बास्केटबॉल बद्दल माहिती मराठीत – Basketball Information in Marathi
हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला Basketball Information in Marathi – बास्केटबॉल बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात.
Contents
माहिती – Basketball Information in Marathi
भारतात शाळा, कॉलेजच्या ग्राऊंडवर किंवा बंदिस्त कोर्टमध्येही हा खेळ खेळतात. बास्केट बॉल पुरुष, महिला, मुले, कोणीही खेळू शकतो. हा खेळ कमीत कमी खर्चीक आहे. तसेच साहित्यही कमी लागते.
खेळाचे मैदान – बास्केट बॉल ज्या मैदानावर खेळला जातो, त्या मैदानाला ‘कोर्ट’ म्हणतात. या खेळाच्या मैदानाची लांबी २६ मी. व रुंदी १४ मी. असते.
या मैदानात दोन्ही बाजूंना मधोमध एक-एक खांबाच्या मदतीने उंचावर दोन बास्केट लावलेल्या असतात. या खेळातील बास्केटचा रंग नारिंगी असतो.
खेळाचे साहित्य – या खेळासाठी मोठा गोलाकार हवा भरलेला नारिंगी रंगाचा चेंडू लागतो.
पोशाख – टी शर्ट, हाफ पँट, पायात बूट असा या खेळाडूंचा पोशाख असतो.
खेळाडूंची संख्या – हा खेळ दोन संघात खेळला जातो. प्रत्येक संघांत एकूण १२ खेळाडू असतात, परंतु प्रत्यक्ष पाच खेळाडू मैदानात खेळतात व सात खेडाडू राखीव असतात.
खेळाचे नियम – खेळाडूने खेळलेला चेंडू मैदानात लावलेल्या बास्केटवर जाऊन बसला किंवा त्या बास्केटमधून खाली पडला की गोल झाला, असे म्हणतात.
या खेळात प्रशिक्षकाने दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय मानला जातो. जर खेळाडूकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले गेले, तर त्याला दंडात्मक शासन दिले जाते. त्याला सामने खेळण्यास बंदी घातली जाते.
इतर माहिती – हा खेळ खेळताना ज्या टीममध्ये चेंडू असतो, त्याने तीस सेकंदांच्या आत गोल करण्याचा प्रयत्न करावा. या खेळात एक प्रशिक्षक, एक पंच, एक गुण लिहिणारा असतो.
हा खेळ २०-२० मिनिटे, असा दोन सत्रांत खेळला जातो. १० मिनिटांचा मध्यंतर असतो. अशा प्रकारे बास्केट बॉल हा खेळ खेळला जातो.
भारतीय बास्केटबॉल खेळाडू – Indian Basketball Players
- सत्नम सिंग
- अँज्योत सिंग
- अम्रितपाल सिंग
- विशेष भ्रिगुवंशी
- गिथु अण्णा जोसे
काय शिकलात?
आज आपण Basketball Information in Marathi – बास्केटबॉल बद्दल माहिती मराठीत पहिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.