Site icon My Marathi Status

[Best]Marathi Kavita on Bus/एस टी

कधी दगडफेक, कधी जाळपोळ

एसटीच होते शिकार असा का?खेळ

आता तिच्या लेकरांची होतेय घुसमट

जीवनाची त्यांच्या चाललीय फरफट//१//

 

सेवेची तळमळ साऱ्यांची आहे

एस टी नित्य हसावी हीच आस आहे

प्रवाशी सुरक्षित एस टी तच आहे

एस टी चाच प्रवास सुखाचा आहे//२//

 

पुन्हा मनमोकळे पणाने धावावी एस टी

दास तिचे नसो कधी दुःखी कष्टी

रिकामे असु नये कधीही “थांबे”

हिच सदिच्छा चरणी जगदंबे //३//

 

राबणारे हात रिकामे,असू नये

आर्थिक संकट कधी ओढवू नये

मनमोकळे पणाने धावावी एस टी सदा

येऊ नये तिच्यावर कधीही आपदा//४//

कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

Exit mobile version