांत पसरलेल्या विशाल ब्रिटिश साम्राज्याचा हिंदी साम्राज्य हा एक भाग होता. त्याची इतरही अनेक वैशिष्टये होती. आधीच्या सर्व परकी राज्यकर्त्यांनी येथे स्थायिक होऊन भारतीय शेती व उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे आर्थिक भरभराट होत राहिली.

भारताचा स्वातंत्र्य संग्राम निबंध मराठी

ब्रिटिश काळात परिस्थिती उलटी झाली. ग्रेट ब्रिटनमधील कारखान्यांत तयार होणाऱ्या मालाला भारत ही हुकमी बाजारपेठ मिळाली. त्यामुळे इथले उद्योग बुडाले, जमिनीचा सारा वाढला आणि शेतीसाठी दरवर्षी जी कर्जे घ्यावी लागत, त्यांचे लेखी व्यवहार सुरू झाले. “Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi”

या व्यवहारात निरक्षर शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या मालकीच्या बनल्या. देशाचा कोणत्या ना कोणत्या तरी भागात दुष्काळ आणि भूकबळी ही नित्याची बाब होऊन बसली.

या प्रचंड साम्राज्यविरुद्धचे स्वातंत्र्य आंदोलन जवळजवळ १८६ वर्षे चालले. या दीर्घ काळात येथील समाजव्यवस्थेत, राजकीय विचारसरणीत आणि नेतृत्वात क्रांतिकारक बदल होत गेले.

Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi

त्या दृष्टीने स्वातंत्र्य चळवळीचे दोन महत्त्वाचे टप्पे पडतात :

  1. कंपनी सरकारचा कालखंड (१७५७ ते १८५८) आणि
  2. ब्रिटिश साम्राज्याचा कालखंड (१८५८ ते १९४७).

१९४७ पूर्वीची २०-२५ वर्षे वगळली, तर ब्रिटिशांच्या मांडलिक देशी संस्थानांतून म्हणण्यासारखी स्वातंत्र्य चळवळ अशी झालीच नाही. १९४७ नंतर चिमुकल्या फ्रेंच वसाहतींतून फ्रेंचांनी समंजसपणे सत्ता सोडली (1954), उलट भारत सरकारला पोर्तुगीजांपासून दीव, दमण आणि गोवा जिंकून घ्यावे लागले (१९६२). [पोर्तुगीज सत्ता, भारतातील फ्रेंच सत्ता, भारतातील].

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पाश्चिमात्य संस्कृती व राजकीय तत्त्वज्ञान यांनी प्रभावित झालेल्या सुशिक्षितांनी प्रथम इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारावर आणि नंतर पुरातन चालीरीती आणि अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध प्रचार करून समाजसुधारणांवर लक्ष केंद्रित केले होते.

भारताचा स्वातंत्र्य संग्राम निबंध मराठी

राजा राममोहन रॉय यांनी तर वृत्तपत्रही चालू केले. कंपनीची सनद १८३३ साली ब्रिटिश पार्लमंटने वाढवून दिली. त्या वेळी शासकीय नेमणुकात धर्म, वंश, वर्ण यांबाबतीत कसलाही भेदभाव केला जाऊ नये, असे बंधन पार्लमेंटने घातले. (Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi)

१८४० मध्ये तर इंग्लंडमध्येच वयात आलेल्या सर्व पुरुषांना मताधिकार मिळाला पाहिजे, या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन सुरू झाले. या दोन्ही घटनांचा सुशिक्षितावर बराच परिणाम झाला.

त्यांनी १८४३ साली कलकत्त्याच्या एका जाहीर सभेत ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदी लोकांना प्रतिनिधित्व द्या, अशी मागणी केली. १८५३ साली ब्रिटिश पार्लमेंट कंपनीची संपलेली मुदत वाढवून देणार होते.

त्या अगोदर तिच्या पुढे हिंदी लोकांच्या वतीने मागण्यांची निवेदने सादर करावीत, अशा विचाराने कलकत्ता, मुंबई व मद्रास येथील सुशिक्षितांनी संस्था स्थापन केल्या.

Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi

प्रत्येक संस्थेने आपापल्या मागण्या तयार करून धाडून दिल्या. आपल्या प्रांतात विधिमंडळे सुरू करा आणि शासनाच्या सर्वोच्च सेवांसाठीच्या स्पर्धा परीक्षांत भार घेण्याची हिंदी तरुणांना संधी द्या, या मागण्या तिन्ही शहरांतील संस्थांमार्फत करण्यात आल्या होत्या.

बंगाली संस्थेने तर यापुढे जाऊन सबंध देशासाठी एक केंद्रीय विधिमंडळ स्थापन करण्याची मागणी केली. यांपैकी फक्त स्पर्धा परीक्षांसंबंधीची मागणी मान्य करून ब्रिटिश पार्लमेंटने सनद वाढवून दिली मात्र मद्रास संस्थेने शेतकऱ्यांचा शासनाकडून छळ होत असल्याच्या ज्या अनेक तक्रारी केल्या होत्या.

