Site icon My Marathi Status

Sir Alexander Fleming Information in Marathi – सर अलेक्झांडर फ्लेमिंग बद्दल माहिती मराठीत

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Sir Alexander Fleming Information in Marathi – सर अलेक्झांडर फ्लेमिंग बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – थॉमस एडिसन

माहिती – Sir Alexander Fleming Information in Marathi

स्कॉटलंडमधील गोष्ट. एक शेतकरी एकदा नेहमीप्रमाणे कामानिमित्त बाहेर पडला. रस्त्यात त्याला अचानक जोरात रडण्याचा आवाज ऐकू आला.

पाहतो तर एक छोटा मुलगा चिखलात अगदी गळ्यापर्यंत बुडालेला! जीव वाचविण्यासाठी त्याची केविलवाणी धडपड चालली होती. शेतकऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता आपली अवजारे खाली ठेवली आणि मुलाच्या दिशेने धाव घेतली.

त्याने मुलाला नुसत्या चिखलातूनच नव्हे तर अक्षरश: मरणाच्या दाढेतून बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याच्या घरासमोर एक मोठी घोड्याची बग्गी येऊन उभी राहिली.

त्या बग्गीतून एक अतिशय उंची कपडे घातलेला आणि उमदा माणूस उतरला. उतरल्यावर तो सरळ त्या शेतकऱ्याच्या घरात आला. “तू माझ्या मुलाचे प्राण वाचविलेस,

म्हणून मला तुला हे बक्षीस द्यायचे आहे. असे म्हणून त्या श्रीमंत माणसाने त्याच्यासमोर नोटांचे एक गलेलठ्ठ पुडके ठेवले. शेतकऱ्याने पैसे स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला.

तितक्यात त्या शेतकऱ्याचा मुलगा बाहेर आला. “हा तुझा मुलगा का ?” श्रीमंत माणसाने विचारले, “हो!”शेतकरी म्हणाला. “हे बघ, आता मी तुला जे सुचवतोय त्याला नाही म्हणू नकोस.

या तुझ्या मुलाचं संपूर्ण शिक्षण मी करीन. त्याला असा माणूस बनवीन, की तुला त्याचा अभिमान वाटेल.” शेतकऱ्याला ‘नाही’ म्हणण्याचे काहीच कारण नव्हते. मुलाच्या भल्यासाठी तो या गोष्टीला तयार झाला.

शेतकऱ्याचा हा मुलगा म्हणजेच महान शास्त्रज्ञ सर अलेक्झांडर फ्लेमिंग! ज्या मुलाचे प्राण त्या शेतकऱ्याने वाचविले तो मुलगा म्हणजे विन्स्टन चर्चिल ! जो पुढे इंग्लंडचा पंतप्रधान झाला ! योगायोगाने,

विन्स्टन एकदा न्यूमोनियाने आजारी पडला असता त्याला पेनिसिलीन याच औषधाने बरे केले. याच औषधाच्या शोधासाठी अलेक्झांडर फ्लेमिंगला १९४५ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला.

अलेक्झांडरचा जन्म ६ ऑगस्ट,१८८१ रोजी लॉकफील्ड, स्कॉटलंड येथे झाला.त्याचे शिक्षण लंडन येथील सेंट मेरीज हॉस्पिटल मेडिकल स्कूलमध्ये झाले. पुढे त्याने सेंट मेरीज हॉस्पिटलच्या संशोधन विभागात सुप्रसिद्ध जीवाणुशास्त्रज्ञ सर अॅमरॉथ राईट यांचा साहाय्यक म्हणून काम केले.

पहिल्या महायुद्धात आर्मी मेडिकल कोअरचा कॅप्टन म्हणून काम करताना त्याने अनेक सैनिकांना केवळ जखमा चिघळल्याने व जंतुसंसर्ग झाल्यामुळे मृत्यू पावल्याचे पाहिले. त्यानंतर त्याने सर्व लक्ष प्रतिजैविकांच्या संशोधनावरच केंद्रित केले.

पेनिसिलिन हे प्रतिजैविक त्याने पेनिसिलीअम या बुरशीपासून निर्माण केले. या त्याच्या संशोधनामुळे दुसऱ्या महायुद्धात तसेच आजपर्यंत लाखो लोकांचे प्राण वाचविले. ११ माच,१९५५ रोजी या महान संशोधकाचा मृत्यू झाला.

काय शिकलात?

आज आपण Sir Alexander Fleming Information in Marathi – सर अलेक्झांडर फ्लेमिंग बद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version