अमरनाथची अमरकथा जगभर प्रसिद्ध आहे. हे एक विख्यात शिवक्षेत्र असून श्रीनगरच्या ईशान्येस १२८ कि. मी. अनंतनागपासून उत्तरेला १२० कि. मी. तर पहलगामपासन ४८ कि. मी. अंतरावर हे क्षेत्र आहे. एक्सप्रेसने जम्मूस उतरल्यावर श्रीनगरला जायची बस मिळते. तेथून बस बदलून ‘पहेलगाम ‘ला जायचे. मात्र यापुढील प्रवास घोड्याने करावा लागतो. या मार्गात चंदनवाडी, शेषनाग व पंचतरणी ही प्रमुख स्थळे लागतात.
सर्व यात्रेत ही यात्रा अवघड मानली जाते. हे शिवस्थान ३९६२ मी. उंचीवर असून काशीतील लिंगदर्शनाचा दहा पट, प्रयागच्या शंभर पट व नैमिषारण्य व कुरुक्षेत्र ह्यांपेक्षा सहस्त्रपट फल देणारे असे हे अमरनाथ दर्शन पूजनीय आहे. हे मंदिर म्हणजे एक निसर्गनिर्मित गुहा आहे. ही गुहा ६० फूट लांब, २५ ते ३० फूट रुंद व १५ फूट उंच अशी असून निसर्गनिर्मित शिवलिंग बर्फाचे बनलेले असते. हे शिवलिंग शुक्ल प्रतिपदेपासून हळूहळू वाढीस लागते आणि पौर्णिमेस पूर्ण होते. तसेच वद्य प्रतिपदेपासून त्याची घट सुरु होते व अमावस्येला अदृश्य होते.
गुहेच्या वरच्या बाजूस डोंगरावर रामकुंड असून त्यातून ठिबकणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी शिवलिंग बनते असे सांगतात. या गुहेत लिंगाशिवाय आणखी दोन बर्फाचे विग्रह (मूर्ती) दिसतात. त्यांना पार्वती व गणपती समजतात. गुहेच्या खालच्या बाजूस अमरगंगेचा प्रवाह आहे. तेथे स्नान करुन मग यात्रिक दर्शनाला जातात. आद्य शंकराचार्यांचे येथे बराच काळ वास्तव्य होते., या गुहेत दोन कबुतरे आहेत. त्यांना शिव-पार्वतीची रुपे समजतात.
यावरुन एक कथा प्रचलीत झाली. शिव एकदा पार्वतीला सृष्टीचे रहस्य समजावून सांगत होते. ती गोष्ट कबुतराच्या एका जोडीन ऐकली त्यामुळे ती जोडी अजरामर झाली. येथे आणखी एक गंफा आहे. तिच्यात भस्मासारखी माती मिळते. यात्रेकरु शिवाचा प्रसाद’ म्हणून ती माती आणतात. भगवान शिव तथा महादेव श्रावण महिन्यातील पौर्णिमेस प्रत्यक्ष येथे आल्याचा उल्लेख आहे. म्हणून श्रावणी पौर्णिमेस (नारळी पौर्णिमेस) येथील मुख्य यात्रा भरते.
हेच दिवस यात्रेला जाण्याच्या दृष्टीने सोईचे असतात. येथे असह्य थंडी असते. श्रावण शुद्ध पंचमीस साधू, बैरागी, नागा महंत व इतर यात्रिक, ह्यांचा मोठा मेळा श्रीनगरहून अमरनाथास जायला निघतो. श्रीनगरपासून पीठाचे मुख्य बाबाजी, शेकडो लोकांसह मुबारकछडी घेऊन निघतात. ‘हरहर महादेव’ च्या गर्जनेत यात्रेकरु अमरनाथचा पहाड चढू लागतात. वृद्ध लोक घोड्यांनी जातात.
जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून तो ऑगस्ट अखेरपर्यंत ही यात्रा करता येते. प्रवासास श्रावण महिना म्हणजे ऑगस्ट फार चांगला असतो. कारण त्यावेळी बर्फ बाजूला करुन वाट मोकळी केलेली असते. दरवर्षी काश्मिरची राजधानी श्रीनगरहून श्रावण शुद्ध पंचमीस अमरनाथ भक्त तीर्थयात्रेस पायी जातात. त्यातसुद्धा निसर्गाची कृपा असली, तरच दर्शन घडते.
कारण कित्येक वेळा खराब हवा, अतिशय हिमवृष्टी यामुळे परत फिरण्याची वेळ येते. थोडी बर्फवृष्टी व बेताची थंडी असली, म्हणजे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते, व दर्शन चांगले घडते.” अमरनाथ हे एक शक्तीपीठ असून तिथे सतीचा कंठ गळून पडल्याचे सांगतात. कल्हण महाकवीने आपल्या राजतरंगिणी’ त अमरनाथचा उल्लेख ‘अमरेश्वर’ असा केला आहे. जगातून अनेक भक्त या स्थानाला भेट