त्यासंबंधात पुढे चौकशी आयोगा ची (कमिशन फॉर द इन्वेस्टिगेशन ऑफ अलेज्ड केसेस ऑफ टॉर्चर) नेमणूक होऊन शेतकऱ्याना काहीसा दिलासा मिळाला.

भारताचा स्वातंत्र्य संग्राम निबंध मराठी

राजकीय प्रश्न मागे पडले आणि पुन्हा समाजसुधारणांवर सुशिक्षितांनी आपले लक्ष केंद्रित केले. या आधी सतीच्या प्रथेवर बंदी आलीच होती (१८३३). इतर सामाजिक सुधारणांसाठी ईश्वरचंद्र विद्यासागरांनी हजारो सह्यांचा अर्ज सरकारला सादर केला.

१८५७ मध्ये मुंबई, मद्रास व कलकत्ता ही तीन विश्वविद्यालयेही स्थापन झाली. समाजसुधारणांना वेग येणार अशी चिन्हे दिसत होती, तोच दिल्ली ते ओरिसा आणि दक्षिणेला विंध्यपर्यंत लष्करी शिपायांचा उठाव झाला. [भारतीय प्रबोधनकाल]. [Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi]

अठराशे सत्तावनच्या उठावाचा भावी इतिहासावर फार मोठा परिणाम झाला. स्वातंत्र्यावीर वि. दा. सावरकर आदी अनेक इतिहासकार या उठावाचे वर्णन क्रांतियुद्ध अथवा मुक्तिसंग्राम म्हणून करतात.

Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi

सुशिक्षित वर्ग संग्रामापासून अलिप्त राहिला असला, तरी त्याच्यावर न विसंबता राजेरजवाडे आणि जमीनदार यांवर साम्राज्याची भिस्त ठेवावी, असा धोरणात्मक मूलभूत बदल इंग्रजांनी केला.

अवध तालुकदारांच्या जमिनी जप्त केल्या होत्या त्यांपैकी बहुतेक जमिनी नव्या सनदा देऊन परत करण्यात आल्या. “Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi”

ब्रिटिश साम्राज्याचा कालखंड : अठराशे सत्तावनच्या उठावाची धडकी घेऊन सरकारने जे निर्णय पुढे घेतले व गोऱ्या अधिकाऱ्यांनी व इतर गोऱ्या व्यावसायिकांनी सूडाचे जे धोरण अवलंबिले त्यामुळे अगदी मंद गतीने विकसित होणाऱ्या राष्ट्रवादाला काहीसे उत्तेजन मिळाले.

भारताचा स्वातंत्र्य संग्राम निबंध मराठी

समान शासनयंत्रणा, इंग्रजी शिक्षण, तारायंत्रे, आगगाडीच्या वाहतुकीचा आरंभ, वृत्तपत्रांच्या उदय, पाश्चिमात्य विचारसरणींचा प्रभाव यांमुळे अगोदरच सांस्कृतिक एकात्मता असलेल्या या विशाल देशात एक अमूर्त, अस्पष्ट अशी राष्ट्रभावना जागृत होऊ लागली होती.

इंग्रज सेनेने आणि शासनाने जे अत्याचार केले, त्यांत हजारोंची हत्या झाली. बहादूरशाह, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, कुंवरसिंह यांसारखे उठावातील नेते पराभव होऊनही तत्कालीन जनतेची आणि भावी पिढ्यांची दैवते बनली. Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi

देशाच्या अंतर्भागात राष्ट्रवाद रुजायला आणखी एक शतक लागायचे ते कार्य वीस वर्षांतच घडून आले. काही बंगाली नेते व दादाभाई नवरोजी यांसारखे द्रष्टे भारतीय राष्ट्रवादाची स्वप्ने पाहातच होते.

Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi

१८६० साली दादाभाईंनी लंडनमध्ये इंडियन ॲसोसिएशन नावाची एक संस्था काढली. त्याच वर्षी कलकत्त्याच्या सुशिक्षितांनी सबंध देशासाठी एक केंद्रीय विधिमंडळ स्थापावे, अशी मागणी एका जाहीर सभेत केली.

पुढील वर्षी इंडिया कौन्सिल ॲक्ट संमत झाला आणि गव्हर्नर जनरलला कायदे बनविण्यासाठी अधिकाऱ्यांचे व नियुक्त व्यक्तींचे एक कौन्सिल मदतीसाठी नेमण्यात आले.

या विधेयकावर चर्चा चालू असता पार्लमेंटमधील काही सदस्यांनी भारतात राष्ट्रभावना जागृत झाली, तर साम्राज्याला फार मोठा धोका उत्पन्न होईल अशी भीती व्यक्त करून हिंदू व मुसलमान यांसाठी वेगवेगळी विधिमंडळे स्थापावीत अशी सूचना केली पण धर्म, जाती, पोटजाती, भाषा यांच्या विविधतेमुळे भारतीय राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले.

भारताचा स्वातंत्र्य संग्राम निबंध मराठी

स्वातंत्र्याच्या लढ्यात वेगवेगळ्या संग्रामांनी, वेगवेगळ्या घटनांनीही प्रेरणा दिली, स्वतःचे असे संदेश दिले. या प्रेरणा, हे संदेश आजचा भारत आत्मसात करून पुढची वाटचाल करू शकतो.

1857चा स्वातंत्र्य लढा, महात्मा गांधीजींचे विदेशातून मायदेशी येणे, देशाला सत्याग्रहाच्या ताकदीचे स्मरण करून देणे, लोकमान्य टिळकांचे पूर्ण स्वराज्याचे आवाहन, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौजेचा निघालेला दिल्ली मोर्चा, दिल्ली चलोचा दिलेला नारा, हिंदुस्तान आज हे सर्व विसरू शकतो का? “Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi”

1942 चे अविस्मरणीय आंदोलन, इंग्रजांसाठी केलेला भारत छोडोचा उद्घोष, असे कितीतरी अगणित पाडाव आहेत, त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतो, चैतन्य-शक्ती घेतो. देश दररोज कृतज्ञता व्यक्त करतो, असे कितीतरी हुतात्मा सेनानी आहेत.

Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi

1852च्या क्रांतीमध्ये मंगल पांडे, तात्या टोपे यांच्यासारखे वीर असो, इंग्रजांच्या फौजेसमोर निर्भयतेने गर्जना करणारी राणी लक्ष्मीबाई असो, कित्तूरची राणी चेन्नमा असो, राणी गाइडिन्ल्यू असो, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, अशफाकउल्ला खाँ, गुरूराम सिंह, टिटूस जी,

पॉल रामासामी यांच्यासारखे वीर असो, अथवा पंडित नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, खान अब्दुल गफ्फार खान, वीर सावरकर यांच्यासारखे अगणित लोकनायक!

अशा सर्व महनीय व्यक्ती स्वातंत्र्य आंदोलनाचे मार्गदर्शक होते. आज त्यांच्या स्वप्नांचा भारत बनविण्यासाठी, आपण सामूहिक संकल्प करीत आहोत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहोत.

६ डिसेंबर १९४६ रोजी ब्रिटीश सरकारने कोणतेही संविधान संविधानसमितीत अनुपस्थित राहिलेल्‍या घटकांवर सक्तीने लादले जाणार नाही, असे जाहीर केले.

भारताचा स्वातंत्र्य संग्राम निबंध मराठी

मुस्लिम लीगच्या दृष्टीने हे फायदेशीर ठरले. ९ डिसेंबर १९४६ च्या संविधानसमितीच्या बैठकीस मुस्लिम लीगचे सदस्य उपस्थित राहिले नाहीत. पुढे २० फेब्रुवारी १९४७ रोजी ब्रिटीश पंतप्रधान क्लेमंट ॲटली याने जून १९४८ पूर्वी हिंदुस्थानातील सत्ता सोडण्याचा ब्रिटीश शासनाला संकल्प जाहीर केला.

मुस्लिम लीगने त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही व पुन्हा प्रत्यक्ष कृतीची मोहीम हाती घेतली. परिणामताः पंजाब व वायव्य सरदद्द प्रांतात पुन्हा हिंसाचार उसळला.

२४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड माउंटबॅटन व्हाइसरॉय म्हणून हिंदुस्थानात आले. ३ जून १९४७ रोजी त्यांनी सत्तांतराची योजना-माउंट-बॅटन योजना-जाहीर केली. Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi

Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi

देशाच्या फाळणीची ही योजना काँग्रेस नेत्यांनी तत्कालीन परिस्थितीतील एकमेव व्यवहार्य योजना म्हणून स्वीकारली. (Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi)

त्यानुसार जुलै १९४७ मध्ये हिंदुस्थान स्वातंत्र्याचे विधेयक ब्रिटीश पार्लमेंटमध्ये संमत करण्यात आले. पुढे हिंदुस्थानची फाळणी होऊन पाकिस्थान व भारत हे दोन स्वतंत्र देश अस्तित्वात आले.

तर मित्रांना “Bhartacha Swatantra Sangram Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “भारताचा स्वातंत्र्य संग्राम निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

 

स्वातंत्र्य चळवळीचे दोन महत्त्वाचे कालखंड कोणते?

1. कंपनी सरकारचा कालखंड (१७५७ ते १८५८)
2. ब्रिटिश साम्राज्याचा कालखंड (१८५८ ते १९४७).

मुंबई, मद्रास व कलकत्ता ही तीन विश्वविद्यालये कधी स्थापन झाली?

मुंबई, मद्रास व कलकत्ता ही तीन विश्वविद्यालये 1857 मध्ये स्थापन झाली?

साम्राज्यविरुद्धचे स्वातंत्र्य आंदोलन जवळजवळ किती वर्षे चालली?

साम्राज्यविरुद्धचे स्वातंत्र्य आंदोलन जवळजवळ १८६ वर्षे चालले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: